विजय-2

दुसरं लग्न आणि लेकराची हेळसांड
"मी जड झाली असेल तर सांगा मला..निघून जाईल मी.."

"कुठे जाशील? दुसरं घर आहे का तुला? आता संसार करण्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही..कर एकदाचं लग्न आणि आम्हाला कर मोकळी.."

आई वडील असं तोंडावर बोलायचे, तिची मनस्थिती काय आहे कसला कसला विचार न करता तिला बोलायचे..

चेतना पहिल्या धक्क्यातून कशीबशी सावरत असायची तोच आई वडील तिला बोलून बोलून मानसिक त्रास देत होते..

असंच एकदा तिच्या आईवडिलांना तिच्या आत्याने एक जवळचं स्थळ सुचवलं..मुलगा देखणा होता..त्याची बायकोही आजारपणात गेली होती..त्याला दोन लहान मुलं होती..मुलगा श्रीमंत होता..पण त्याच्या मुलांना फक्त आईची कमी होती..

चेतनाच्या आई वडिलांनी ठरवलं, या मुलाला नाही म्हणण्यासारखं काहीही नाही..त्यांनी चेतनाला प्रेमाने समजावलं..

"बाळा, तुझ्यापुढे आयुष्य पडलं आहे, ते एकटीने नाही काढता येणार..जोडीदार हवाच..हा मुलगा तुला शोभेल असा आहे.."

चेतना त्यांच्या गोड बोलण्याला भुलली, तिने प्रश्न केला..

"पण माझ्या रोहनला ते स्वीकारतील??"

"हो अर्थात.." वडिलांना मागे खेचत आई म्हणाली...वडील प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघत होते..

चेतनाने विचार केला, जर माझ्या आणि त्याच्या मुलांना आई वडील मिळणार असतील तर काही हरकत नाही.. चेतनाने होकार दर्शवताच घरच्यांना आनंद झाला, सर्वजण लग्नाच्या तयारीला लागले..

"बाबा, लग्नाआधी आम्हाला बसून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत..आम्हाला भेटायचं आहे.."

"हे बघ बाळ, आता जास्त ताणू नकोस..लग्न अगदी आपल्या चार लोकात आणि 4 दिवसात करायचं आहे.."

आई वडिलांनी दोघेही एकमेकांना भेटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती...

लग्नाचा दिवस उजाडला.. चेतना आणि तिचा होणारा नवरा एका छोट्याशा हॉल मध्ये पोचले..घरातलीच अगदी 5-6 मंडळी उपस्थित होती..

गुरुजी ट्राफिक मध्ये अडकले असल्याने त्यांना यायला अजून अवकाश होता..चेतना आणि तिचा होणारा नवरा यांना बाजूच्याच खुर्चीवर बसवण्यात आलेलं..

🎭 Series Post

View all