ईरा व्यासपिठाने ऐतिहासिक चॕम्पियन स्पर्धेला सुरवात केली आणि साहित्यक्षेत्रात या नव्या स्पर्धेने सांघिक लेखनाचा पाया रचला गेला. वेगवेगळ्या प्रांतातून सहभागी झालेले लेखक, लेखिका, स्पर्धेतील संघानी एकजुटीने पार पाडलेल्या अनेक फे-या, एकमेकांचे छान संवाद, जबाबदारीचे भान, जिंकण्याची जिद्द, लेखनातील विविधता व लेखनकौशल्य यामुळे ईरा चॕम्पियन ट्राॕफी नेहमी स्मरणात राहते. या स्पर्धेने अनेक सदाबहार लेखकांचा खजिना मिळाला त्यामुळे नवलेखकांंच्याशी नवे नाते जोडले गेले. अशाच यावर्षीच्या चॕम्पियन स्पर्धेत जैव तंत्रज्ञानान या क्षेत्राशी निगडीत असणा-या विद्या कुंभार या हरहुन्नरी लेखिकेची ओळख झाली.
यावर्षीच्या चॕम्पियन स्पर्धेला सुरवात झाली. संघ पाडले गेले. प्रत्येक संघात नवे चेहरे सामिल झाले होते. आमच्या संघात आम्ही आठ सदस्य होतो. संघाची धुरा अपर्णाजी यांनी छान सांभाळली होती. यातील एका लेखिकेने आम्हाला खूप प्रभावीत केले त्या म्हणजे विद्या कुंभार …! स्पर्धेतील पहिल्या रहस्यकथेच्या फेरीत त्यांनी दर्जेदार कथा लिहून आपली चुणूक दाखवली. नंतर संघात त्यांचा संवाद वाढल्यामुळे त्यांच्यातील उत्साह दिसून आला. हिच नामी संधी साधून संघनायक अपर्णाजी यांनी त्यांच्यावर कथेंचे व इतर साहित्यांचे प्रुफ रिडिंगची करण्याची जबाबदारी दिली आणि ती त्यांनी शेवटपर्यत समर्थनपणे सांभाळली.
अलक फेरीमध्ये त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अलकचे नियम व अलक कमी शब्दात कसे लिहायचे याबद्दल त्यांनी योग्य माहिती दिली. त्यांच्यामुळे स्पर्धेत आमच्या संघाने अलकचे शतक साजरे झाले.
स्पर्धा चालू असतानाच त्यांच्यावर आणखी एक कौटुंबिक जबाबदारी पडली. त्यांच्या वडिलांचे आॕपरेशन झालेमुळे त्यांची सगळी सेवा त्यांना करावी लागत होती. वेळच्यावेळी त्यांना औषधे देणे, जेवण देणे त्याचबरोबर डॉक्टरकडे तपासणीसाठी वेळोवेळी जाणे, त्याचबरोबर स्वतःचे वर्क फाॕर्म होम काम या सगळ्या धावपळीत त्यांनी स्पर्धेसाठी वेळ दिला. दोन प्रेमकथा व एक दिर्घकथा आणि दोन अद्भूत लेख लिहले. जमेल त्या वेळेत प्रुफ रिडिंग करुन दिले. घरी पेशंट असताना त्यांनी संघहित डोळ्यासमोर ठेऊन काम केले याबाबत त्यांच्या कठोर मानसिकतेचे व संघभावनेचे कार्य ठळकपणे दिसून आले.
माझ्यासह अपर्णाजी,राखीजी, मुक्ताजी गीतांजलीजी,भाग्यश्रीजी व रितीकाजी या संघ सहका-यासोबत चांगला संवाद ठेवून लेखनासंदर्भात मदत केली. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत त्यांचा सहभाग प्रेरणादायक होता. साहित्यातील कथामालिका, अलक, चारोळी, कविता अशा विविध प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. अनेक स्पर्धेतही त्यांचे यश उल्लेखनीय आहे.
बोलका स्वभाव, मदतीची भावना, दुस-यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा, स्पष्टवक्तेपणा , आदर व सन्मानाची भावना, कोणतेही काम कष्टाने व जिद्दीने करण्याची तयारी अशा विविध गुणांनी बहलेल्या विद्याजीना वाढदिवसाच्या या सोनेरी क्षणाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा …!! तुमचे पुढील जीवन आरोग्यदायी व भरभराटीचे जावे सदिच्छा …!! यापुढेही आपल्याकडून असेच मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा …!!
❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
©®नामदेवपाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा