विभक्त भाग ४२
क्रमश : भाग ४१
संध्याकाळी ६ वाजता ऑफिस मधून निघून सायलीने मिहीर ला पिक केले आणि दोघेही घरी आले . मिहीर ने सायलीला एक पॅकेट दिले .
सायली "अरे वाह .. वन मोअर गिफ्ट "
मिहीर "येस .. ओपन कर आणि आता घाल आपण बाहेर जाणार आहोत .. तुला मी मागे म्हंटले होते ना ते स्पेशल रेस्टोरंट त्याचे बुकिंग मला मिळालेय . "
सायलीने ड्रेस ओपन केला .. एक एकदम भारी पार्टी वेअर गोल्डन ड्रेस होता . एकदम मॉडेलिंग करणाऱ्या मुली घालतात ना तसा .आई शप्पथ मिहीर .. अरे कुठून आणलास हा ड्रेस . शोधून सापडला नसता .. एकदम हॉट आहे .
मिहीर "अग , माझ्या ऑफिस मध्ये एक कलीग आहे ती मॉडेलिंग करते . तर ती ना प्रोफेशनल डिझायनर कडून शॉपिंग करते . असेच एकदा कॉफी घेताना तिने मला सांगितले कि तिच्या ओळखीने ती मला त्या डिझाइनर कडून घेऊन देऊ शकते . तुझा बर्थ डे चाड्रेस पण मी तिच्या रेफेरेंस नेच घेतला होता . जेव्हा मी तिला त्या ड्रेस मधला फोटो दाखवला तेव्हा ती म्हणाली "अरे हिला मॉडेल बनवा. मॉडेल मटेरियल आहे..”
तुझी खूप तारीफ करत होती . " तेव्हा ती ने मला एक लिंक पाठवली आणि म्हणाली नेक्स्ट टाइम काही ऑर्डर करायचे असेल तर या लिंक वरून तुम्ही मागवू शकता .. तर मी हा जस्ट मागवला होता तर आज तो लकीली आला . म्हटले चला मॅडम ला शिऱ्याचे बक्षीस पण राहिलेच आहे . पण हा ड्रेस साठी पेज ३ सारखी पार्टी पाहिजे . म्हणून मी त्या रेस्टारेंट चे बुकिंग मिळतेय का बघितले तर मिळाले "
बोल बोलता मिहीर ने कॉफी केली आणि ती तिचे आवरत होती .. आणि तो ड्रेस घालून रेडी ..
मिहीर "आई शपथ , कसली हॉट दिसतेस ..
सायली "सही .. खूप मस्त ड्रेस आहे .मी पण असा ड्रेस कधी घातला नाही . बॅक साईड जरा ओपन आहे पण "
मिहीर " बघू .. हम.. मग काय करतेस .. तुला कंफेटेबल नसेल वाटत तर दुसरे घाल काहीतरी "
सायली "तुला चालेल का ? मी अशी बाहेर आले तर ?"
मिहीर "अग आपण जाणार आहे ना तिकडे तू ला बाकीच्यांचे ड्रेस बघितल्यावर असे वाटेल कि मी काकू बाई आहे कि काय ?"
सायली "एक काम करते माझ्याकडे एक गोल्डन जॅकेट आहे ते यावर मॅच होईल ते नाही आपण दुबई ला घेतले ते .. आणि माहोल कसा आहे ते बघू आणि वाटले तर जॅकेट काढेन मग "
मिहीर "ठीक आहे "
त्या ड्रेस वर साजेशी हेअर स्टाईल करून असेसरीज घालून सायली तयार झाली .
मग काय ती जागाच अशी होती कि कोणाला कोणाकडे बघायला वेळच नव्हता . सगळे कपल्स एकमेकांत किंवा डिस्को त धुंद होते . हे दोघे पण जरा अंदाज घेत घेत करत होते . मग थोड्या वेळाने सेट झाले त्या माहोल मध्ये . मग दोघे डिस्को मध्ये गेले . प्रत्येकाचे एक टेबल रिझर्वड होते . मिहीर नेच त्याच्या हाताने सायलीचे जॅकेट काढले आणि तिला डान्स फ्लोअर वर नेले . कॉकटेल , मॉकटेल च मारा चालूच होता. दोघेही प्रेमाच्या नशेत धुंद झाले होते . नाचून नाचून दमले .. मग दोघे परत त्यांच्या टेबल वर आले ..
मिहीर ने सायलीला
विचारले "तुला वॉश रूम ला जायचंय का ?"
मग तो स्वतः तिला वॉशरूम ला घेऊन गेला . तिथे असलेल्या मुलीला तिच्या बरोबर थांबायला सांगितले .. आणि पुन्हा त्यांच्या टेबल वर आणून बसवले . सायली थोडी झिंगत होती .. आणि मग डिनर ऑर्डर करून तिला म्हणाला मी वॉशरूम ला जाऊन येतो .तू ओके आहेस का ?"
सायली "येस .. आय एम एकदम ओके आणि डोळे मोठे करून ताठ बसली . "
मिहीर वॉशरूम ला गेला आणि पटापट च आला .
बाहेर येऊन त्याच्या टेबल वर बघतो तर सायली एक मुलाला तिच्या हातांनी नखांनी त्याच्या तोंडावर ओरबाडत होती . मिहीर लगेचच आलाच तरी ..
मिहीर "अरे.. काय चाललंय ?
सायली मिहीर कडे न बघता.. त्या मुलावर अटॅक करत होती . तो ती मुलगी आहे म्हणून तिला काहीच करत नव्हता .. "
सायली "मिहीर , तू गेल्यावर हा मुलगा .. इथे माझ्या समोर बसला .. मी त्याला सांगितले कि धिस इझ reserved डेस्क .. तरी बसला .. आणि त्याचा मोबाईल बघ .. त्याने माझा फोटो काढलाय .. तो दाखवत नाहीये मला त्याचा मोबाइल " आणि त्याला मारायला म्हणून सायली सारखी पुढे जात होती .
मिहीर ने तिला मागून घट्ट पकडले होते तर हि दोन्ही पाय वर उचलून त्या मुलाला हात पोहचत नाही तर पायाने मारायला बघत होती ..
मिहीर " थांब मी बघतो .. मिहीर ने त्याला त्याचा हिसका दाखवायच्या आधीच त्याने त्याचा मोबाईल त्याला दिला .. तर त्यात एक फोटो सायलीचा होता पण तेवढ्यात सायलीने मेनू कार्ड समोर धरल्याने त्याला तो अर्धाच मिळाला होता ..
मिहीर ने त्याला एक उलट्या हाताने लगावून दिली . तर तो मुलगा रडू लागला .. म्हणाला मला एका माणसाने सांगितले कि सुंदर मुलीचा फोटो आणलास तर तुला ५०००/- रूपये देईन .. मला पैशाची गरज आहे .. मी आज खूप फोटो काढले .. बाकी कोणाला कळले पण नाही पण ह्या मॅडम ला लगेच कळले कि मी त्यांचा फोटो काढतोय .. हे बघा त्यांनी मला किती नखांनी मारलंय .. त्या पोरग्याच्या तोंडावर सायलीच्या नखांचे चांगलेच ओरखडे होते .
हे ऐकल्यावर आणि बघितल्यावर मिहीर ला जे हसायला यायला लागले .. त्याच्या मोबाईल जप्त करून त्यातले सगळ्या मुलींचे फोटो डिलिट केले . आणि मिहीर ने त्याला तिथल्या बॉक्सर च्या हवाली केले . आता पुढे काय पोलीस कंप्लेंट वगैरे ते रेस्टोरेंट करणार होते .
तेवढ्यात त्यांचे डिनर आले .. दोघांनी एकत्र डिनर केले .. तेव्हा मिहीर च्या लक्षात आले कि त्याच्या हातावर पण सायलीच्या नखांचे ओरखडे आहेत .तो जेव्हा तिला मागे ओढत होता ना तेव्हा सायली एवढी अग्रेसिव्ह झाली होती कि मिहीर ला त्याची पूर्ण ताकद लावून थांबवावं लागले होते ..
मिहीर ला त्याच्या हातावर आलेले ओरखडे बघून इतके हसायला येत होते .. मनात म्हणत होता "माझी मनी माऊ .. आज जंगली बिल्ली झालेली " sayali the wild cat !!
राहून राहून त्याला त्या पोरग्याचा राग नाही वाईट वाटत होते बिचाऱ्याला महिना भर तोंड धुवताना सायली आठवेल .
स्वतःच्या हातावर झालेल्या नखांच्या व्रण बघितल्यावर सायली वरचे प्रेम जून उफाळून येत होते ..
मनात म्हणत होता "धन्य आहे हि पोरगी .. चिडली कि कसली अवघड आहे .. चिडल्यावर हिच्या तावडीत सापडेल त्याचे काय खैर नाही .जर मी वेळेत तिला पकडली नसती ना तर त्या पोरग्यानि लाथाच खाल्ल्या असत्या हिच्या . तिचा गर्व पण वाटत होता पण लगेच मनात भीती पण वाटली आता तो मुलगा तसा वयाने लहान होता म्हणून बरा .. एखादा गुन्हेगार प्रवृत्तीचा असता तर .. कधीतरी एकदा म्हणून ठीक आहे . तसेही मला पण तिकडे एकदा जायचेच होते म्हणून मी तिला नेली तिकडे . हे असले प्रोग्राम न केलेलेच बरे .. त्या डीप बॅक मध्ये तीच स्वतः किती अवघडली होती तरी पण माझ्यासाठी बिना तक्रार तिने हा ड्रेस कॅरी केला .
मग दोघे घरी आले .. सायली जरा धुंदीतच होती .. ह्याच्यावरच अल्मोस्ट रेलून चालत होती . "
आज सायली इतकी हॉट दिसत होती कि मिहीर ला त्याचा संयम तोडावा असे वाटत होते .. ती पण शुद्धीत नाही .. मग तिला झोपवून हा टेरेस वर बिअर ची बॉटल ओपन करून बसला . हि बरोबर असल्याने त्याने तिकडे ड्रिंक्स घेतलेच नव्हते . कितीही नाही म्हटले तरी नवऱ्याची जवाबदारी निभवावीच लागते.
पण आज मज्जा पण दोघांनी खूप केली होती .
सायली जी झोपली ती डायरेक्ट सकाळीच उठली .
मिहीर तर बाहेरच सोफ्यावर झोपला होता .. त्याला कधी कधी त्या बेडरूम मध्ये जावेसे वाटायचेच नाही .. ज्या दिवशी मिहीर ने तिला प्रेमाची शप्पथ घातली त्या दिवस पासून सायलीने त्या खोलीत जायचं तर सोडा पण पहिले पण नव्हते .
मिहीर उठल्यावर आवरून ऑफिस ला निघायच्या आधी
सायली " हे बघ , मिहीर हि एक इन्स्टिटयूट आहे तिकडे कोर्स आहेत . पार्ट टाइम पण करता येतील . तर मला असे वाटतंय आपण ताईला या कोर्स ला ऍडमिशन घेऊन देऊ या . ह्यातला कोर्स झाला कि तिला चांगल्या ऑफर्स पण मिळतील आणि योग्य दिशा पण मिळेल आणि शिवाय तिचा गॅप आहे तो पण भरून निघेल . तुला काय वाटते ?"
मिहीर " हम.. चांगलेच आहे .. मी तुला कालच म्हणालो कि तिने आधी अपग्रेड करावे "
सायली " हे बघ , मी तिला सांगितले ना तर ती अजिबात ऐकणार नाही .. तिला माझ्या कडून ऐकायला तिचा मोठेपणा कमी होतो .. तर तू तिला उद्या या गोष्टी साठी कॉन्व्हिन्स करशील का ?"
मिहीर " अरे .. काय पण काय ? मी कशाला ? काल किती ऑकवर्ड होत होती ती मला बघून .. तिला वाटेल हा मुद्दामून मला हिणवायला सांगतोय "
सायली " नाही रे .. तुझे ऐकेल ती .. "
मिहीर " नको यार .. मला नको त्या भानगडीत नकोस अडकवू "
सायली " काय रे .. कर ना .. प्लिज .. अरे झालाच कोर्स ना तर मी तिला माझ्याच कंपनीत पण घ्यायला सांगू शकते .. मग होईल सेट हळूहळू "
मिहीर " पण तू सांग हेच तिला .. मला सांगितलेस तेच तिला सांग .. शेवटी तुझी बहीण आहे ती "
सायली " तू बोलून तर बघ .. नाहीतर मी बाबांना सांगेन मग "
मिहीर " आण चल फोन .. आण .. तुझ्याच फोन वरून लावतो कॉल "
सायली " अरे .. तुला कळले नाही .. तुला वेळ मिळाला कि तू ऑफिस मधून कर .. आणि यात मी सहभागी आहे हे तिला नको सांगू . तरच ती ऐकेल . मी चांगली ओळखते तिला "
मिहीर " त्या पेक्षा मी विनय ला भेटतो आणि त्याला सांगतो .. कि असा असा कोर्स ला ऍडमिशन घेऊन दे .. "
सायली " तू पण ना .. चल जाऊ दे .. मी बाबांना सांगेन "
मितालीच्या सेटलमेंट कडे सायली किती इंटरेस्टेड आहे हे मिहीर ला माहीतच होते . तो केवळ सायली साठी या गोष्टीत पडायला तयार झाला .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा