प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विनोद आणि कुटुंब भाग -१
शाळेत मुलांचा पहिल्या चाचणीचा निकाल होता त्यासाठी माया आपल्या मुलाच्या शाळेत दाखल झाली.
एक एक करत सर्वच विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात आले. मायाने आधी आपल्या मुलीचे गुणपत्रक घेतले त्यानंतर आपल्या मुलाचे गुणपत्रक घ्यायला ती त्याचा वर्गात गेली.
सर्व झाल्यावर ती घरी आली.
सर्व झाल्यावर ती घरी आली.
"काय गं? तू का अशी शांत बसली आहेस?" प्रथम निनावे म्हणजेच मायाचा नवरा विचारत होता.
"काय सांगू तुम्हाला?" ती जरा उदास चेहऱ्याने म्हणाली.
"जे सांगावेसे वाटते ते सांग." मोबाईलमध्ये पाहून तिला म्हणाला.
माया पुढे म्हणाली, "अहो, आज मी विनोदच्या शाळेत गेले होते. तिथे त्याच्या वर्गशिक्षिका म्हणत होत्या की त्याचे गणित कच्चे आहे ते तुम्ही पक्के करा."
"गणित कधी कच्चे असते का? आणि ते काय कोणते फळ आहे का की कच्चे असल्यावर त्याला पक्के करायचे म्हणजे पिकवायचे?" असे म्हणून स्वतःच प्रथम हसू लागला.
त्याच्या ह्या पांचट बोलण्याला वैतागून माया म्हणाली की,
"आपण त्याचा गणित विषयाचा जास्त अभ्यास घेवू. हल्ली शाळेत पण तो लक्ष देत नाही असे मी ऐकले आहे. त्याच्या शिक्षिका म्हणत होत्या की तो फक्त गप्पा मारतो आणि जास्त मस्ती करतो." आपल्या मुलाबद्दल अजून माहिती ती देते.
"आपण त्याचा गणित विषयाचा जास्त अभ्यास घेवू. हल्ली शाळेत पण तो लक्ष देत नाही असे मी ऐकले आहे. त्याच्या शिक्षिका म्हणत होत्या की तो फक्त गप्पा मारतो आणि जास्त मस्ती करतो." आपल्या मुलाबद्दल अजून माहिती ती देते.
रात्री काहीतरी आपण ह्यावर तोडगा काढायचा असे दोघांनी ठरवले.
नीला ही विनोदची मोठी बहीण आणि प्रथम- मायाची मोठी मुलगी. ती अभ्यासात जेमतेम होती पण स्वभावाने शांत होती. आपल्या आईवडिलांच्या शब्दांच्या बाहेर जाणारी ती नव्हती.
"विनोद, इकडे ये." माया त्याला हॉल मध्ये आवाज देत म्हणाली.
"बोला, मामोश्री काय झाली?" असे त्याने विचारले.
'फक्त गणित नाहीतर मराठी पण ह्याला नीट येत नाही.' असे मनात बोलून मायाने नकारात मान हलवली.
"मातोश्री बोलतात, मामोश्री नाही. काय झाले असे विचारतात. काय झाली ? असे नाही." आतापासूनच त्याला नीट बोलता यायला हवे म्हणून मायाने बोलायला सुरुवात केली.
आपला मस्तीखोर मुलगा काही रागावून ऐकणारा नाहीये. त्यामुळे त्याला कशात आवड आहे ह्याचा ती विचार करत होती. तसेच नेमकी समस्या काय आहे की त्याला साधी गणिते सोडवता येत नाहीत ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी त्याचे बाबा प्रयत्न करायचा विचार करतात.
"विनोद बाळा, तुला गणिते सोडवताना काय चुकते हे समजते का?" आपल्या मुलाला शांतपणे त्याचे बाबा विचारत होते.
"बाबा, मी खूप प्रयत्न करतो. म्हणजे हाताने काउन्ट करतो तरीही माझे उत्तर आणि बाकीच्यांचे उत्तर वेगळे असते. त्यामुळे माझे ते चुकते." अगदी निरागस चेहरा करून तो सांगत असतो.
"अरे बापरे, तुझे असे काय उत्तर येते ?" नीला पण त्याला विचारते.
"म्हणजे बघ दोन रुपये दिले आणि त्यातील एक रुपया दिला तर एक रुपया राहतो ना? तसेच तीन रुपये दिल्यावर एक रुपया दिल्यावर तीनच राहतात ना?" ह्याने त्याची बुद्धी कशी वापरली ते सांगितले.
आता हे उत्तर ऐकून तिघेही हा कोणत्या पद्धतीचे गणित शिकत आहे हे त्यांना समजत नव्हते.
त्यांनी आता ह्यावर उपाय करण्यासाठी काय करावे ह्यावर उपाय शोधायला सुरुवात केली.
प्रथमला तर आपला मुलगा किती जीव तोडून प्रयत्न करत आहे हे दिसत आहे असेच वाटते. त्यामुळे त्याने नाही येत तर राहू दे असेच म्हंटले कारण त्यालाही कुठे चित्रकलेच्या तासाला चित्र येत होते. तरी त्याचे पुढे अडले नव्हते. आता कॅल्क्युलेटर आहे आणि मोबाईलवर तर लगेच उत्तर समजते.
"तुम्ही नको तिथे भावनिक होऊ नका. त्याला हा साधा हिशोब यायलाच हवा. उद्या पुढे जावून त्याच्या ह्या गणित अज्ञानाचा कोणी फायदा घेतला तर किती नुकसान होईल?" माया चिडत म्हणाली.
तेवढ्यात प्रथमने पुढच्या भविष्याचा विचार केला की, एक गाडी खरेदीसाठी विनोद गेला होता. त्याने काही कर्ज काढले होते. तर त्याचा ताळमेळ त्याला जमत नव्हता आणि शेवटी त्याला कर्जासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत होते. हे चित्र त्याने कल्पनेने समोर उभे केले आणि नाही म्हणत वास्तवात आला.
"तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. विनोदचा विनोद नको व्हायला. आपण काहीतरी मार्ग काढू पण दुसरी शिकवणी लावायची म्हणजे त्याला आधीच दोन शिकवणी लावली होती त्या सर आणि मॅडमनीही हात टेकले. आता त्याच्यासाठी कुठे नवीन शिक्षक शोधायचा?" प्रथम डोक्याला हात लावून खाली बसला.
नीला आणि विनोद बाहेर चॉकलेट्स वरून भांडत होते. त्यांचा खूप गोंगाट चालू होता.
"नाही हे दोन माझे आहे. ते बघ तुला दोन मागच्यावेळी जास्त दिले होते." विनोद रागात म्हणाला.
"त्या आधी तू पण जास्त घेतले होतेस. तू हे मला दे. मी तुझी मोठी दीदी आहे माझे ऐक." नीला पण मागे हटत नव्हती.
"मी तुझा लहान माऊ आहे. त्यामुळे तू मला जास्त दे." तो तिच्या हातातून खेचत घेत म्हणाला.
"भाऊ म्हणतात विनोद त्याला माऊ नाही." नीला त्याला पाहून जोर जोरात हसायला लागली.
"हा तेच ते." तो गाल फुगवून खाली पडलेले चॉकलेट्स गोळा करत म्हणाला.
हे सर्व माया नीट लक्ष देवून पाहत होती. त्यातून तिला एक कल्पना सुचली पण ती कल्पना काम करेल की नाही ह्याची तिला शंका होती.
विनोद मस्त भांडून जास्तीचे मिळालेल्या चॉकलेटस् मोजत नंतर मिटक्या खात बहिणीला चिडवत खात होता.
मायाला कोणती कल्पना सुचली असेल?
पुढे काय होईल?
पुढे काय होईल?
क्रमशः
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
फोटो सौजन्य साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा