विधवा - एक नवा प्रवास. भाग - २
त्या रात्री ती प्रथमच स्वतःशी बोलली...."माझं आयुष्य खरंच संपलं आहे का?" यावर तिने विचार केला तेव्हा तिच्यात नवीन उमेद निर्माण झाली आणि तिने तिचं जुनं एम.ए. चं प्रमाणपत्र बाहेर काढलं. एक अर्ज लिहिला – "महिला सक्षमीकरण केंद्रात स्वयंसेवक होण्याचा."
त्यानंतर संध्याला एक आठवड्यातच मुलाखतीला बोलावण्यात आले. मग संध्याने निर्णय घेतला की आता मागे फिरायचे नाही.
तिने सासूबाईंना सांगितलं तेव्हा त्यांनी रागाने विचारलं, "तू विधवा आहेस. आता कामधंदा करून काय उपयोग?" त्यांचं बोलणं तिला आजिबात पटलं नाही संध्या आज पहिल्यांदाच शांत पण ठाम आवाजात म्हणाली,
"माझं दुःख कमी करायला काम उपयोगी पडणार आहे, गप्प बसणं नाही, त्यामुळे मी हे करणारच आहे." तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता त्यामुळे त्याही तिला विरोध करू शकल्या नाही.
"माझं दुःख कमी करायला काम उपयोगी पडणार आहे, गप्प बसणं नाही, त्यामुळे मी हे करणारच आहे." तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता त्यामुळे त्याही तिला विरोध करू शकल्या नाही.
केंद्रात काम करताना तिला अनेक महिला भेटल्या, त्या सुद्धा तिच्यासारख्याच होत्या.
एकीचं नाव होतं शीतल. ती २६ वर्षांची होती, पतीच्या मृत्यूनंतर माहेरी आलेली आणि तिचं शिक्षणही अर्धवट होतं.
रेणुका होती ती शारीरिक अत्याचाराला कंटाळून पळून आलेली आणि कविता विधवा होती, पदरात दोन मुलं असताना आत्महत्येचा विचार करायची.
संध्याने जेव्हा त्यांच्या कथा ऐकल्या तेव्हा तिला स्वतःचं दुःख लहान वाटू लागलं.
तिने त्यांना शिकवायला सुरुवात केली मराठी, इंग्रजी, हस्तकला, बॅंकिंग व्यवहार. या सगळ्यामुळे त्या महिलांमध्ये आत्मविश्वास वाढू लागला.
शितल होती तिला आजिबात हिशोब जमत नव्हता तो आता तिला जमू लागला. ती लगेच संध्याला सांगू लागली.
"ताई, हे बघ मी आता हिशोब लिहू शकते!" बोलताना शीतलचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संध्याला सुद्धा आनंद झाला.
एक दिवस त्यांच्या केंद्रामध्ये केंद्राचे प्रमुख विजय देशपांडे आले, ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी संध्याचं वर्गातलं काम पाहिलं आणि खूप खूश झाले.
"संध्या तुमच्यात नेतृत्व आहे. तुमच्यासारख्यांनी खरं तर स्वतःची संस्था चालवायला हवी." विजय देशपांडे म्हणाले त्यावर संध्या अचंबित झाली.
मी? मी एक विधवा आहे सर... मी कसं काय हे करू शकेल?" संध्याने विचारलं.
"नाही, तुम्ही आजिबात असा विचार करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही विधवा आहात, म्हणून दुर्बल नाही." विजय देशपांडे म्हणाले त्यावर संध्या त्यांच्या बोलण्याचाच विचार करू लागली आणि तिला ते पटायला पण लागलं, आपण काहीतरी करू शकतो याचा विश्वास तिला वाटू लागला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा