Login

विवाह एक अनोखे नाते भाग 33

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तिने तर लग्न केल पण हे नाते टिकेल का...??
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते  33
©®चैत्राली यमगर लिखीत...

.   इकडे आशी अर्णव ला शोधत होती... एक मुलगा तिला पाठमोरा उभा होता.. तर तिला तो अर्णवच आहे असं वाटल्याने ती पटकन त्या मुलाकडे धावली होती... त्यामुळे  स्नेहा चा प्रश्न तिच्या कानावर आलाच नव्हता... पण तो मुलगा अर्णव नसल्याने ती परत आली...तर नट्स परत आपल्या जागेवर जाऊन बसली होती.. आणि आता तिचे डोळे बंद होते...


" तू..?? तू इथे काय करतोय... पण समोर आता सुशील ला पाहून मात्र तिला चांगलाच राग आला... " स्ने, मला वाटले नव्हते तू अशी काही वागशील.. पण मला वाटत आहे मी मीच मूर्ख आहे.. सगळे माझ्यासमोर असून ही मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा परत असा विचार जे करत होते... " सुशील ला पुढे काही न बोलू देताच, ती आता परत बोलायला लागली...

" anyways.. मला जायला उशीर होत आहे... तुम्ही मला माझ्या कार मध्ये बसून द्यायला मदत करा... " आणि परत तीच पुढे त्या दोघांना, नट्स कडे पाहत म्हटली... एक शब्द सुद्धा त्या दोघांना सफाईचा बोलायला देत नव्हती ती यावेळी... आणि दोघे तिला अडवत ही नव्हते तस काही करण्यासाठी.. कारण आपण जी माती खाल्ली आहे ती तिला समजले आहे हे एव्हाना त्यांना कळालेच होते...


" ही नट्स तुझ्या कशी काय ओळखीची... " तिला कॅब मध्ये नेऊन ठेवताना, मात्र खुप हिम्मत एकटवून सुशील बोललाच तिला...


" सांगितलं नाही का तुझ्या वूड बी वाइफ ने " पण तिने आता ही सुशील ला जास्त भाव न देता म्हटलेच...आणि वाइफ म्हणताना तिने मुद्दाम स्नेहा कडे पाहिले..


" वूड बी वाइफ...?" आणि ते तिचे टोमणे ऐकून तिने मात्र डोळे फिरवले... " आता हे काय नवीन सुरु केल आहेस तू...?? आम्ही दोघ काही बोलत नाही तर काही ही आरोप लावणार आहेस का..?? " पण यावर मात्र आता सुशील जाम उचकत बोलला...


" हे बघ सुशील... " पण आता ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागली... आज तिने सुशी न म्हणता पूर्ण नाव घेतलं म्हणून त्याला आश्चर्य ही वाटले...त्याला आठवत होते परवा सुद्धा, लास्ट भेटीला तिने त्याला सुशी म्हंटले होते.. पण आज..?? आज असा अचानक काय बदल झाला की तिने आपले पूर्ण नाव घ्यावे.. याच च त्याला जास्त वाईट वाटले...


" माझ आता लग्न झालं आहे आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर खुश आहे... त्यामुळं तू आता.... " पण परत का माहीत नाही.. तिनेच बोलताना एक आवांढा गिळला आणि शांतपणे आपल्या गळ्यातील मंगळसूत्राशी खेळत म्हटले... जे इकडे येण्याआधी तिने मुद्दाम घातले होते...


" चल बाय... " एवढं बोलून, परत एकदा त्या दोघांना बोलायची संधी ही न देता ती, नताशा ला घेऊन ही गेली आपल्या बरोबर... पण तिला आता अर्णव तिच्याबरोबर नाही याच च जास्त आश्चर्य वाटतं होते... ते दोघे बाहेर निघताना किती आनंदी होते हे तिला चांगलेच माहीत होते...



क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all