Login

अलक ६( विचारांचे तरंग)

अलक
'जन्मोजन्मीची गाठ बांधलेली ती कंदिलाच्या अंधुक प्रकाशात देवाचे आभार मानून उद्याची प्रसन्न सकाळ होण्याचे स्वप्न पहात झोपी गेली. पण नियतीने डाव साधून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे झालेल्या भुस्खलनामध्ये तो शेतातल्या मातीत आणि ती झोपडीच्या जमिनीत गडप झालीत. नियतीने दोघांनाही कायमचे दूर करूनही एकत्रच मृत्युच्या दारी पाठवले.'