Login

विस्मृती भाग - 5

विस्मृती......भावनांची गुंतागुंत....

                विस्मृती

भाग - 5

     रात्रीच जेवण आटपून स्वाती आणि अवनी शतपावली करायला गच्चीवर गेल्या होत्या. मामा तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त गेले होते. ते आज तिथेच वस्तीला होते. कामवाल्या मावशीनी विधीताला वर तिच्या खोलीत दुध आणून दिलं व त्या खाली स्वयंपाकघरात आपली काम करायला निघून गेल्या. विधीता दुध पिऊन बिछान्यावर पडली. ती आज झालेल्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार करु लागली. "खरचं कोण असेल हा? ज्याचा अजून मी साधा चेहराही बघितला नाही. पण तरीही मला इतका ओळखीचा वाटावा तो……! पण का?? काय संबंध आहे त्याचा नि माझा??? त्याच माझ्यापासून लांब जाण्याने इतक का दु:ख व्हाव मला??? काही समजत नाहीयेच. डोक जडं होतयं अगदी.." अचानक तिला कुठुन तरी सुमधुर आवाज ऐकायला येतो. तो बासरीचा आवाज होता. ते सुर तिच्या ओळखीचेच होते. ती लगबगीने खोलीच्या एका खिडकिपाशी गेली. तिला खाली मागच्या अंगणात पुन्हा तोच दिसला. पण काळोखात त्याचा चेहरा जरी नीट दिसत नसला तरी ती त्याला खात्रीने ओळखू शकत होती. तोच ती बासरी वाजवतं होता. ती खिडकिपाशी येताच तो बंगल्याच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या एका आडवाटेवरच्या दिशेने जायला निघाला. ती त्या बासरीच्या आवाजात अगदी हरवुन गेली होती. ती त्या आवाजासरशी घराबाहेर पडली. तिचं भान तर त्याच्याच हरपल होतं. ती आडवाटेने त्याच्या मागोमाग जायला निघली. आपण कुठे जातोय? का जातोय ? याची तिला शुद्धच राहिलेली नव्हती. ती त्याच्या मागोमाग परत त्याच तलावाजवळ परत आली. याच साधं तिला भानही राहिलं नव्हतं. ती त्याच्या मागे उभी होती. तो पाठमोरा तलावाच्या दिशेने उभा राहून बासरी वाजवत होता. संध्याकाळी आकर्षक वाटणार ते तलाव रात्रीच मात्र भकास वाटतं होतं. सैराभैर झालेल्या वाऱ्याने झाडांची पान वेडीपीशी होऊन खाली गळून पडतं होती. पौर्णिमा असताही तिथे वातावरण मात्र फार विचित्र होत. अचानक त्याने बासरी वाजवायची थांबवली. तो तसाच स्तब्ध उभा राहीला. तशी विधीता भानावर आली. "मला माहित नाही तु कोण आहेस? पण तुझा नि माझा काहीतरी सबंध आहे एवढ नक्कि....! तुझ मला दिसणं काही योगायोग तर नाहिच. ह्या गावात आल्यावर मला अस्वस्थ वाटणं. हे गाव ओळखीच वाटणं. तुच साद घालत होतास ना मला. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर तुच देवु शकतोस. बोल देशील ना???" असं म्हणत विधीता त्याच्या जवळ जायला निघाली. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात त्याने धावत जावून तलावात उडी घेतली. विधीता मोठ्याने ओरडली "विक्रांत…….! ती झटकन खाली बसली. मोठमोठ्याने रडायला लागली. तिला फक्त रडु येत होत. अचानक तिथे अवनी आणि स्वाती पोहोचल्या. त्यानी तिला सावरलं. "विधीता..? विधीता..? काय झालं तुला?? तु अशी रडतेस का?? तु इथे कशी आलीस?? तु ठिक आहेस ना..?" अवनी म्हणाली. पण विधीता रडता रडता बेशुद्ध झाली होती. त्यांनी तिला घरी बंगल्यावर नेलं. अवनीने गावच्या डॉक्टरांना बोलवलं. त्यांनी तिचं आजारपण आधीच डॉक्टरांना सांगितलं होत. डॉक्टरांनी तिला तात्पुरत इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या दिल्या. आता तिला आरामाची गरज आहे. ती उद्यापर्यंत नीट शुध्दीवर येईल असं सांगून ते निघून गेले. त्या दोघी तिच्या बाजूला बसल्या होत्या. स्वाती अवनीला म्हणाली "तरी मी सांगत होते तुला नको करुया ट्रिप. आता केवढ्यात पडलं हे?? त्यात मामा पण नाहियेत. तिला काय झालं असतं तर तिच्या आई-बाबांना काय उत्तर देणार होतीस तु??"  "अगं मला काय माहीत असं होईल. हे एवढ होईल असं मला वाटलचं नव्हत." तेवढ्यात अवनीला कोणाचातरी फोन आला. 

     सकाळ झाली. अवनीला जाग आली. विधीता बेडवर नव्हती. खर तर त्या दोघी तिच्या शेजारीच बसल्या होत्या रात्रभर. पण त्या दोघींचा डोळा कधी लागला हे त्यांना कळलचं नाही. अवनी खूप घाबरली तिने स्वातीला उठवलं "स्वाती उठ. स्वाती उठं. विधीता आपल्या बेडवर नाहीयेय."  "अरे देवा! आता कुठे गेली ही?? चल शोधुया." दोघींचा पार गोंधळ उडाला. त्यात अजून मामाही आले नव्हते. "मी इथेच आहे. आंघोळीला गेले होते." विधीता बाथरुमचा दरवाजा लावत म्हणाली. अवनी तिच्याजवळ जात म्हणाली " विधीता तु शुध्दीवर आलीस. आता कशी आहे तुझी तब्बेत?? अगं उठवायचं ना आम्हाला. काल माहीतेय तु बेशुद्ध झाली होतीस. तु रात्रीची तलावाजवळ…"  "हो मला सगळं आठवतयं. आणि का गेले तेही. खूप गोष्टींचा उलगडा झालाय आता मला. ज्या गोष्टी घडल्या त्या का घडल्या तेही समजतय आता हळु हळु. फक्त काही प्रश्नांची उत्तर हवीत. त्याचा शोध घ्यायला मला जाव लागणार…" विधीता अवनीच वाक्य अर्धवट ठेवत म्हणाली. "म्हणजे नक्की काय समजलयं तुला? कुठले प्रश्न?? कुठली उत्तर?? आणि कुठे जातेस तु??' स्वातीने विधीताला गोंधळून विचारलं. "अगं हो हो. मी सांगेन तुम्हाला. मला थोडा वेळ द्या. मला गावात एका ठिकाणी जायचयं. प्लीज मला अडवू नका. आणि हे मी पूर्ण शुध्दीवर येवून बोलतेय." विधीता दोघींना ठामपणे म्हणाली. "अगं हो पण तु जातेस कुठे?? आम्ही पण येतो तुझ्याबरोबर. आम्हाला तुझी काळजी आहे ग. परत तुला काय झालं तर..?" अवनी म्हणाली. "मी आता बरी आहे. फक्त आता मला तुम्ही अडवू नका हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज..!' विधीता दोघींसमोर हात जोडत म्हणाली. "अगं काय करतेस? असे हात नको जोडू ग. तु जा ठिक आहे. फक्त एक करशील का आमच्यासाठी? तुझ्या मोबाईलचा जी. पी. एस. ऑन ठेवशील. प्लीज आमच्यासाठी." अवनी म्हणाली. विधीताने होकारार्थी मान हलवली ' मी जाते. ' असं म्हणत ती निघून गेली. दोघीही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होत्या. एवढी धीट, गंभीर विधीता त्यांनी कधीच पाहीली नव्हती. 

क्रमशः

0

🎭 Series Post

View all