Login

विवाह विठ्ठल रुक्मिणीचा

हायकु काव्यप्रकार विठ्ठल रुक्मिणी विवाहाचे वर्णन
माळ फुलांनी
सजली ही पंढरी
विठुरायाची!

बाशिंग बांधे
वाट पाहे विठ्ठल
रखुमाईची !

विवाह झाला
विठ्ठल रुक्मिणीचा
आनंद भाळी!

थोरामोठ्यांनी
सजली ही पंढरी
वारकऱ्यांनी !

गजबजली
या वसंत पंचमी
पंढरी माझी!

विठुरायाला
या दिवशी भेटली
ही रखुमाई !


स्वाती पवार