भाग - ८
https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-8_9902
विस्मृती
भाग - ९
तेवढ्यात मागून अवनी आणि स्वाती तिला हाक मारत आल्या. त्यांनी तिला लागलीच सावरल. विधीता अवनीला मिठी मारुन अजूनच रडायला लागली. "विधीता शांत हो आम्ही आलोय ना" अवनी तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलते. "अग तु आधी तु रडायची थांब बघू. काय झालय ते सांग तरी.. तु सांगितल्याशिवाय कसं कळणार आम्हाला…" स्वाती विधीताची समजून काढत बोलली. "काय झालय विधीता...??" अवनी तिला विचारते. "आज मला माझ्या आयुष्यातलं खुप मोठ सत्य कळलय. जे इतकी वर्ष विस्मृतीत गेल होत…...विक्रांत..!" विधीता बोलते. "हे माहितेय आम्हाला" अवनी बोलते. विधीता तिच्या मिठीतुन बाहेर पडत बोलते आश्यर्याने बोलते..' काय…??' ' हो अगं आम्ही…' तेवढ्यात विधीताला समोर विक्रांत दिसतो. ती अवनीच बोलण अर्धवट टाकत तिला दाखवत बोलते "अगं तो बघ विक्रांत मागे उभा आहे. मला दिसतोय. विक्रांत...विक्रांत मला सगळ कळलय. कदाचित ह्यासाठी तुझा आत्मा मला दिसत होता.." असं बोलता बोलता विधीता त्याला धावात जावून हात लावणार इतक्यात अवनी तिला मागे खेचते. "विधीता… ऐक माझ" तरीही विधीताची बडबड चालूच असते. अवनी तिचे दोन्ही खांदे हलवून तिला हलवते. "अग भानावर ये.. तो विक्रांतचा आत्मा नाहियेय…" "अग मला दिसतोय तो तो बघ…" ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते. तेवढ्यात समोर असलेला तो त्याच्या चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा उतरवतो. "अग हा बघ (तिला पटवु पाहणाऱ्या सैरभैर झालेल्या विधीताच लक्ष ती त्याच्याकडे नेते.) हा तुझ्या नवऱ्याचा आत्मा नाहियेय हा मिहीर आहे मिहीर…! ज्याने तुझ्या नवऱ्याचा मुखवटा स्व:तावर ओढला होता तुला बरं करण्यासाठी…" "काय..?? म्हणजे मला काही समजत नाहियेय.." विधीता गोंधळून रडत रडत अवनीला विचारते. "अग हे सगळं आमच नाटक होत तुला तुझा भूतकाळ आठवावा म्हणून….मी, स्वाती आणि मिहीर… तुला समजतय ना मिहीरने फक्त तुझ्या नवऱ्याचा मुखवटा घातला होता. आणि तुला इतके दिवस तोच दिसत होता. तो विक्रांतचा आत्मा नाही.." " कोण आहेस तु??? (विधीता मिहीरकडे बघत बोलते) माझा भुतकाळ तुम्हाला सगळ्यांना कसा माहित..???" ती अवनी आणि स्वातीला बघत विचारते. "तु शांत हो आधी. बस. बस बघू खाली. हे घे पाणी पी. आम्ही तुला सगळं सांगतो पण तु आधी पाणी पी." (अवनी स्वातीकडून पाण्याची बॉटल विधीताला देत बोलते. विधीताही काही न बोलता खाली बसून ते पाणी पिते) "आता तरी सांगाल का मला हे नक्की काय चाललयं. मला काही कळत नाहियेय. माझी वेड लागायची वेळ आलीय." विधीता डोक्याला हात लावत बोलते. "हो सांगतो. तु शांत हो आधी. (तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलते.) विक्रांत आता ह्या जगात आपल्या बरोबर नाहियेय हे खरयं पण हा विक्रांतचा आत्मा नाहियेय. हा मिहीर आहे. अग.." मिहिर तिला मध्ये थांबवत बोलतो "थांब अवनी मला वाटतय जे घडलयं ते मी घडवून आणलय. ते का हे तिला मीच सांगितल पाहिजे. विधीता! ( विधीता त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने बघते.) कदाचित तु मला ओळखल नसशील. तुला आठवतही नसेल पण आपण एकदा भेटलोय. मी ४-५ वर्षापूर्वी तुझे बाबा ज्या ऑफिसमध्ये काम करायचे तिथे नुकताच लागलो होतो. कामाच्या बाबतीतला काटेकोरपणा तुझ्या बाबांकडून मला शिकायला मिळाला. त्यांनी मला काम कस कराव हे फार छान पध्दतीने शिकवल आणि मी शिकलोही. पुढे तुझ्या बाबांनी ह्रदयविकारामुळे रिटायरमेंट घ्यायच ठरवल. तरीही ऑफिसच्या माणसांबद्द्ल आपुलकी म्हणून तुमच्या घरी छोटीशी मेजवानी ठेवली होती. त्यात सगळ ऑफिस आलं होत. मी थोडा उशीरा आलो. आत शिरताच ओळखीच्या माणसांच्या गर्दीत अनोळखी तु दिसलीस. तुझा तो दिसण्यातला आणि वागण्यातला साधेपणाने मनात कधी कायमची जागा केली कळलच नाही. तु इतराप्रमाणेच माझ्याशीही बोललीस. पण माझ्यासाठी ती भेट खूप खास होवून गेली. पुढे ही गोष्ट मी अवनीला सांगितली. माझ्या सगळ्या भावंडामध्ये अवनी माझ्या जास्त क्लोज होती. मी प्रेमात पडलोय हे स्पष्ट न सांगाताही तिला कळलं. तिलाही खूप आनंद झाला. पण थोड्याच दिवसांनी तुझे बाबा तुझ्या लग्नाची पत्रिका घेवून ऑफिसला आले. मला हे ही कळल कि तुझं लव- मॅरेज होत. खूप दुख झाल. खूप रडलो मी. पण तुझ्यावर खर प्रेम केल होत मी. शेवटी तुझ्या आनंदात माझा आनंद होता. आयुष्यात पुढे गेलो मी. पण पुढच्या गोष्टी नियतीवर ठेवून दिल्या. पुढे ह्याच नियतीने परत मला तुझ्या आयुष्यात आणल. काही कामानिमित्त मी २-३ वर्षानंतर तुमच्या जुन्या फ्लॅटवर गेलो. तिथे मला शेजाऱ्याकडून तुझ्याबद्द्ल कळल आणि तुम्ही आता जिथे राहता त्याचा पत्ता ही भेटला. मी तुझ्या घरी पोहचेपर्यंत मला खूप विचार येत होते. तु कशी असशील?? आता तरी सावरली असशील का? तुझ्यासाठी जीव कि प्राण असणारा तुझा नवरा तुला सोडून गेल्यावर तुझी काय अवस्था झाली असेल…?? असे अनेक विचार मनात येत होते. मन अस्वस्थ होत होत. कधी तुला सुखरूप बघतोय असं झाल होत. शेवटी पोहोचलो तुझ्या घरी पण नव्हतीस. तु तुझ्या आईबरोबर मंदिरात गेली होतीस. तुझे बाबा होते. त्यांनी मला सगळं सांगितल. त्यांना इतक हतबल मी कधीच बघितलं नव्हत. तु कधी ना कधी बरी होणार हे त्यांना माहित होतचं. त्यांना भीती ही होती कि तुला तुझ्या आयुष्यातल हे सत्य कळल्यावर तुझी काय अवस्था होईल. त्याही पुढे विक्रांत ची शेवटची ईच्छा तु पूर्ण करशील का?? हीच गोष्ट त्याना जास्त खात होती." मिहीर आपल्या मनातलं बोलतच होताच इतक्यात विधीता कासावीस होत मध्येच बोलली "कसली??? काय ईच्छा होती त्याची?? मी नक्की पूर्ण करेन.. मला सांग तरी..विधीता आपले डोळे पुसत बोलते. अवनीने काही न बोलता तिच्या हातात एक पत्र दिल. विधीताने ते पत्र थरथरत्या हातानी खोललं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा