विवाह एक अनोखे नाते...1
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर -जानेवारी 2025-2026
"आशी, मला कळतं नाही की तू हे लग्न का करत आहेस...?" एक 22 वर्षाचा मुलगा, त्याच्याच वयातील मुलीला म्हणत होता..
" कारण हीच माझ्या बाबाची इच्छा होती... " पण ती मुलगी निर्वीकार चेहऱ्याने म्हणते..तिने त्याला बोलताना पाठ केली होती..
" आणि तुझ्या इच्छे चं काय...?? माझ्या इच्छेचे काय...?? " त्याने आता तिला आपल्याकडे वळवत, तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हटले...
" मी आधी ही तुला सांगितलं होते..." पण आता ही तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन चेंज नव्हते झाले... उलट ती तर त्याचे खांद्यावरचे हात काढून, हाताची घडी घालत तिरसटपणे बोलते...
" काय, काय सांगितले होते...?? " पण तिचे असे थंड एक्स्प्रेशन पाहून हा कमालीचा चिडला होता.. तिच्या नजरेत कुठेच त्याला पच्छाताप दिसत नव्हता ना त्याच्याबद्दल कणव... कारण हे सर्व बोलताना मात्र त्याचे डोळे पाण्याने भरले होते...
" ओरडू नकोस... सुशील... " पण त्याचा तो चढता आवाज ऐकून आता ती ही त्याच मोठ्या आवाजात बोलते, " हे बघ मी तुला आधीच सांगितलं होते, की हे प्रेम ब्रीम माझ्या घरात चालणार नाही... त्यामुळे तू सुद्धा या पासून दूर रहा.. आणि मी ही... " ती आता ही खूप थंड डोक्याने बोलत होती...
" हॊ, आठवतंय मला.. पण ते सर्व तीन वर्षांपूर्वी चं होते आशी... " तो आता थोडे मवाळ शब्दात बोलतो... " गेली 3 वर्ष आपण एकसाथ आहोत, फिरत आहोत... " तो कळवळून बोलत होता..
" हा मग... मित्र मैत्रिणी ही फिरतात की... एकसाथ असतात... आणि.. आणि खरं सांगायचं तर... " ती नजर वळवून आता पुढे बोलायला लागते, " की मी तुला कायम मित्रच समजत आले आहे... " तिने स्पष्ट असं आपले मत पुढे मांडले...
" आर यू मॅड ऑर क्रेझी..?? " आणि तीच हे उत्तर ऐकून त्याची जमीन पायाखालची तर सरकलीच पण सोबत प्रचंड राग आला होता..." तीन वर्ष... अगं आपल्या नात्यात आपण 3 वर्ष घालवली आहेत... "
" काय लावले आहे तीन वर्ष, तीन वर्ष सुशी... " पण त्याच ते हतबल होऊन तिच्यासमोर गुढघ्यावर बसून भाऊक होत बोलणे तिच्या डोक्यात गेले.. " एकदा सांगितलं ना, मी तुझ्या प्रेमात कधीच नव्हते.. आणि तुला ही मी सांगितलं होते की, मी मैत्री सोडून पुढची रेष कधीच ओलांडणार नाही... सो उगाच तमाशा करू नको. " ती इकडे तिकडे पाहत बोलते...आणि त्याचा हात धरून त्याला वर ओढत म्हणते..
" हे बघ... तू ही मला विसर.." ती एक पाच मिनिटाचा पॉझ घेत, उसासा सोडत बोलते.. " मी ही तुला विसरते.. आपण आता नवीन आयुष्य जगूयात... "
. काय देईल आता सुशील तिच्या प्रश्नाचे उत्तर?? आपल्या नायिकाचे नाव तुम्हाला समजले असेलच... आशी कदम आहे आणि कथेचा नायक अजून आला नाही... पण लवकरच तो ही येईल...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा