Login

विभक्त भाग ५६

in this part sayli delivers baby boy

विभक्त भाग ५६

क्रमश: भाग ५५

मिहीर तिकडे सारखा कॉल करून सांगत होता .. सायली बॅग्स हेवी करू नकोस .. एअरपोर्ट वर डॉलर एक्सचेंज करून ठेव . शिवाय घरचा ऍड्रेस वेगळा लिहून ठेव . एअरपोर्ट वर एक्सिट च्या इथे मी बाहेरच असेलच .. माझा इकडचा  नंबर लिहून  ठेव .. जर चुकामुक झालीच तर मला कॉल कर .. शेवटी त्याला पण ती एकटी येणार त्यामुळे टेन्शन आलेच होते .. फ्लाईट मध्ये विंडो सीट मागून घे .. शेजारी लेडीज पॅसेंजर मागून घे किन्वा एमटी सीट प्रिफेर्ड असे सांग .. अश्या एक नाही अनेक सूचना मिहीर तिला देत होता ..

फायनली सायली मॅडम सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन फ्लाईट मध्ये बसल्या .. इकडे सायली आणि तिकडे मिहीर दोघे खूप एक्ससायटेड होते ..

तब्बल   १८ तासांचा प्रवास करून सायली USA ला पोहचली .. मिहीर ने सांगितलेल्या सगळ्या सूचना किती महत्वाच्या होत्या हे तिला प्रत्येक  गोष्ट करताना जाणवत होते . त्याने तिला एकेक टप्पा कसा येईल ते सांगितले होते आणि तसेच घडत होते .. आणि फायनली इमिग्रेशन करून , समान घेऊन सायली एअरपोर्ट च्या एक्सिट च्या इथे आली आणि तिची नजर मिहीर ला शोधू लागली .. मिहीर समोरच उभा होता .. साधारण डोळ्यांनी दिसतोय पण त्याच्या जवळ जाण्यासाठी अजून पाच एक मिनिटांचा वॉक घ्यावा लागत होता ..अठरा तासांच्या प्रवासाचे काही वाटले नाही पण हा पाच मिनिटाचा वॉक होता तो खूप त्रासदायक वाटत होता . पाय जड झालेले आणि डोळ्यांचे  काठ  गंगा यमुनांनी तंतोतंत भरले भरले होते ..मिहीर च्या स्पर्शासाठी तिचे मन आसुसले होते .. तब्ब्ल दोन महिन्यांनी तिला तिचा नवरा दिसत होता .. आणि आता तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा दिसत होता ..

मिहीर ला तर काय विचारूच नका इथेच तिला खांद्यावर उचलू का ? मिठीत घेऊ का ? काय काय करू असे झाले होते ..

सायली त्याच्या समोर आली .. दोघांनी इतका वेळ मनात काय काय विचार केला होता कि मी इथेच तिला मिठीत घेईन .. मी इथेच किस करेन.. पण प्रत्यक्षात दोघे एकमेकांना  फक्त बघत बसले .दोघांच्याही डोळ्यात आनंदाच्या धारा वाहिल्या .. मिहीर ने आधी तिच्याकडच्या सगळ्या सामानाची जवाबदारी घेतली

मिहीर " कशी आहेस आणि तिला एक घट्ट मिठी मारली " आय मिस्ड यु सो मच .. थँक्स फॉर कमिंग "

सायली " मी टु .. आणि सायली पण त्याच्या  मिठीत विसावली .. " किती समाधान होते त्या मिठीत .. ते फक्त त्या दोघांनाच  माहित .

मग दोघे घरी आले .. मिहीर ने मस्त सायलीचे वेलकम केले .. छान बलून्स लावले होते .. प्लिझन्ट ..सायली पण खूप खुश झाली .. बायको ला पॅम्परिंग  कसे करायचे ते मिहीर ला चांगलेच जमायचे ..

मिहीर "माऊ .. जरा बारीक झालीस का ?"

