Login

विरहाचे आर्त

विरहाची आर्त हा लेख मनातील भावना व्यक्त करणारा लेख आहे
विरहाची आर्त..!


नको हा विरह आता 
तुटलेलं पान सांगतं 
आजन्म जोडलेल्या 
झाडाच्या फांदीला 
जेव्हा सोडावं लागतं
तेव्हा हृदय किती रडतं

आठवणीचा लपंडाव जेव्हा एकांतात सुरू होतो. तेव्हा असंख्य गोष्टी चलचित्राप्रमाणे डोळ्यासमोरून एक एक करत चांगले, वाईट, कटू अनुभव सांगतात. थोडा विचार करायला भाग पाडतात. नजरेसमोरून सारी चित्रे हळूहळू निघत जातात. मन मग शून्य होते. बघता बघता वयाचा आलेख कसा चढला इतका वाढला. काल परवाची तर गोष्ट होती. तो मला भेटला होता. आज अचानक असं काय झालं. असं अचानक त्याचं या जगातून निघून जाणं, बरोबर नाही. असं असंख्य चालू घडामोडी सतत घडत असतात. आपल्या कानावर येतात. मनाला या सर्व बातम्या एकूण डोळे अश्रूनी भरून येतात. तर कोणाच्या विचारांनीच मनाला धक्का बसतो. आता पुन्हा कधीही भेट होणार नाही. हा चेहरा पुन्हा दिसायला मिळणार नाही. शेवटचा तो क्षण, तो चेहरा डोळे बंद करून डोळ्यात साठवून ठेवावा लागतो. कधी मधी आठवण आली तर तो चेहरा न कळतच डोळ्यासमोर येतो. मग सुरू होतो त्या व्यक्तीच्या सहवासात सोबत घालवलेला वेळ. मन भारावून जाते. मग प्रश्न पडतो या पृथ्वीवर काहीही कायमस्वरूपी नाही. सर्वांचा अंत हा ठरलेला आहे. वेळ सतत बदलणारी आहे.बालपण, तारुण्य, म्हातारपण यातून सर्वांनाच जावं लागते. बालपणीच्या कितीतरी आठवणी, आपल्या जवळचे बालमित्र, जिवलग नकळतच काही कारणास्तव आपल्यापासून दूर जातात. मात्र त्यांची आठवण या मनात घर करून रहाते. आई-वडील, भाऊ, बहीण यांच्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण वय वाढत जाते तस तसे एकत्र कुटुंब मग मात्र ते एकत्र राहत नाही. भाऊ-बहीण या सर्वांची लग्न होऊन जाते आणि मग वाट्याला येतो तो विरह. बहिणीला भावाची तर भावाला बहिणीची आठवणं ही येतेच. पण ही आठवणं येते रेंगाळण्यासाठी अगदी एकवीस, बावीस वर्षाची मुलगी झाली की तिच्या लग्नाची तयारी सुरु होते. चांगले स्थळ बघून लग्न करून दिले जाते. आईचे घर सोडून लग्न करून सासरी नांदायला मुलीला जावे लागते. आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांना आपल्या भाऊ बहिणीला सोडून जाण्याचा तो विरह खूप जीवघेणा असतो. मात्र ती मुलगी स्वतःच्या मनाला आवरते. स्वतःचा धीर देते. व पुढची वाट धरते. एक आई वडील आपल्या मुलांना लहानाची मोठी करत असतांना कितीतरी त्रास ते सहन करतात. कशाची ही कमी पडू देत नाहीं. मात्र एक वेळ ही येतेच कीं मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागते. पण मुलं जवळ नसतांना त्या आईवडिलांना मुलांची सतत आठवणं येते. मुलं हेच त्यांचं आयुष्य असते. आपल्या संसारीक आयुष्यात कितीही मोठा मित्रपरिवार असला तरीही ते एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, ती साथ मात्र कायमस्वरूपी टिकत नाही.  हातात असलेला हात हा कितीही घट्ट पकडून ठेवला तरीही हा सुटतोच. हेच तर जीवनाचे खरे सत्य आहे. हा विरह प्रत्येकाच्या वाटेला येतो. कितीतरी त्रास तो देऊन जातो. सतत आठवणीच्या पडद्यावर विरहाचे भास, सोबतीची असलेली साथ, तो कटू गोड अनुभव, तो गोडवा चिरकाल स्मरणात राहतो. ओठातून एकच शब्द निघतो. की, का हा विरह जीवनात येतो. जन्म देणारे आई, वडील, जिवलग, भाऊ, बहीण का शेवटच्या क्षणापर्यंत सोबत नसतात. अर्ध्यात साथ का सोडतात. एक आठवणींच ओझं मांगे सोडून जातात. बंद डोळ्यांनीच फक्त मन भरून बघावं लागते. डोळ्यातून विरहाचे कितीतरी अश्रू वाहत असले तरीही जिवलग मात्र परत येत नाही. आठवणींचा महासागर हा काही केल्या आटत नाही. असा हा 'विरह' मनाला वाळवंट करून सोडतो. मायेची हिरवळ कायमची घेऊन जातो. पण विरहात प्रेम हे असतेच. आणि हेच प्रेम जीवन जगण्याची ताकद बनते.

'विरह' तर असावा 
त्याशिवाय प्रेम कळतं नाही 
काळजातून निघालेली आर्त , 
हाकेला खरी साद मिळत नाहीं 
मनामनाचं नातं 
त्याशिवाय फुलंत नाहीं..! 

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
0

🎭 Series Post

View all