Login

विभक्त भाग ५७ अंतिम भाग

in this part sayali gets felicitataion from her college

विभक्त भाग ५७

क्रमश: भाग ५६

मग काय आदी  च्या सगळ्या लीला दोघे बघत होते .. आदी चा डायपर बदलणे ..त्याला खेळवणे  , त्याला झोपवणे सगळी कामे अर्थातच मिहीर करायचा .. सायली फक्त फीडिंग करायची आणि तिला मिळेल तेवढा वेळ ती ऑफिस चे काम करत बसायची . आणि मिहीर तिला असे करून देत होता कारण या सगळ्यात तिचे नाही म्हटले तरी थोडे फार दुर्लक्ष झालेच होते आणि ते तिला भरून काढायचे होते .

आदी जर रडायला लागला ना कि मिहीर ने त्याला "सॉरी आदी  " असे बोलला ना कि तो खूप छान हसायला लागायचा . मग हे दोघे पण खूप हसायचे .

सायली " मिहीर तुला मी म्हटले ना .. देवाने माझ्यावर प्रेम करणारा अजून एक मिहीर पाठवलाय .. "

मिहीर " हो .. ना .. पण तो खुश होतो ना मग मला पण "सॉरी" बोलायला मजा येते .. आमचा दोघांचा कोड वर्ड आहे तो ..

थोडं तारेवरची कसरत होतीच पण दोघे … दोघे नाही तिघे आनंदात  होते ..

सायली संध्याकाळी येई पर्यंत मिहीर त्याला बॉटल ने दूध द्यायचा .. त्याला प्राम  मध्ये घेऊन एक तास फ्रेश एअर मध्ये न्यायाचा .."

सगळे एकदम परफेक्ट फोटो पिक्चर असे चित्र चालू होते . वीक एन्ड ला फिरायला जायचे .. शॉपिंग करायचे .. नवीन नवीन स्पॉट्स वर फिरायला जायचे .

USA  च्या बॉस ला मिहीर चे काम इतके आवडले कि अजून  त्याचे एक वर्ष एक्सटेन्ड झाले . सायली ने आता ठरवले कि माझे एक वर्ष पूर्ण झाले कि मी बाळाला घेऊन पुढे जाईन .. तू मागून ये .. पण देवाची ईच्छा काही वेगळीच होती .. सायलीच्या कामावर पण तिचा  इकडचा  बॉस खुश होता .. तिला हि एक वर्ष एक्सटेन्ड करून मिळाले . दोघांनी ठरवून टाकले आता सध्या आहे त्या  रुटीन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये .. उलट तिकडे गेल्यावर बाळाला कुठे ठेवू हा  प्रश्न उभा राहील त्या पेक्षा सध्या आहे ते चालू ठेवावे

बोल बोलता आदी एक वर्षांचा झाला .. आता डॅडा .. मम्मा .. असे बोलू लागला . घर भर चालू लागला .. पळू लागला .. खूप मस्ती ... . तिघे मस्त एन्जॉय करायचे .. वीकएंड ला फिरायला जायचे .. रोज त्याला खेळायला गार्डन मध्ये न्यायचे .. बेबी फूड चा तर प्रश्नच नाही अतिशय उत्तम क्वालिटी चे बेबी फूड तिकडे बाजारात मिळायचे .. नुसते गरम करायचे आणि भरवायचे .. उलट दोघे काम करणाऱ्यांना अतिशय उत्तम वातावरण बाहेरच्या देशात त्यान्ना मिळाले ..

मिहीर ने जे स्वप्न बघितले होते कि घर हसरे घर पाहिजे .. घरात आनंदी मुल  पाहिजेत .. मुलाला त्याची आई मिळाली  पाहिजे .. त्याचा बाबा मिळाला पाहिजे .. अगदी तसेच  शोभा ने म्हटलेल्या गाण्याप्रमाणे दृष्ट लागण्या जोगे सारे झाले होते .

आदी एक दीड वर्षांचा झाल्यावर लगेचच त्यांनी दुसरा नंबर लावला कारण मिहीर ला सायली सारखी प्रिंसेस पाहिजे होती

तर अशा पद्धतीने मिहीर आणि सायली तब्बल दोन वर्षांनी  भारतात परत  आले तेव्हा मिहीर च्या हातात एक मूल आणि सायलीच्या पोटात एक मूल  असा आला..  गेला तेव्हा एकटा होता आणि आला तेव्हा सह कुटुंब सह परिवार आला होता .. सायली आठ महिन्याची प्रेग्नंट होती त्यामुळे सामान , आदी सगळे तोच उचलत होता आणि सायली मस्त गॉगल लावून हातात एक पर्स आणि लॅपटॉप ची बॅग घेऊन एअरपोर्ट लुक्स देत होती .. त्यांना रिसिव्ह करायला .. घरातले सगळेच आले होते घरातल्यांचे कोणाचेच या दोघांकडे लक्ष नव्हते .. सगळे . तुरुतुरु चालणाऱ्या आदी कडे होते .. मिहीर मध्ये मध्ये त्याच्याशी बोलायचा " वेट आदी .. डोन्ट रन .. "

तिथेच सर्वांना कडकडून मिठी मारल्या .. आनंदाश्रूंत नाहले .

सायली ला अजून एकदा प्रेग्नेंट पाहून तर सगळ्यांना सुखद धक्का बसला होता. शोभा मनोमन म्हणू लागली चला माझी दुसरी लेक जी लग्न करायला तयार नव्हती ती आता चांगलीच संसारात रुळली आहे . सायलीतली आई , सायलीतली बायको तिच्या डोळ्यात दिसत होती . कारण सर्वांना हे नक्कीच माहित होते कि करिअर च्या पुढे बाकी सगळे तिला शून्य वाटायचे . आज तीच सायली करिअर  तेही साधे ९ ते ५ वली नोकरी नाही डायरेक्टर लेव्हल चा जॉब ती करत होती . ऑनसाईट जाऊन तिकडे झेंडे अटकेपार लावून आली होती .. ते तर सांभाळतच आहे पण उत्तम संसार पण करत होती.

थोड्याच दिवसात सायलीला एक मुलगी झाली .. जी कि सायलीची  झेरॉक्स कॉपी होती .. सगळे कसे मस्त छान झालं .. एक मुलगा आदी  आणि एक मुलगी …. मीरा

आता मुख्य मुद्दा करिअर आणि स्वप्नाचे काय ? दोन वर्षे तिकडे काम केल्यामुळे मिहीर आल्या बरोबरच लगेच डायरेक्टर च्या पोस्ट वर जॉईन झाला . आणि त्याचे काम पुन्हा बॅक टू  रुटीन जसे सायली ला पाहिजे होते तसे सुरु झाले .

सायली मीरा सहा महिने होई पर्यंत तर घरातच होती . सध्या लगेच तिला तेवढा वेळ पण मिळणार नव्हता कारण दोघे हि मुल तशी लहान होती त्यामुळे तिने सध्या दोन वर्ष आहे त्या पोस्ट वर काम केले . तिला तसे सरांनी सांगितलेच होते कि तुला ऑनसाईट मिळाले तर प्रोमोशन नाही मिळणार .

आल्यावर विमल ताई होत्याच मदतीला . विमल ताईंच्या मुलीची  लग्न झाली होती आणि नवरा त्यांचा आधीच गेला होता . सध्या त्या एकट्याच राहायच्या . मिहीर ने त्यांना फुल टाइम घरात ठेवून घेतले . मग त्या मुलांना बघण्या पासून ते घरातील काम सर्वच करायच्या ..

दोन वर्षानंतर सायलीचे प्रोमोशन झाले आणि सायली डायरेक्टर च्या पदावर काम करू लागली .. सायली चे ड्रीम कम ट्रू झाले होते आणि ती डायरेक्टर क्याटेगरी मध्ये आली होती .

मध्यंतरीच्या काळात गीताचे लग्न होऊन तिला पण एक वर्षाची मुलगी आहे आणि ती सुखी आहे .. मिताली आणि विनय ची गाडी एकदम रुळावर आली होती . मितालीचा कोर्स पूर्ण झाल्यावर तिला लगेच चांगला जॉब मिळाला . घरी सासू बाई असल्याने मिताली जॉब ला सुखात जाऊ  लागली . विनय ने त्याचा जॉबचं बदलला आणि त्याला पाहिजे त्या डिपार्टमेंट मध्ये जॉब लागला आणि तिकडे तो खूप छान सेट झालाय . शोभा आणि शरद ने ठरवल्या प्रमाणे दोघांना एक फ्लॅट बुक करून दिला आणि आता दोघे मिळून त्याचा हप्ता भरत आहेत .

तात्यांचे हे वर्ष झाल्यावर शिशिर दादा सरपंचाच्या पदा साठी उभे राहणार आहेत .

आज सायलीला तिच्या कॉलेज मध्ये ऍज अ गेस्ट लेक्टरर म्हणून बोलावले होते . सायली ला जरी दोन मुले झाली तरी ती मेंटेन होती .. अजूनही ती पूर्वी सारखीच दिसायची . अजूनही चेहऱ्यावर तेज होते .. हे तेज कसले असते माहितेय का ? हे तेज होते समाधानाचे .. हे तेज होते आपण जे काम आपल्याला आवडते ते काम करत असतो त्याचे  . हे तेज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण होताना चे होते .

डायरेक्टर झाल्यावर सायलीला पण कंपनीने ऑडी कार विथ ड्राइवर दिला होता .. आज मोठया थाटात सायली खटाखट तयार होऊन तिच्या कॉलेज  ला गेस्ट लेक्चरर म्हणून जाणार होती .

मिहीर " वाह .. आज काही कॉलेज च्या मुलांचे खरं नाही .. तू अशी इतकी छान तयार झालीस आणि तिकडे जर प्रेझेन्टेशन दिलेस तर तुझ्या सारख्या असंख्य सायली तयार होतील .

सायली " मग तर चांगलेच आहे ना .. आज मला खूप छान वाटतंय मिहीर .. ज्या कॉलेज मध्ये मी एक स्टुडन्ट होते त्याच कॉलेज मध्ये मला गेस्ट बोलावलंय .. "

मिहीर " मग .. माझी बायको आहेच हुशार ? आणि तिला एक किस करतो .. तर आदी गडाबडा लोळायला लागला

सायली " काय रे मिहीर .. आता त्याला कोण शांत करणार ? बघ कसा भडकला तो "

आदी " डॅडा .. डोन्ट किस माय  मम्मा "

मिहीर " ए गप ए आदी .. मी आधी आणि तू नंतर आहेस  .. आणि दोघे हसायला लागले  ..

मिहीर " सॉरी .. सॉरी "

मिहीर सायलीला .. “काय नालायक कार्ट आहे माझ्यावर च गेलाय .. तुझ्या बाबतीत इतका पझेसिव्ह कसा काय झाला ?"

मिहीर मीरा ला उचलून घेतो आणि  आदी कडे  बघून म्हणतो " तू माझी प्रिन्सेस आहेस ना .. मग मी तुला किशी देतो .. दादाला नाही .. तर मीरा  मिहीर ला किशी देते आणि त्याला म्हणाली .. “पण मी तर मम्मा ची प्रिन्सेस आहे कारण मी मम्मा सारखी बनणार . “

सायली अजून हसायला लागते ..

मिहीर " अरे नालायकांनो मी आहे कि नाही .. मी पण आहे .. मला तुमच्या टीम मध्ये घ्या .. माझे कोण आहे कि नाही इथे ? मम्मा माझी पण फेव्हरेट आहे रे… ”

तर तिघे म्हणाले " अरे आम्ही कोणाचे आहे मग .. आमच्या तिघांचे तुम्ही फेव्हरेट आहे .  आणि चौघांनी एकमेकांना किशा दिल्या .

तर असे हे स्वर्ग से सूंदर आणि सुखी जसे मिहीर ला पाहिजे होते तसे घर सायली आणि मिहीर चे होते .

निघता निघता सायली मिहीर ला म्हणाली

सायली "ऐक ना मिहीर , आज मला तुला थँक यु म्हणायचेय .. आज जी मी आहे ते केवळ तुझ्यामुळे .. तू माझा नेहमी सपोर्ट सिस्टिम म्हणून माझ्या मागे खंबीर उभा राहिलास . माझ्या नोकरीला कधीच दुय्यम समजला नाहीस .. माझ्या स्वप्नांना तू बळ दिलेस त्यामुळेच मी हे सर्व करू शकले . नाहीतर आंनदी संसारा  च्या मागे एका कोणाचा तरी त्याग असतो . ..आपला संसार तर बहरालाच पण त्यात मला माझ्या करिअर ची आहुती द्यावी लागली नाही .. आणि हे फक्त तुझ्या मुळे झाले .

आज मागे जाऊन विचार केला तर असे वाटेल कि जो १० महिन्यांचा विभक्तपणा आपण स्वीकारला होता त्याची काही गरज नव्हती . पण तसे नाही माझ्या दृष्टीने मला त्या १० महिन्यात खूप काही शिकायला मिळाले . आपल्या दोघात एक प्रकारचा  स्पष्टपणा  आला .एकमेकांची कदर कळली आणि मुख्य म्हणजे मानसिक विभक्तपणा तिथे संपला . त्यामुळेच तर पुढे सगळे चित्र बदलले .. त्यामुळेच माझी विचार करण्याची पद्धत बदलली . नक्की मला काय हवेय आणि तुला काय हवेय ते मला कळले ..  सो क्रेडिट गोज टू यु .

त्या नंतर ना मला तुझ्या बद्दल कधी कोणतीच तक्रार म्हणा नाराजी राहिलीच नाही .. उलट माझा तुझ्यावर इतका विश्वास बसला कि तू जे करशील ते योग्यच करशील . मनात कोणताच आड पडदा राहिला नाही .. तुझे माझ्या वर असलेलं प्रेम किती निरागस आणि निरपेक्ष आहे याची जाणीव मला झाली .. आय लव यु .. मिहीर”

मिहीर " प्रत्येकाची  प्रेमाची परिभाषा वेगळी असते .. माझी निरपेक्ष होती का नाही मला माहित नाही पण मला तू माझ्या  बरोबर पाहिजे होतीस फक्त तुझी साथ पाहिजे होती बाकी काहीच नको होते. तुला माझ्यात तुला साजेसा लाईफ पार्टनर दिसला हेच माझ्यासाठी खूप होते .. "आय लव यु टू "

मिहीर "क्रेडिट वगैरे असे  असे काही  नसते ग . तू पण न हरता ... संसार आणि करिअर ब्रेक न घेता चालू ठेवलेसच ना .. तुझ्या लक्षात येत  नाहीये . सुरुवातीला एक वेळ अशी आली होती कि मला वाटले होते कि आपला संसार तुझ्या गोल्स च्या नादात पाण्यात जाणार आहे .. पण तू इतक्या स्मूथली काही गोष्टी हॅन्डल केल्यास तुला काय सांगू .. सो हे एका चे क्रेडिट नाहीये हे आपल्या दोघांचे क्रेडिट आहे . आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचाय  आपल्याला .आताशा आदी ५ वर्षाचा आहे आणि मीरा ३ वर्षांची होतेय .. त्यांना स्वप्न बघायला शिकवून त्यांना ती पूर्ण करताना पहाचय ..

सो इट्स नॉट द एन्ड ..इट्स न्यु बिगिनिंग !!!!

सायली एकदम प्रोफशन ल ड्रेस मध्ये तयार होऊन एका मस्त गेट अप मध्ये मोठ्या शान मध्ये कॉलेज ला आली . कॉलेज च्या गेट वर तिची ब्लॅक कलर ची ऑडी थाम्बली . तिचा ड्राइवर उतरला त्याने दार उघडून दिले .. ती गाडीतून बाहेर उतरली .. तिची ग्रँड एंट्री बघून सगळ्या स्टुडंट्स नि टाळ्या वाजवल्या .. तिला रिसिव्ह करायला  डीन  स्वतः  पुढे गेले होते .

मग  तिचा सत्कार करण्यात आला .तिने लेक्चर दिले  .. तिच्या आयुष्यात तिने काय काय केले कसे केले असे थोडे थोडे मोटिवेशनल  भाषण केले . त्या हॉल मध्ये नुसता टाळ्यांचा कडकडाट होता . आज आपल्या  आयुष्याचे सार्थक झाले असेच काहीसे तिला  वाटत होते .. अजून प्रवास सुरू राहणारच होता .. तिला अजून बऱ्याच गोष्टी खुणावत होत्या .. आणि ती त्या  करणारच याची तिला खात्री होती .

समोर बसलेल्या मुलींमध्ये एक मुलगी भारावून जाऊन सायलीच्या प्रत्येक हावभावाकडे , हालचालीकडे निरखून पाहत होती .. सायलीला तिच्यात काही वर्षां पूर्वीची सायली जी इंदिरा चावला ला पाहून भारावली होती ती दिसली .. त्या मुलीला पाहून सायलीला धन्य झाल्या सारखे झाले तिच्या लक्षात आले कि तीने हा गोल्स चा , अम्बिशन्स चा   वारसा   एका सायलीकडून दुसऱ्या सायलीकडे पुढे सरकवला होता ..

                            समाप्त !

नवरा बायकोच्या नात्यातील शारीरिक विभक्त पण आल्यामुळे मानसिक विभक्तपण संपवणारी आणि मोठी मोठी स्वप्नं बघून नॉर्मल संसार करतानाची एक उडालेली प्रेमळ तारंबळ कशी वाटली नक्की सांगा ..

ईरा चे आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार ..   

0

🎭 Series Post

View all