सायली " हो ना .. "

मिहीर " ठीक आहे .. आता इकडे खूप अराम कर .. तसेही तुझे जॉइनिंग पुढच्या वीक मध्ये आहे .. तुला आता वेळ मिळेल आरामाला .. बघ आता तुला कशी पुन्हा जाडी करतो .. घरात सायली येणार म्हणून लागेल ते सामान आणून ठेवले होते ..

सायली पण जेवली आणि फ्रेश होऊन मिहीर च्या कुशीत मस्त झोपून गेली .. प्रवासाचा शिणवटा पण आलाच  होता ..

इकडे मिहीर ने सगळ्यांना फोन करून कळवले .. सायली पोहचली  .. बरी आहे .. उद्या फोन वर बोलेल .. "

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जरा तिला फ्रेश वाटू लागले ..

मिहीर " झाली का झोप ? तब्बल १६ तास झोपल्यात मॅडम तुम्ही "

सायली " हो का ? अरे मग उठवायचे नाहीस का ?"

मिहीर " नाही ग .. म्हटले अराम हाऊ दे .. आणि जेटलॅग पण असतोच ना "

सायली फ्रेश झाल्यावर मग म्हणाली " घर खूप छान आहे .. घर कसले बंगलाच आहे . किचन पण मस्त .. आणि मर्सिडीझ .. मिहीर साहेब काय खरं नाही बाबा तुमचे .. कंपनीने डायरेक्ट मर्सिडीझ दिली .. "

मिहीर " मग .. तुला काय मी कमी वाटलो का ?   "

सायली बोल बोलता लाडात त्याच्या  मांडीवर जाऊन बसली ..

मिहीर " अरे वाह .. इकडे आल्यावर प्रगती आहे तुझ्यात .. नाहीतर मलाच जवळ यावे लागते "

सायली " गप रे .. मला तुला एक सांगायचंय .. आय डोन्ट नो तू कसा रिऍक्ट करशील पण कधी एकदा तुला सांगतेय असे झालेय "

मिहीर " बोला  मॅडम.. आपकी हर  ख्वाईश सर आंखो पर है ।

सायली " सांगू ?"

मिहीर " यु आर ब्लाशिग "

सायली " येस .. मिहीर तू .. ना ..

मिहीर  " अरे .. बोल ना .. मला आता अधीर नको करुस "

सायली " बघू कान  कर इकडे"

मिहीर " आता इथे कोण आहे .. बोल कि "

सायली " व्युई आर प्रेग्नेंट "

मिहीर " ए गप ए .. या बाबतीत मजाक नको .. यु नो .. हाऊ इमोशनल आय एम अबाऊट इट "

सायली " अरे .. मजाक काय .. खरंच सांगतेय .. आय एम २ मन्थस प्रेग्नन्ट "

मिहीर " आई शप्पथ .. सायली .. २ मंथस .. म्हणजे किती मोठे झाले बाळ आपले आणि तू मला आता सांगतेस .. बोल बोलता मिहीर ची सायली  झाली मिहीर लिटरली सायलीच्या सारखा मुसुमुसु रडू लागला .. मिहीर ला काय करू ? कुठे ठेवू ? कसे रिऍक्ट करू त्याला कळेचं ना "

मिहीर " सायली .. आय लव यु .. " थँक्स फॉर टेकिंग धिस डिसिजन . आता तर मी तिकडे नव्हतो .. तरी  पण तू बेबी कॅरी करायचा डिसिजन घेतल्या बद्दल थँक्स "

सायली " अरे.. थँक्स काय .. धिस इस माय जान .. नाऊ यु आर शिफटेड टू  सेकण्ड नंबर "

मिहीर  सायली च्या पोटावर हात ठवून बाळाची हालचाल पाहू लागला ..

सायली " अरे .. अजून अवकाश आहे त्याला .. पण  आता खूप सारी काळजी घ्यावी  लागणार आहे .. "

मिहीर " अरे .. यु डोन्ट वरी at  ऑल ..आय एम at युअर सर्विस "

सायलीने मिहीर ची स्वप्न पूर्ण करण्याचा  जसा काय सपाटाच लावला होता .. पहिले म्हणजे USA ला पोहचली .. दुसरे म्हणजे प्रेग्नंसी . तेही स्वतःचे करिअर बरबाद न करता .

सायली चे ऑफिस आणि मिहीर चे ऑफिस जवळ जवळ होते .. मिहीर आधी  तिला सोडायचा आणि मग त्याच्या ऑफिसला जायचा . तिथेच जवळ एक हॉस्पिटल होते जे कि दोघांनाही जवळ होते . लगेच तिकडच्या हॉस्पिटल ला जाऊन एक डॉक्टर ची ट्रीटमेंट सुरु केली . तिकडे काय लगेचच त्यांना कळले कि बेबी बॉय इज  कॉमिन्ग. बाहेरच्या देशात लगेच सांगून टाकतात .  

सायली जाम खुश होती. माझ्या वर देवाची  इतकी कृपा आहे कि देवाने मला एक मिहीर दिलाच आणि आता अजून एक मिहीर माझ्या पदरात घातलाय . मिहीर मात्र म्हणायचा अरे .. मला तर अजून एक सायली पाहिजे होती . असा त्यांचा सुखाचा संसार मस्त चालला .. दोघांनी एकमेकांची अपेक्षे पेक्षा जास्त काळजी घेतली ..

घरात व्हिडीओ कॉल करून सांगितले

मिहीर " आई , सायली प्रेग्नेंट आहे "

लीला बाई .. तात्या शिशिर लता सगळ्यांचे  डोळे आनंदाने भरले .. सगळ्यांनी सायलीला आशीर्वाद दिला ..

तात्या " मिहीर , नालायका .. इकडे येई पर्यंत थांबायचं  होतास ना "

मिहीर " तात्या " अहो .. सायली आली तेव्हाच दोन महिने झाले होते .. मलाच इकडे आल्यावर कळले "

तात्या " सायली .. मूर्ख कुठली .. आधी का नाही सांगितलेस? "

सायली " सॉरी तात्या .. तुम्ही मला इकडे पाठवले असते का मग ? तुम्हीच सांगा ?

तात्या " नक्कीच नाही .. "तात्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते

मिहीर " असू दे .. आम्ही इकडे खूप खुश आहोत .. "

मधेच सागर आणि सावनी .. मोबाईलच्या स्क्रीन वर सायली ला किशी देत .. "

तर अश्या पद्धतीने सगळीकडे आंनदी आनंद होता .

दोघेही कामात खूप हुशार होतेच .. म्हणतात ना टॅलेंट असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा .. हिरा आहे तर तो चमकणारच. त्याप्रमाणे सायलीने आणि मिहीर ने कामाच्या बाबतीत कुठेही कमी केली नाही .. मन लावून दिलेले काम आणि शिकण्याची प्रवूत्ती असल्याने ऑफिस  मध्ये छान सेट झाले . USA चे  दोघांचे बॉस दोघांवर खुश होते .. तश्या प्रकारचे मेल फीडबॅक इंडियात सारखे येत होते .

एकदा सायली रात्री गोळ्या खाल्ल्या नंतर दूध प्यायला नको म्हणत होती तर मिहीर तिच्यावर ओरडला .. तर सायलीला रडू येऊ लागले . शेवटी तिला दूध प्यायलाच लावले त्याने आणि मग तिच्या पोटाच्या इथे जाऊन बोलला " सॉरी तुझ्या मम्मा ला ओरडलो .. " असे बोलल्यावर बाळाने अशी एक किक मारली कि दोघांना हा नादच लागला .. मिहीर ने सॉरी बोलायचं आणि मग तो किक मारायचा .. तर असे बाळाचे आणि त्याच्या बाबाचे संभाषण आठव्या  महिन्या पासून सुरु झाले .

बोल  बोलता सायलीची डिलिव्हरी डेट जवळ आली . मिहीर जरा अलर्टच होता . आणि सायली पण स्वतः अलर्ट होती . दोघांनी हॉस्पिटल च्या मॅडम ला सांगून ठेवले होते जर गरज पडली तर आहे तिकडे अम्बूलंन्स पाठवा .. एखाद्या बाईने जशी सेवा करावी तशीच सेवा मिहीर ने सायलीची केली. स्वतः जेवण करून भरवायचा .. औषध गोळ्या .. गरम पाणी , नंतर नंतर तिला खालची जमीन दिसायची नाही .. हा तिला स्पेशल परमिशन घेऊन तिच्या डेस्क पर्यंत बसवायला जायचा . जे जे डॉक्टर सांगेल ते तो करायचा ..

फायनली सायली डेलिव्हर्स  अ बेबी बॉय .. आणि त्या क्षणाचा साक्षिदार स्वतः मिहीर होता . सायली  ला होत असलेल्या प्रत्येक  वेदनेचा तो साक्षिदार होता . थोड्याच वेळात त्याचा मुलगा त्याच्या हातात आला .. .... आपल्या हातात एक बाहुला ठेवावा इतका तो गोंडस होता. मिहीर ने त्याच्या डोक्यावर किस केले तर थोडासा हसला .. मग मिहीर ने त्याला सॉरी म्हंटले तर पुन्हा हसायला लागला .. “अरे काय आहे हा .. एकदा तुला ओरडलो तर माझ्याकडून कितीदा सॉरी बोलून घेतोय बघ .. “

सायली " बघू .. कोणा  सारखा दिसतोय ?"

मिहीर ने बाळाला सायलीच्या जवळ ठेवले .. सायलीच्या पण डोळ्यात आनंदाश्रू होते .. त्याच्या डोक्यावरून हलक्या हाताने हात फिरवत म्हणाली " गुड बॉय आहे .. मला अजिबात त्रास दिला नाही .. मला ९ महिने काम पण करून दिले .. सेम अगदी बाबा सारखा आहे... 

घरी व्हिडीओ कॉल करून बेबी दाखवला .. सगळ्यांचं सायली मिहीर कधी येतात असे झाले होते .

मिहीर ने दोघांच्याही कपाळावर  किस केले. पुढे काय घरातली गडबड .. आवाज ... रडारड .. जागरणे खूपच वाढली . तरीही त्याला जेवढी सायलीची काळजी घेता येत होती तेवढी तो घेत होता  . हॉस्पिटल मधून एक सिस्टर बेबी ला अंघोळ घालायला यायची.

बाहेरच्या देशात तर वोर्किंग वूमेन्स ला खूप फॅसिलिटी असतात . त्याचा आधार घेत दोघांनी त्यांचे काम चालू ठेवले . मग त्याच सिस्टर ला खास बाळाला बघायला घरी ठेवले .. सायली तिला जमेल तेवढा मॅक्सिमम वेळ देतच होती . मिहीर पण  जमेल तसा  वेळ काढायचा

हळू हळू इकडे पण त्याचे रुटीन खूप छान सेट झाले . दोघांनी दोघांची कामे वाटून घेतली . दोघांच्या वेळा ठरवून घेतल्या .. मी सकाळी  सांभाळीन .. तू रात्री सांभाळ .. दुपारी सांभाळायला सिस्टरअसायची .. ज्याला जमेल ते काम करायचे आणि आनंदात होते .. मनाने ठरवले ना कि काही कठीण नसते . मुळात दोघांना एकमेकांची साथ होती त्यामुळे अजून तिसरा असता तर नक्कीच चाललं असते पण त्याच्या वाचून काही अडले नाही .

मिहीर जसा म्हणाला होता सायलीला कि सगळे शक्य आहे जर आपण दोघे एक टीम असलो तर . अगदी तसेच  त्यांची दोघांची टीम उत्तम प्रकारे संसार आणि दोघांचे करिअर सांभाळत होते .

आता पर्यंत थोडे तिकडे पण फ्रेंड्स झाले होते .. मग सर्वांना बोलावून बाळाचे घरातल्या घरात बारसे केले . बाळाचे नाव 'आदित्य' ठेवले .  हे दोघे त्याला लाडाने 'आदी 'असे बोलायचे .

0

🎭 Series Post

View all