नजर नजरेतली ...

नजर
नजर नयनांची... की नजर निखळ क्षणांची...
नजर मोहाची... की नजर मायेची...
नजर कामनेची... की नजर कल्पनेची...
नजर प्रेमाची...की नजर प्रेमातल्या मैत्रीची...
नजर आपुलकीची...की नजर आपल्या मैत्रीची...
नजर मनाची.... की नजर मस्तकातली....
नजर उचित...की नजर अनुचित...
नजर मनातल्या मनःस्थितीची... की नजर मनातल्या मानसिकतेची..
नजर नकळतपणे निखरलेली....की
नजर कळतपणे निरखून पाहिलेली...
नजर न बोलता बोललेली...की
नजर बोलून गमावलेली...
नजर तुझ्या प्रितीची ...की नजर माझ्या भीतीची...
नजर भासातल्या भावनांची..
की नजर आभासातल्या अंतकरणाची ....
नजर निःशब्द नजरेतली... की नजर निव्वळ लज्जेतली...
अखेरीस ... नजरेने..नजरेला... निरखले...
आणि प्रश्न पडला
नजर तुझी ? की माझी?