विभक्त भाग ५५
क्रमश: भाग ५४
सायली USA ला येणार म्हटल्यावर मिहीर ला खूप आनंद झाला . बिचाऱ्याची छोटी छोटी स्वप्न होती ..त्याला त्याच्या प्रत्येक आनंदात त्याची बायको त्याच्या बरोबर हवी होती .. आणि सायलीला याची पूर्णतः कल्पना होतीच म्हणुचन तिने मनातून एक निर्णय घेतला कि वेळ आली तर मी जॉब सोडेन पण मी USA ला जाईनच ..
देव पण कशी परीक्षा बघत असतो ना .. अशी छोट्या छोट्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तर करू शकता का नाही याची पडताळणी चालू असते . सर्वात आधी सायलीला काय महत्वाचे होते तर तिची पोस्ट किंवा तिचे प्रमोशन .. एक वर्ष फक्त मिहीर बरोबर घालवायला मिळवण्यासाठी तिला हवे असलेल्या प्रोमोशन चे त्याग करायची तयारी आहे का ते पहिले ? सायली ला तिच्या कर्तृत्वावर विश्वास होताच आणि आज ना उद्या एक दिवस तिचे स्वप्न ती पूर्ण करणार होतीच त्यामुळे तिने ठीक आहे एक वर्ष प्रोमोशन नाही मिळाले तरी काही फारसा फरक पडणार नाही.. असा विचार करून ती तयार झाली .. त्यावर पण देवाची परीक्षा संपली नाही तर जेव्हा तिने मनाने निग्रह केला कि आता जॉब सोडायला लागला तरी चालेल मी USA ला जाणारच तेव्हा तिला हि संधी मिळाली ..
सायली ची UsA ला जाण्याची जोरदार तयारी सुरु झाली .. तिने स्वतः मागे लागून जितके लवकर होईल तिकडे लक्ष देऊन साधारण २ महिन्या नंतर ची जाण्याची फ्लाईट बुकिंग पण झाले .
सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यावर सायलीने शरद ला सांगितले कि असे असे मला पण USA ला पाठवत आहे .. तर मी पण जातेय .. शरद एकदम खुश झाला .. त्याने लगेच तात्यांना फोन करून सांगितले कि सायलीला पण तिच्या कंपनीकडून USA ला पाठवत आहेत.. तात्या पण खुश झाले .. तात्या म्हणाले माझा मुलगा तर आहेच पण माझी सून पण आमच्या घराण्याचे नावं रोशन करून येणार ..
लगेच त्याच वीकेंड ला सायली शोभा आणि शरद गावी आले .. सायली पण आता USA जाणार म्हणून ती सर्वांना भेटायला गेली ..
लीला बाई सायलीकडे बघून " सायली अग , मिहीर नाहीये तर जेवतेस कि नाही .. एक महिन्यात किती बारीक झालीस "
शोभा " अहो .. झोपत नाही पोर .. दोघांचा रात्र रात्र सारखा तो व्हिडीओ कॉल चालू असतो .. दिवसा काम आणि रात्री फोन .. म्हणून बारकावली .. "
तात्या " मग आता मिहीर कधी येणार आहे तुला घ्यायला ?"
सायली " नाही .. ते नाही येणार आहेत .. मी एकटी जाऊ शकते "
तात्या " छे .. एवढ्या लांब तुला आम्ही एकटीला अजिबात पाठवणार नाही .. तू एक काम कर.. मिहीर ला सांग मला घ्यायला ये "
सायली " अहो तात्या .. त्याची काहीच गरज नाहीये .. मी एकटी जाऊ शकते"
शेवटी शरद ने पण सांगितले .. मिहीर यायची काही गरज नाहीये .. सायली जाऊ शकते .. हल्ली तसा काही प्रॉब्लेम नाहीये . तात्त्यांना सायलीची काळजी इतकी वाटत होती कि ते तिला एकटीला पाठवायला तयार नाहीत .. सायलीने रात्री मिहीर ला हि गोष्ट सांगितली कि असे असे तात्या म्हणत आहेत
शेवटी मिहीर ने फोन करून सांगितले कि तसे काही असते तर मी स्वतः आलोच असतो पण सायली आहे तर मला काही टेंशन नाही ती तेवढे मॅनेज नक्की करेल. तिला फक्त विमानात बसायचं आणि इकडे उतरायचं .. एअरपोर्ट बाहेर मी उभा असणारच आहे .. तुम्ही काही काळजी करू नका .. "
तात्या " मूर्खां.. मग तू तुझ्या बरोबरच घेऊन जायच होतास ना .. तू थोडा उशिरा गेला असतास .. "
मोठ्या मुश्किलीने सायलीला एकटीने प्रवास करण्याची संमती मिळाली
सर्वांना भेटून सायली पुन्हा इकडे शहरात आली .. सायलीने स्वतःकडे आरशात पहिले तर तिच्या हि लक्षात आले कि तिची तब्बेत जरा खालावली आहे.. तिला जिने चढता उतरता ना दम लागतोय.
पण सध्या गडबड पण इतकी होती कि तिचे खाणे पिणे आणि झोप या तिन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होत होते . शिवाय ऑफिस चे काम पण भरपूर होते . आणि नाही म्हटले तरी मिहीर तिच्या जवळ नव्हता त्याचा परिणाम थोडा तरी होणारच ना
मिहीरचा कॉल आला कि त्याच्या सूचना चालू होयच्या ... फार काही सामान प्लिज आणू नकोस नाहीतर त्या महाबळेश्वर सारखे सामान भरशील .. तुला जे बेसिक पाहिजे तेच आण ..बाकी सगळे आपण तुला इकडे घेऊ .. म्हणजे बॅग्स हेवी नाही होणार "
सायली " ठीक आहे .. मी फक्त ऑफिशिअल ड्रेस आणि लॅपटॉप च आणते "
मिहीर " हो .. तेवढाच आण .. ऐक ना मी तुला खूप मिस करतोय .. कधी येशील .. ये ना लवकर .. "
मिहीर ला ती जशी येणार आहे असे कळले तो अधीर झाला होता
सायली " हो ना .. मला पण करमत नाहीये, कधी एकदा तिकडे येईन आणि तुला पाहीन असे झालेय .. पण आपला प्लॅन सॉलिड वर्क झालाय ना .. किती सरांच्या मागे लागले होते माझे मला माहितेय "
मिहीर " थँक्स यार .. यु डिड इट ..
मिहीर " सायली तू कशी आहेस ? "
सायली " मिहीर .. मला असे वाटतंय कि मी प्रेग्नेंट आहे.. म्हणजे अजून मी चेक नाही केलय पण मला असा डाऊट आहे "
मिहीर " मला पण वाटतंय .. एव्हाना न्यूज यायला पाहिजे होती "
सायली " म्हणजे तू .. नालायक . "
मिहीर " अरे .. असुदे .. आता तू इकडे ये .. बघ मी कसे सगळे ठीक करतो "
सायली " अरे .. तू जाणार होतास हे तुला माहित होते ना .. तरी पण .. काय रे "
मिहीर " मला असे वाटतंय हा राईट टाइम आहे .. मला आता तुला त्या रूपात बघायचंय ." तुला वाटतं नाही का ?"
सायली " अरे .. पण आपले दोन वर्षांनी ठरले होते ना ..
मिहीर " हो मग एक वर्ष तर बाळ येण्यासाठी लागतेच ना .. आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षी आपल्या हातात माझ्याकडे दोन सायली असतील .. जस्ट इमॅजिन "
सायली " आणि दुसरा मिहीर पण येऊ शकतो .. ..
मिहीर " हमम.. जर कन्फर्म न्यूज आली तर तू खुश आहेस का ?"
सायली " नाही .. कारण मग तू दुसऱ्या नंबर वर शिफ्ट होशील ना .. ते मला नाही चालणार म्हणून "
मिहीर " अरे .. त्यात काय मी तसा तिसऱ्या नंबर वर शिफ्ट होयला पण तयार आहे "
सायली " पण जर तू मला पहिल्या नंबर वरून शिफ्ट केलेस तर मला नाही चालणार काय आधीच सांगून ठेवते "
मिहीर " कधीच नाही . तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही .. आय एम पझेसिव्ह अबाऊट यु .. तुला लक्षात आले नाही का ?"
सायली " ते तर मला कधीच कळलंय .. आपण लग्ना आधी मिसळ खायला गेलो होतो. मला ठसका लागला होता तेव्हा तो हॉटेल चा मॅनेजर पाणी घेऊन आला होता .. तेव्हा तुला किती राग आला होता ..तेव्हाच कळले होते .
मिहीर " हमम.. तुझ्याशी लग्न करायला नालायक मला किती पापड बेलावे लवलेस ग "
सायली हसायला लागली ..
मिहीर " तुझ्या तोंडून आय लव यु टू ऐकण्यासाठी किती तसरवले होतेस मला "
सायली " हो .. ना .. सॉरी .. पण मी तर काय करू ?मला त्यात इंटरेस्टच नव्हता .. "
मिहीर " आता तरी आहे ना "
सायली " आता मला इंटरेस्ट नाही .. आता माझा श्वास आहेस तू ? "
मिहीर " चल यार हा एक महिना कधी संपणार ? कधी येशील इकडे असं झालय मला . इकडे मी मुद्दामून मुलींना बघू म्हटले कोण तुझ्या तोडीची आहे का बघू. तुझ्या तोडीची पण कोणी नाहीये यार ?
सायली " मिहीर .. मार खाशील हा .. "
मिहीर " अरे .. यु शूड बी प्राऊड .. एक महिन्यात मला एकपण चेहरा तुझी आठवण करून देणारा दिसला नाही .. अशी माझी ब्युटीफुल वाईफ .. इकडे आलीस कि इकडच्या मुलांना कळेल कि व्हॉट इज इंडियन ब्युटी "
सायली " बस .. बस .. एवढी पण काय मी अप्सरा नाहीये हे मला माहितेय .. तू उगाच हरभऱ्याच्या झाडावर मला चढवू नकोस .. "
मिहीर "अरे .. आता खरं सांगतोय तर पटत नाही तुला . "
शोभा " सायली .. २ वाजले .. झोप आता "
सायली " हो .. आई .. " हळू आवाजात " अरे .. आई ला आवाज जातोय तू हसवू नको ना मला "
मिहीर " सासूबाई .. अहो बायकोशी बोलू द्या .. उगाच कशाला त्रास देताय "
सायली हसायला लागते ..
मिहीर " बरं ऐक उद्या चेक करून सांग मला .. "
सायली " नाही .. मी तिकडे आल्यावर तुला सांगेन .. तुला त्यासाठी वेट करावे लागेल "
मिहीर " का ?
सायली " म्हणजे माझी आठवण अजून काढशील ?"
मिहीर " अरे .. तसेही मी आठवण काढतोच आहे कि आता काय मला वेडा झालेला बघायचंय का तुला "
सायली सारखी मोठं मोठ्याने हसायची .. आणि सायलीला हसवायचं हाच त्याचा छंद होता ..
सायली " अरे .. आपण इतका वेळ घरत असल्यावर पण बोलत नव्हतो .. हल्ली जरा जास्तच हसतो .. लॉन्ग डिस्टन्स रिलेशन मध्ये पण मजा येतेय ना "
मिहीर " हा त्याचे तोटे पण आहेत भरपूर पण उलट मी २४ तास अगदी काम करत असताना पण मला तूच आठवतेस .. तिकडे असताना तसे होत नव्हते "
सायली " हो रे .. माझे पण .. काल मी त्या अमित ला मिहीर म्हणून हाक मारली . गीता च्या लक्षात आले .. मी असली शरमले .. ना .. मी लगेच फोन हातात घेतला आणि तुझ्याशी फोन वर बोलतेय असे नाटक केले .. "
मिहीर जाऊन एक महिना होतोय नाहीतर सायलीचे जायचे कन्फर्मेशन आले . त्या कॉन्फर्मेशन बरोबर सायलीची प्रेग्नसी पण कनफरमेशन आले .यावेळी ती मनातून खूप खुश होती .. काश कि हि न्यूज ऐकायला मिहीर तिच्या बरोबर असता . नुसता नाचला असता तिच्या आजुबाजूला . एके के उपर एक चेंजेस .. आता USA ला ती काम करायला जात होती .. ना कि मजा करायला .. आणि जातेय तर प्रेग्नेंट .. डायरेक्टर सर काय म्हणतील एवढे मागून घेतले तर ते नीट पूर्ण तरी करायचे ना .. हे काय आता प्रेग्नेंट म्हणजे तिला स्वतःला कामात झोकून पण देता येणार नाही .. शिवाय तिकडे तिची काळजी घेणारे कोणी नाही ..
जसे ह्या दोघांना एकत्र यायला मुहूर्त मिळत नव्हता तसा सायलीला आई बनण्यासाठी कोणतीच वेळ योग्य वाटत नव्हती .. नेहमी पुढे आवसवून उभे राहिलेले प्रश्न असायचे . पण यावेळी सायली ची मनातून तयारी झाली होती . आणि तिने ठरवून टाकले जे काय होईल ते पाहून घेऊ .. आता मी कोणत्याच गोष्टीत मागे हटणार नाही "
सायलीने ठरवून टाकले कि हि न्युज सध्या कोणालाच सांगायची नाही .. कोणालाच म्हणजे अगदी मिहीर ला सुद्धा नाही .. कारण इकडे घरात जर कळले तर तिला USA ला कोणच पाठवणार नाही .
तरी पण सेफर साईड सायली तिच्या डॉक्टर मॅडम कडे जाऊन आली . तिने बेसिक गोळ्या औषधे चालू केली .
झाले सायली ची USA ला जायचा दिवस उजाडला . शोभा चे काल पासून रडून रडून झाले होते ..तेवढ्या वेळेला शरद तिला समजावून सांगे " अग तिचा नवरा आहे तिकडे तिच्या बरोबर तू कशाला काळजी करतेस "
शोभा " हो .. पण तो हि लहानच आहे ना तसा .. त्यात सायली चा स्वभाव माहितेय ना कशी फटकळ आहे ते .. "
सायली " आई काय पण काय ग ? मी कुठे ?"
शोभा " नाहीतर काय ? तो तुला एवढा जीव लावतो तू त्याला अजिबात रिस्पेक्ट देत नाहीस "
प्रत्येक आईला असे का वाटते काय माहित कि आपला जावई एकदम भला आहे आणि आपली मुलगीच जरा आगाऊ आहे
सायली " नाही ग .. असे काही नाही .. तूच विचार त्याला .. "
गावा वरून पुन्हा सगळे सायलीला सोडायला आले ..
तात्या " सायली .. सावकाश जा ग बाळा ?"
लीला बाई " आणि तब्बेतीची काळजी घ्या .. मला ना हल्ली तू जरा बारीक झाल्या सारखी वाटतेस "
लता " सायली , हो ग .. सायली खरच मिहीर भाऊजी होते तेव्हा कशी टवटवीत होतीस .. आता बघ डोळे आत खोल गेलेत तुझे "
शिशिर " काही नाही ग .. आता एकटी जाणार म्हणजे काय कमी टेन्शन असेल का तिला ? शिवाय तुम्ही हे विसरू नका .. जसे मिहीर तिकडे कामाला गेलाय तसे तिला तिकडे जाऊन काम करायचेय .. त्यामुळे आता थोडा स्ट्रेस नक्की येणारच .. ती तिकडे गेली ना कि होईल ठीक ? होय ना सायली ?"
सायली " एकदम बरोबर बोललात दादा "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा