Login

अलक ७(विचारांचे तरंग)

अलक
रात्रीच्या वेळी ती बसची वाट पाहत स्टॉप वर उभी होती.‌ इतक्यात एक अनोळखी मुलगा गाडी घेऊन आला.
"त्याने तिचा हात धरून गाडीवर बसण्यासाठी जबरदस्ती करू लागला. अग, चल मी सोडतो तुला घरी."
तिने त्याचा प्रतिकार करत त्याच्या कानशिलात लगावली.
"परत जर का माझ्या नादाला लागलास तर पोलिसांच्या हवाली करेल. आज फक्त एका थापडीवर निभावले आहे. कारण ज्यांनी तुला जन्म दिले ते मायबाप तुझी घरी वाट बघत असतील."
ते शब्द कानावर पडताच तो तेथून निमूटपणे निघून गेला.
©® अश्विनी मिश्रीकोटकर