प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विनोद आणि कुटुंब भाग -२
दुसऱ्या दिवशी रविवार होता आता कल्पना केलेली कृतीत आणण्यासाठी माया प्रयत्न करणार होती.
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्याचे दोन मार्ग असतात एक तर साधा मार्ग आणि दुसरा मार्ग हा की समोरच्याला त्यात शिकण्यासाठी उत्सुकता निर्माण करण्यासाठी थोडे कष्ट घ्यायचे. तर मायाने दुसरा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला.
"विनोद इकडे ये बाळा." आईने बोलल्यावर तो जरा वैतागतच गेला.
"मी खेळत होतो ना तू कशाला मला बोलवले? आता दीदी जिंकेल." आपला राग व्यक्त करत म्हणाला.
"बरं मला वाटले की, तुला हे चिकू हवे आहेत म्हणून मी तुला देणार होते पण आता राहू दे. तू जा. मी तुझ्या दीदीला देते." माया म्हणाली.
"नाही, मला आता चिकू हवे आहेत. मी नंतर खेळतो." तो म्हणाला.
तिने त्याला चिकू खायला दिले. तो पुन्हा खेळायला जाणार तर आई म्हणाली की, "मी तुला पाच चिकू दिले होते. त्यातले तू दोन खाल्ले मग दोन राहिले आहेत तर ते तू ताईला दे." माया म्हणाली.
"आई, ही चीटिंग आहे. मी दोन खाल्ले तर तीन राहिले ना? मग दीदीलाही दोन चिकू दे." आपल्या पेक्षा एक चिकू जास्त मोठ्या बहिणीला तो कसा देणार म्हणून रागात म्हणाला.
"अरे सर्व संपले ना? पाच होते तू दोन खाल्ले आणि दीदीला दोन. झाले की." मुद्दाम त्याची आई म्हणाली.
"आणि हा एक राहतो ते? हे बघ मी दोन खाल्ले मग तू दीदीला दोन दिले चार झाले आणि पाचवा हा एक राहिलेला." तो पुन्हा सर्व मोजत म्हणाला.
"अरे वाह! शाब्बास! तुला तर सर्व बरोबर येते मोजता." त्यालाच त्याचे कोडे सोडवायला सांगून तिने बरोबर उत्तर काढले.
"मघ मी हा एक चिकू घेवू का?" तो हळूच म्हणाला.
"थांब , मला सांग जर हाच चिकू मला तुला आणि दीदीला द्यायचा असेल तर मी कसा द्यायला हवा?" पुन्हा प्रश्न त्याला विचारला.
"त्यात काय, हा असा मधून कापायचा आणि त्याचे दोन भाग होणार मग अर्धा मला आणि अर्धा दीदीला." त्याने उत्तर दिले.
'म्हणजे ह्याला खाण्यात जास्त रस आहे ते बरोबर डोक्यात ठेवून हा गणिते सोडवत आहे.' मायाने निष्कर्ष काढला.
आता ती त्याला सकाळ-संध्याकाळ मुद्दाम फळे-भाज्या आणायला घेवून जावू लागली. त्यामुळे त्याला बेरीज आणि वजाबाकी ह्याची गणिते तोंडी करता येवू लागली. जे वेगवेगळ्या शिकवण्या करूनही त्याच्या गणिताचे कोडे सोडत नव्हते ते मायाने त्याला अशी युक्ती लावून शिकवले.
दोन महिन्यांनी परीक्षा होती. आता आपल्या मुलाला नीट गणिते सोडवता येतील असे माया आणि प्रथमला वाटत होते.
गणिताच्या पेपरच्या दिवशी,
पेपरमध्ये काही गणिते होते की,
दहा आंबे होते आणि दोन आंबे खाल्ले तर किती राहिले?
लगेच विनोदने विचार केला की आईने मला दहा आंबे खायला दिले पण मी दोनच खाल्ले तर आठ आंबे शिल्लक राहिले.
लगेच विनोदने विचार केला की आईने मला दहा आंबे खायला दिले पण मी दोनच खाल्ले तर आठ आंबे शिल्लक राहिले.
जेव्हा मोठे गणित यायचे त्यात एका पेक्षा जास्त जण असायचे तेव्हा विनोद पुन्हा कल्पना करायचा पण त्यात त्याचा पेपर मात्र चुरगळलेला असायचा.
जसे की विजयने नीलाला वीस पैकी पाच लाडू दिले, विनोदला दोन लाडू दिले आणि शमाला तीन लाडू दिले.
इथे विनोदला कमी लाडू कमी दिले म्हणून राग यायचा आणि त्यातच तो रागात पेपर चुरगळायचा.
' विजयने दीदीला जास्त लाडू दिले आणि मला फक्त दोन. मग ते दहा लाडू ते राहिले ना?' असे म्हणत तो उत्तर लिहायचा.
कल्पना ही मनात करायची असे सांगूनही तो मोठ मोठ्याने बोलायचा म्हणून त्याला वेगळ्या वर्गात बसून परीक्षा द्यायला सांगितली.
पुन्हा निकाल जाहीर झाला आणि ह्यावेळेस विनोदला चांगले गुण प्राप्त झाले. हे कसे केले हे जाणून घेण्यासाठी त्याच्या वर्गशिक्षिकेने त्याच्या आईला बाजूला घेवून विचारले.
"काही नाही. त्याला अजून नीट समजून सांगितले त्यामुळे त्याला समजले." हसतच माया म्हणाली.
खरं तर सर्व मुलांवर शिक्षकांचे नीट लक्ष असावे आणि एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात कमकुवत असेल तर त्याकडे लक्ष देणे हे शिक्षकांचे काम आहे असे मायाला वाटत होते त्या गोष्टीचा राग तिला असल्याने विनोदच्या शिक्षकांना तिच्या युक्तीबद्दल सांगितले नाही.
घरी आल्यावर आपल्या मुलाने चांगले गुण प्राप्त केले म्हणून सर्व त्याच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ तिने बनवले होते.
विनोद पण खूश होता.
विनोद पण खूश होता.
नीला आणि विनोद नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत गेले.
विनोद घरी रागातच आला होता.
"ह्याला काय झाले?" बाबांनी रात्री विचारले.
"तो विचारूनही काही सांगत नाहीये." नीला म्हणाली.
"विनोद... विनोद..." माया त्याला आवाज देत होती.
त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
"काय झाले बाळा?" त्याचे आई-बाबा पुन्हा आता काय झाले म्हणून काळजीत पडले.
काय झाले असेल?
पाहूया पुढच्या भागात
क्रमशः
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
फोटो सौजन्य साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा