वीरगळ.. भाग २

कथा असफल प्रेमाची
वीरगळ.. भाग २


"इथून ऐकणं होईल का?" चारूलताने आपल्या मंजुळ आवाजात साद घातली.

"तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार नाही.. असं होईल का?" चारूदत्त तिला मिठीत घेत म्हणाला.

"इश्श्य.. असं काय ते वागणं? घरात सगळे आहेत म्हटलं." उसन्या रागाने चारूलता म्हणाली.

"असू देत.. आम्ही आमच्या मालकिणीला जवळ घेतलं आहे." त्याचे शब्द ऐकून चारूलताचा चेहरा लाजेने लाल झाला."

"काहीतरीच तुमचं.." त्याच्या मिठीतून बाहेर जायचा प्रयत्न करत ती म्हणाली.

"बरं.. आमचं राहिलं आमच्याकडे. तुम्ही कश्यासाठी आलात ते तरी सांगाल की नाही." मिश्किलपणे हसत चारूदत्त म्हणाला.

"तुम्ही ना हे असं सगळं विसरायला लावता मला. ऐका ना.. वहिनी बाळंत झाली आहे. तिला आणि बाळाला बघावसं फार वाटतं आहे. जाऊ का मी?" मोठ्या आशेने चारूलताने विचारले. तिचे बोलणे ऐकून चारूदत्ताचा चेहरा उतरला.

"आम्ही काही चुकीची मागणी केली का?"

"मागणी चुकीची नाही. पण बघा.. सगळीकडे मोगलांचा जोर आहे. आपण घरातच सुखरूप नाही. आणि तुमच्या माहेरापर्यंतचा प्रवास म्हणजे? त्यात आपली भाऊबंदकी."

"अवघड वाटत असेल तर राहू दे. आमचा काही हट्ट नाही." डोळ्यातलं पाणी मागे ढकलत चारुलता वळली.

"तुम्ही कधीतरी आमच्याकडे काहीतरी मागणार आणि आम्ही ते देणार नाही, असं होईल का? आपण रात्रीचा प्रवास करू. लपतछपत जाऊ." चारूदत्त म्हणाला.

"तुम्ही.. तुम्ही येणार माझ्यासोबत? खरंच?" चारूलताच्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता.

"हो.. पण हे कोणाला म्हणजे कोणालाच सांगू नका."

"सासूबाईंना सुद्धा नाही?"

"फक्त तिलाच सांगा. बाकी कोणालाच नाही." उत्साहाने ही बातमी सांगायला चारूलता वळली त्यामुळे चारूदत्तचा चिंताग्रस्त चेहरा तिला दिसलाच नाही. बोलता बोलता तो तरुण थांबला.

"पुढे काय झालं? गेली का ती माहेरी?" मगाशी त्या तरुणाबद्दल वाटलेली भिती विसरुन प्रज्ञाने विचारले.

"माहेरी जायला निघाली, पण पोहोचू शकली नाही." दुःखीपणे तो तरुण म्हणाला.

"म्हणजे??"

"ती माहेरी जाणार ही गोष्ट कोणीतरी बाहेर फोडली. कोणाच्या नजरेत यायला नको म्हणून दोघेही अंधार पडल्यावर निघाले होते. पण त्या अंधारानेच घात केला. इथेच त्या दोघांना त्या हल्लेखोरांनी घेरले. चारुलतेला पकडले. चारूदत्त सगळ्यांशी लढत होता. पण तो एकटा आणि ते पंधरावीसजण. त्यातल्या दहाजणांना त्याने लोळावले. ते बघून त्यांचा प्रमुख चिडला. त्याने चारूदत्तच्या वर्मी घाव घातला. जागच्याजागीच तो गेला."

"आणि मग चारूलता?" प्रज्ञाच्या डोळ्यात पाणी तराळलं.

"नवरा गेला हे बघून तिने लुगड्यात लपवलेली गुप्ती काढली आणि स्वतःवर चालवली. प्रेमाच्या शत्रूंनी अजून एक संसार उद्ध्वस्त केला."

"पण हे सगळं तुम्हाला कसं माहित?" विराजने विचारले.

"इकडे कोणाचातरी आवाज येतो आहे. इथेच असतील बघ ते." आवाज ऐकून प्रज्ञा परत घाबरली.

"ते गुंड.."

🎭 Series Post

View all