विभक्त भाग ५०
क्रमश : भाग ४९
त्या दिवशी रात्री शेत घरातच राहिले .शिशिर ने कॅम्प फायर सारखी शेकोटी लावली .. त्याच्या अबाजूला खुर्च्या टाकून मस्त गप्पा .. आठवणी , जोक्स चालू होते . शेत घराला मस्त रंग केला होता .. पूर्ण घराला लायटिंग केली होती . त्यामुळे खूप छान वाटत होते . सगळे आनंदात गप्पा मारत बसले . थोडा वेळा फटाके वाजवले .. मग सगळे मिळून अगदी तात्या आणि लीला बाईंसकट सगळे पत्ते खेळले . मग सगळे दमले पण होते ड्रेस चेंज करून सगळे आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले .
सायली पण तिच्या रूम मध्ये जाऊन नाईट ड्रेस घालून बसली .. बराच वेळ मिहीर रूम मध्ये आला नाही म्हणून अंगावर चादर शाल सारखी घेऊन बाहेर आली . बघते तर हा मस्त खुर्चीत बसून चांदण्या बघत बसला होता .. रात्री चांदणी प्रकाश मध्ये शांत बसायला मिहीर ला खूप आवडायचे आणि आज शेत घरातून आकाश खूपच सुंदर दिसत होते .
सायली पण त्याच्या शेजारी येऊन बसली ..
सायली " वाह .. काय नजरा आहे ना .. मी वर बघितलेच नाही "
मिहीर " हो .. मस्त वाटतंय "
सायली " चला .. झोपूया का .. सगळे झोपले पण .. तात्या आणि शिशिर दादांचा घोरण्याचा आवाज बाहेर पर्यंत येतोय .. "
मिहीर " हो ना ... अग खूप दमलेत ते दोघे ... "
सायली " हो .. आज खूप मज्जा आली नाही का ? आई बाबा आणि ताई पण आले ते बरं वाटले मला .. सगळ्यांची भेट झाली ."
मिहीर " हमम.. च्यायला मिताली मुळे मला जाम ऑकवर्ड होतंय आणि तिला पण बिचारीला ऑकवर्ड झाले असेल .. कसे काय असे झाले ? आता ती समोर आली ना कि उगाच डोक्याला शॉट होणार "
सायली " जाऊ दे रे .. मी तिला उद्या आरामात कॉल करते आणि बोलेन तिच्याशी .. तू नको टेन्शन घेऊन तिचे .. "
मिहीर " टेन्शन कसे नको घेऊ .. उद्या हीच गोष्ट विनय ला कळली तर त्याला काय वाटेल ? आधीच त्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत "
सायली " विनय चे जाऊ दे .. तो येडा स्वतः दुसऱ्या मुलीं बरोबर फिरताना मी बघितले आहे .. त्यामुळे त्याला कोण विचारतंय ?"
मिहीर " अग .. तुला वाटतो तसा नाहीये तो .. मागे मी बराच वेळ त्याच्याशी गप्पा मारल्यात .. मला म्हणत होता मिताली खूप हट्टी आहे . तिला पाहिजे तेच करते . आता पण तो तिला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी खूप आग्रह करत होता तरी ती तिकडे गेली नाही मुलांना सोडून आई कडे राहायला गेली पण सासरी गेली नाही .. हे कसे वाटते तुला ?"
सायली " हो का ? तुला काय माहित ?"
मिहीर " अग विनय माझा मित्रच झालाय ..मला वाटत नाही कि तो तुम्ही दोघी म्हणता तसा आहे .. अग त्याचा सेल्स चा जॉब आहे आणि त्याच्या टीम मध्ये ५ मुली आहेत .. मग काय त्याला त्यांच्या बरोबर फिरावेच लागते कधी कधी .. "
सायली " हो .. मग असे त्याने मिताली ला नीट सांगावे ना ? तिला का अंधारात ठेवतो ?"
मिहीर " तो म्हणतोय कि मी तिचा नवरा नंतर आधी मित्र आहे .. लग्न आधी २ वर्षे आम्ही एकत्र होतो म्हणजे तिचा माझ्यावर विश्वास असला पाहिजे कि नाही ? जे नाहीच आहे त्याचे एक्सप्लेनेशन मी का देऊ ?"
सायली " पण तरीही ती तिला छळतो का मग ? महिने महिने बोलत नाहीत दोघे ? मौन पाळतात घरात ? तिचा जीव जाळतो . मग तिला वाटते कि ह्याला माझ्यात इंटरेस्ट च नाहीये म्हणून तो असा करतो ?"
मिहीर " मला तर वाटतंय दोघांना समोर समोर बसवून बोलायला लावले पाहिजे .. सुरुवातीला भांडतील पण शेवटी एक होतील .. शेवटी त्यांचे लव मॅरेज आहे
सायली "आपण घेऊया का मिशन मिताली .. तुला काय वाटते ?"
मिहीर " नको .. तुला राग येईल पण मला या सगळ्यात मितालीच जास्त दोषी वाटते . "
सायली " अरे असेलही .. पण टाळी एका हाताने वाजत नाही .. "
मिहीर " ते हि आहेच ..
सायली " आज तू जरा टेन्स वाटतोयस मला .. तू बरा आहेस ना?"
मिहीर " हो .. मला पण थोडा स्ट्रेस च वाटतोय.. बघ इकडे आल्यावर माझी चड चीड पण वाढली होती .. कशामुळे काय माहित ?"
सायली " काही नाही रे .. त्याचे एक कारण असते कि अपेक्षा ? तुला वाटत होते कि मला कोणी मागून पुढून नावं ठेवू नये आणि तुझ्या सगळ्या अपेक्षा कदाचित मी पूर्ण नाही करू शकले .. आणि मग चीड चीड होते .. जसे कि .. मी जरा फ्रँकली गप्पा मारते आणि गावातल्या बायका इतक्य फ्रँकली बोलत नाहीत. किंवा एखादी किमान शिकलेली मुलगी जे करू शकते ते काम पण करायला मला एक्सट्रा एफर्टस घ्यावे लागत होते .. आणि गावात नाही म्हंटले तरी तुझे असे एक वेगळे स्थान आहे .. त्याला धक्का बसू नये असे वाटत होते .. म्हणून हि चीड चीड .. आणि दुसरे म्हणजे तिकडे आपण दोघेचं असतो .. त्यामुळे कोणाचंच आणि कशाचंच बंधन नसते .. आपले एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करायला आपण वाटेल तेव्हा एकमेकांना मिठीत घेतो .. इकडे तसेही करता येत नाहि "
मिहीर काहीच बोलत नाही
सायली " तुला या पेक्षा काही वेळले वाटते का ? "
मिहीर " काय माहित ?.. तू म्हणतेस ते बरोबर असेल .. तुझे मार्किंग बरोबर असते "
मिहीर " तुला एक विचारू ?
सायली " हमम.. कुछ तो गडबड है .. यु आर अस्किंग फॉर परमिशन .. प्लिज गो अहेड "
मिहीर " तू खुश आहेस ना ? का तुला असे वाटते कि मी कुठे येऊन फसले या वेड्या लोकांच्यात ? माणूस चंद्रावर गेला तरी अजून घरात साड्या नेसतात .. नवऱ्याला नावाने हाक मारत नाहीत "
सायली " हो ना .. अगदी सगळेच वेडे आहात ना तुम्ही .. ग्रेट मिहीर .. किती परफेक्ट माझ्या मनाचा तळ गाठलास रे .. थँक्स .. यु आर द वन हू नोज मी इन्साईड अँड आऊट "
मिहीर चे हे बोलणे ऐकून सायलीला कळून चुकले होते जे मी इकडे १० दिवस केले ते सगळे पाण्यात गेलेले आहे .. आय आम फेल . डोळ्यात आलेला अश्रूंचा आवंढा लिटरली तिने गिळला . आणि ती आत जायला निघाली .. उठली आणि निघणारच होती तर त्याने हात पकडला .. " थांब ना .. का चाललीस "
सायली " वेड्या माणसानं बरोबर टाईम वेस्ट घालवायला मी वेडी नाहीये .. आय थिंक मिशन मिताली नाही .. तुला मिशन सायली च घ्यावे लागेल आता ..बाय द वे उद्या सकाळी मी निघून जाईन .. वेड्या माणसं बरोबर थांबून माझा वेळ वाया घालवायचा नाहीये "
मिहीर " अरे .. काय झाले तुला ? आता तर बरी होतीस .. मी तुला का विचारले कारण खूप कल्चरल गॅप पडतो ना तुझ्या साठी म्हणून बोललो .. "
सायली " हो .. ठीक आहे .. मी तुला एक विचारते .. तू तिकडे खुश असल्याचे ढोंग करतोस का इकडे ढोंग करतोस ?"
