सकाळी घरात नाष्ट्याची लगबग सुरु होती.
शांताताई स्वयंपाकघरात पराठे करत होत्या. आणि सोबतच त्यांची बडबड पण चालू होती.
"काय उपयोग सून आणून, शेवटी मलाच स्वयंपाकघरात खपायला लागतय."
त्यांची सून रश्मी निवांत सोफ्यावर बसून मोबाईल बघत होती. ती हे सगळं ऐकून पण न ऎकल्या सारखं करत होती.
तेवढ्यात त्यांचा मुलगा विशाल आला. आणि म्हणाला —" आई झालय का नाष्टा बनवून, माझी निघायची वेळ झालीये. मला उशीर होईल. "
शांताताई नाष्टा घेऊन आल्या.
" हे बघ तुझ्या आवडीचे मेथी पराठे केलेत. शेवटी आई ती आईच ना. "
"विशाल पराठे खात म्हणाला —" खरंच अशी चव कुठेच नाही गं."
रश्मी अजून ही मोबाइलमध्ये व्यस्त होती.
आज दोन दिवस झाले होते. रश्मीनी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला पाऊलही ठेवलं नव्हतं.
ती फक्त स्वतःसाठी खायला करत होती.
ती फक्त स्वतःसाठी खायला करत होती.
कारण तिला विशालने स्वयंपाक करण्यावरून खूप बडबड केली होती. म्हणून ती आता निवांत बसून होती.
काहीही झालं की विशाल सारखा तिला बोलत होता.ती इतके दिवस ऐकून घेत होती, पण या वेळेस तिने ठरवलं होतं की काही करायचं नाही.
विशाल ऑफिसला गेल्यावर ती स्वयंपाकघरात गेली, स्वतःसाठी छान सँडविच केले आणि खोलीत जाऊन खात होती तेवढ्यात तिकडे शांताताई आल्या, आणि परत रश्मीला बोलायला लागल्या.
पण रश्मीनी दुर्लक्ष केलं.
पण रश्मीनी दुर्लक्ष केलं.
शांताताई दुपारी आराम करत असतांना रश्मी त्यांचा खोलीत आली आणि म्हणाली —" मी माहेरी चालले. तसंही माझं इथे काही काम नाही.तुम्ही आहातच तुमच्या मुलाला खायला करून द्यायला. "
त्या काही बोलायचा आधीच ती माहेरी जायला निघाली.
संध्याकाळी विशाल घरी आल्यावर त्यांनी त्याला सगळं सांगितलं.
विशाल म्हणाला —"जाऊ दे आई, मी पण कंटाळलो आता. दर वेळेस चूक करते ती आणि उलट बोलते तुला पण. राहू दे तिकडे.
तू आहे ना माझ्यासाठी, मला तू असली की बस झालं. कटकट नाही थोडे दिवस डोक्याला. असं विचार कर."
विशाल म्हणाला —"जाऊ दे आई, मी पण कंटाळलो आता. दर वेळेस चूक करते ती आणि उलट बोलते तुला पण. राहू दे तिकडे.
तू आहे ना माझ्यासाठी, मला तू असली की बस झालं. कटकट नाही थोडे दिवस डोक्याला. असं विचार कर."
शांताताई मुलाला काही बोलल्या नाही. पण त्यांना टेन्शन आले होते की रोज -रोज इतकी कामं त्या कसं करणार....
हे पहिल्यांदा नव्हतं की विशाल आणि रश्मी भांडले होते, पण या वेळेस रश्मी माहेरी निघून गेली होती.
शांताताई जेव्हा पासून दोघांचे लग्न झाले तेव्हा पासूनच, दोघांनमध्ये भांडणं लावत होत्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा