Login

गावाकडची तरुणाई

गावाकडील तरुणाईची दिशा ...


     गावाकडची तरुणाई

गावाकडचा मी ,
आलो शहरात शिकायला
कामधंदा इथं शिकू
सांगु गावाकडच्या तरुणाईला .
     वाटलं होतं गावाकडं जाऊन
     काहीतरी कामधंदा करू,
    गावाकडच्या तरुणांना
    रोजगार मिळवून देऊ,
एक दिवस भेटलो सरपंचाला
म्हणलं साहेब घेऊ एक मिटिंग
तरुणांना रोजगार देऊ
करू काही सेटिंग

सरपंच म्हणाले पोट्टयायले
ऐका बे निखिल रावांचं
  कर्तव्य यंदा करायचं
बघा आता पोटा पाण्याचं ,
म्या मंग पोट्टयायले म्हणलं
काम देतो पोट्टेहो ,
रोज रुपये पाचशे देतो,
दोन येेळा चहा देतो.
पटते का सांगुन द्या,
घर मवं बांधुन द्या.
                       तवा पोट्टे म्हणे मले,

        दिवसभर पत्त्याच्या
        डावावर बसतो,
       रोज हजार तरी आणतो ,
        सांजच्याला गुत्त्यावर
       दारू ढसाढसा पितो,
    रातच्याला मटण रोज खातो,
         तवा तुमचे पाचशे
          तुम्हालाच ठेवा,
       नका देऊ तुमचा चहा,
       तुमच्या घर बांधायचं
      कसं तेवढं तुम्हीच पहा
         तेवढं तुम्हीच पहा ...!