Login

विस्मृती भाग - ८

विस्मृती...... भावनांची गुंतागुंत...

भाग - 7

https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-7_9814

                विस्मृती

भाग - ८ 

     ती त्याच्याकडे बघून रडतानाच तोंडावर हात ठेवून म्हणाली "तुला आठवतय आपली पहिली भेट…….मी तर तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले होते. त्यानंतर ते पुढचे  सगळे माझ्या आयुष्यातील सोन्यासारखे क्षण……(हसून) होय! खरच मला सगळ आठवलय. आपला सुखाचा चाललेला संसार. पण मग एवढ सगळं चांगल चाललेल असताना तु मला अचानक सोडून गेलास.. बोल का गेलास मला सोडून..??? (रागात) आणि आता आलायसं. तो ही लपून छापून राहतोस. अस का?? मी सोडून कोणाच्या समोर येत नाहीयेस. लपून छपून तेच लोक असतात ज्यांनी काहीतरी पाप केलेल असतं. बोल ना काय झाल?? (तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलले होते.) काय चूक होती माझी जे तु मला आपल्या लग्नाच्या वाढदिवशी सोडून गेलास?? बोल ?? कुठे गेलेलास?? कोणालाच न सांगता.. काय कारण होत?? बोल?? आणि आता तरी कशाला आलास? यायचचं नव्हतस. कादाचित तुझ्या अश्या अचानक जाण्याच्याच मला धक्का बसला. म्हणूनच मी माझा एवढा महत्त्वाचा भुतकाळ विसरले. हे सगळे क्षण माझ्या विस्मृतीत गेले. माझ काय झालयं हे तरी बघायला यायच. जिवंतच होतास ना? मेला तर नव्हतास. बोल? ती हे बोलून थांबली आणि तीने आपली डोळे पुसले. इतक बोलूनही त्याच्या निर्विकार चेहऱ्यावर वर कुठल्याच भावनेची छटा नव्हती. ती त्याला हात लावून हलवणार इतक्यात तो काही न बोलता चालू पडला. तो एका रानवाटेने जावू लागला. ती ही त्याच्या मागे मागे जावू लागली. "आता माझं हात लावणही तुला नको झालय वाटत. पण आज मी तुझी पाठ सोडणार नाही. तुला उत्तर द्यावचं लागेल." ती त्याच्या मागे चालत चालत बोलली. तो काही न बोलता चालत होता. ती तशीच बडबडत त्याच्या मागे मागे जात होती. तो तलावाच्या दिशेने जात होता. तिला त्याच काही भान नव्हत. तिला फक्त उत्तर जाणून घ्यायचं होत. तो तलावाजवळ येवून थांबला. "वा! पळकुटा माणूस नशीब थांबला" ती फार रागात म्हणाली. तो जरा तिच्यापासून लांब पाठमोरा तलावाच्या समोर जावून उभा राहिला. "खूप बदलला आहेस रे तु" ती डोळ्यात पाणी आणत बोलली. "तुला नक्कि सगळ आठवतय?? मी कुठे गेलो  ते??" अजूनपर्यंत शांत असलेला तो तिला म्हणाला. "काय माहित?? तुलाच माहित आता हे??(तुटकपणे बोलते) मला तर काहीच समजत नाहियेय कि सगळ माझ्या आयुष्यात चाललय तरी काय?? आणि कोण कोण आहे ह्यामध्ये तुझ्याबरोबर मला इथे आणण्यात???" ती प्रश्नार्थक नजरेने त्याला म्हणाली. तो राग अनावर होत म्हणाला "तुझा गैरसमज होतोय वृंदा.... मी असं काहीही केलेल नाहियेय अगं. कदाचित तु विसरतेस मी आपल्या  लग्नाच्या वाढदिवशी तुला कुठेतरी जातोय असं सांगून ह्याच तलावाच्या दिशेने आलो होतो. जीव द्यायला." "किती खोट्या गोष्टी रचशील रे..खर काय ते सांग ना? कि लाज वाटतेय…?" ती खुप चिडली होती. "नाही…….! (तो मोठ्याने रागात ओरडला तशी ती एकदम गप्पच बसली) मी इथे खरच जीव द्यायला आलो होतो. कारण मला कॅन्सर झाला होता. तोही लास्ट स्टेज आला तेव्हा कळलं मला...तुला सांगितलं नव्हत..लपून ठेवलं.. खूप विचार केला...तुझा विचार आला..आणि हा निर्णय घेतला…मग…"   "तु खोट बोलतोसय अस काहिच झाल नाहियेय. असं असत तर तु इथे समोर नसतास माझ्या...माणसाने किती खोट बोलाव. किती गोष्टी रचाव्या…" ती रागात रडत रडत बोलतं होती. "असचं झाल होत. मी जीव दिला होता ह्या तलावात …" तो तिला पटवून देत तठस्थपणे म्हणाला. "नाही…!" ती ओरडली. "होय..!" अस म्हणत त्याने समोर  धावत जावून तलावाच्या त्या खोल पात्रात उडी घेतली. पाण्यात मोठा आवाज आला. पाण्याला अशांततेचे तरंग उठले. ते जसे उठले तसे ते शांतही झाले जसं काय झालच नव्हत.. ती मोठ्याने ओरडली  "विक्रांत….....!"  तशीच रडत धपकन खाली बसली. भयान शांतता पसरली. आता मात्र तिच्या विस्मृतीत गेलेले अगदी सगळे क्षण तिला आठवत होते. "आता कळल मला तुझं फक्त मलाच  दिसणं….सारख माझ्या समोर येण…. कदाचित तु वाट बघत होतास इतकी वर्षे माझ्या इथे येण्याची...मागच्या ४-५ वर्षातला तो अस्वस्थपणा… काहीतरी मागे राहिलय माझ्या आयुष्यात...याची उणीव भासण... हे काय होत ते आता कळतय….माझ्यामुळे आई- बाबांना किती त्रास तो आता समजतोय मला…तु का केलस असं...का..???" तीने मोठ्याने हंबरडा फोडला. 

क्रमशः

0

🎭 Series Post

View all