विसावा ( कविता)

विसावा (कविता)
*विसावा*

ठरलं होतं मनात जे
ते मनातच गिळलं,
वास्तवाचं भान होता
तडजोडीला कवटाळलं.

जबाबदारीचं ओझं
या देहानं स्वीकारलं,
स्मितहास्य चेहऱ्यानं
स्वप्नांना नाकारलं.

स्वप्नांच्या राशीला
अलवारच ढासळलं,
कर्तव्याच्या ढिगाऱ्यात
या देहाला मिसळलं.

आयुष्याच्या धावपळीत
स्वतः साठी जगणं विसरलं.
जीवन मात्र कालचक्रात
परतीकडे हळूच घसरलं

न राहून थकलेल्या देहाला
हळवं मन सांगू लागलं,
अरे,तुझं घटकाभर विसावा
घ्यायचंच राहून गेलं!
----------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे
जिल्हा.पुणे