मिहीर " ओह ..शट अप .. मी काही ढोंग करत नाही.. आय आम लाइक धिस ओन्ली "
सायली " मग बहुदा मीच ओळखायला चुकले .. "
मिहीर " माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता बाकी सगळे बोलतेस .. तू नेहमी असेच करतेस .. मुख्य मुद्दा आला कि त्याला फेस न करता त्याला अव्हॉइड करतेस "
सायली " तुला काय हवय माझ्या कडून ? का मला छळतोयस तू ? इकडे आल्या पासून मी बघतेय तुझी बुद्धी गहाण टाकलीस का तू ? का माझ्याशी भांडण उकरून कढतोयस ?"
मिहीर " अरे .. ह्यात काय मी करतोय ? मला स्पष्ट बोलायला आवडते .. तुला ते अजिबात आवडत नाही त्यामुळे तुला ते असे वाटतंय ?"
सायली " काय स्पष्ट पाहिजे तुला माझ्या कडून बोल .. आज मला सगळेच विषय क्लीअर करायचेत ..तू विचार त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आता देते .. बोल .. तू "
मिहीर " तेच तुला इकडे आल्यावर कसे वाटते ? तुला इकडे राहण्यासाठी बिग कॉम्प्रोमाइज करावे लागतंय असे वाटतंय का ?"
सायली " नाऊ यु आर यूझिंग शुगर कोटेड वर्डस ?" ओके माय अन्सर इझ .. मी इकडे खूप अनकंफर्टेबल असते .. कारण मला वाटते कि काश कि मी लता वहिनीं सारखी सर्वगुण संपन्न असते .. मी इकडे अनकंफर्टेबल असते कारण मी सुगरण नाहीये .. कारण मी नीट साडी कॅरी नाही करू शकत .. कारण मला संसार करायचं कसा हे कळत नाही .. कारण मला नवऱ्याला खुश कसे ठेवावे हे कळत नाही .. कारण मी नवऱ्याला त्याला पाहिजे असलेले शारीरिक सुख पण देत नाही .. अजून क्लीअर पाहिजे ..मी लग्नाला १० महिने झाले तरी तरी प्रेग्नंट राहिले नाही .. माझ्या मागून लग्न झालेले आता आई बाप बनतील .. बोल नेक्स्ट प्रश्न
मिहीर " तुला असे वाटते का मी तुझ्यावर माझी मतं लादतो का ?"
सायली " मी माझ्या मर्जीची मालक जन्माला आल्या पासून होते ते मी तशीच आहे .. जोपर्यंत कोणतीही गोष्ट मला पटत नाही तोपयंत मी ती कधीच करत नाही " नेक्स्ट
मिहीर " तुला मी डोक्यावर पडलोय असे वाटते का ?" आणि हसायला लागतो
सायली " नो .. यु आर डुईंग धिस इंटेन्शनली .. यु आर स्टील जाजिंग मी " नेक्स्ट
मिहीर " तुला जर मी उद्या दुसऱ्या कोणा मुली बरोबर दिसलो तर तुझा माझ्यावरचा विश्वास जाईल का ?"
सायली " हो .. नक्कीच .. तू कोणत्या स्थितीत तिच्या बरोबर आहेस त्यावर ते मी ठरवेन .. म्हणजे तुझा हात कुठे होता ? तुझे तोंड कुठे होते ? त्याही पेक्षा तुझ्या डोळ्यात बघून मला कळेल .
मिहीर " आणि माझे डोळे बंद असले तर "
सायली " काय झोपणार आहेस का ? मग तर तू गेलासच ..तिथल्या तिथे झोडून काढेन दोघांना .. अँड आय मिन इट .. आय एम टेलिंग यु .."नेक्स्ट .. आणि किती स्पष्ट पाहिजे तेवढे स्पष्ट बोल आज मला फारच स्पष्ट बोलायचं ..
मिहीर " अरे हो.. मला प्रश्न सुचू तर दे ..
मिहीर " उद्या तुला असे वाटेल का कि मी मितालीला ती मिताली आहे तरीही मुद्दामून सायली आहे असे दाखवून तिच्या जवळ गेलो "
सायली " उद्या ? जरी मी आज माझ्या डोळ्याने पहिले असते ना तरीही असे नसते वाटले .. एवढा तर तू नीच नाहीयेस याची खात्री आहे मला "
मिहीर " कशा वरून ? अशी किती ओळखतेस मला .. कदाचित मी ऑफिस मध्ये पण पोरींच्या घोळक्यात असू शकतो ?"
सायली " मला माझे मन सांगते .. कोण किती नालायक आहे ते .. मला बरोबर कळते .. उगाच नाही मी ऑफिस मध्ये २०० लोकांची टीम हॅन्डल करत "
मिहीर " तुला जर उद्या माझ्या मित्राने सांगितले कि माझी आधी एक गर्ल फ्रेंड होती तर ?"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा