Login

विवाह एक अनोखे नाते.. 35

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने लग्न केल पण टिकेल का हे नाते...??
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 35
©®चैत्राली यमगर लिखीत...


" पण मी इतक्या सहजा सहजी सोडणार नाही त्याला... " पुढे परत आता नशेतच, नट्स बोलत होती... " मी अर्णवला तेच सुख मिळवू देणार नाही... " ती शेवट एक वाक्य बोलली आणि डोळेच बंद केले...


" ती नक्की कुणाबद्दल बोलत होती...?? " पण शेवटचं वाक्य ऐकून ती आता हैराण झाली... " अर्णव ला सोडणार नाही म्हणत आहे... आणि प्रेम...?? की सुशील म्हणत आहे तस तीच खरंच त्याच्या भावाबरोबर लग्न झालं आहे... " आता तिला सुशील चा मेसेज आठवला... आणि ती तो तिच्यावर प्रेम करतो ही एवढी मोठी गोष्ट चं विसरून गेली..." नाही, काही करून मला हे अर्णव च्या कानावर घातले पाहिजे... गेले दोन दिवस मी पाहत आहे... किती प्रेम करतो तो तिच्यावर... " पण ती वेगळ्याच विचारात होती...

" पण ती अशी का म्हणाली की तो माझ्यावर प्रेम करतो... ते ही मागच्या वर्षभरापासून... " पण आता तिला लगेच लक्षात आले ती जे बरळली होती ते... " कस शक्य आहे.. तस असते तर बाबाने मला गेल्या वर्षभरापूर्वी चं म्हटले असते. " ती आता तर्क वितर्क लावत होती. त्याने तिला कंपनीत पाहिले असेल असा किंचित ही तिला अंदाज आला नव्हता... " नाही, हीचं त्याला डिच करत आहे पण आरोप मात्र त्या सज्जन माणसांवर लावत असेल... "असा विचार करत करतच ती आता आपल्या रूममध्ये जाते.. तस ही रात्र बरीच झाली होती...


" झोपली नाहीस का. " ती आपल्या रूम मध्ये येऊन बस चेंज चं करून झोपायला जात होती की, तिच्या दरवाजाच नॉक झालं... तस तिने ओपन करताच समोर तिला अर्णव दिसला.. जो आता तिला खूप काळजीने विचारत होता...


" आम... " आणि त्याला असं अचानक पाहून तिला थोडे आश्चर्य चं वाटले.. त्यात तो असं काही प्रश्न विचारेल असं ही तिला वाटले नव्हते...त्यामुळे ती फक्त गोंधळून त्याच्याकडे पाहत होती...

" अगं मी विचारलं.. झोपली नाहीस का अजून... " तिने आपले बोलणे नीट ऐकले नसेल म्हणून त्याने परत तोच प्रश्न केला... पण यावेळी त्याने हसून विचारले... त्याच्या गालावरची ती खळी यावेळी मात्र तिला उठावदार दिसली...


" हॊ झोपत चं होते... " तस तिने त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून, आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हटले... चेहऱ्यावर किंचित हसू ही होते..


" ओके... मग ठीक आहे... उद्या बोलूयात... " तो आता थोडे नाराज होऊन बोलतो...


" खूप महत्वाचे असेल तर आपण बोलू शकतो... " पण तो नक्कीच काहीतरी महत्वाचे बोलायला आला आहे हे त्याच्या त्या चेहऱ्यावरून तिने कॅच केल होते... त्या एक दोन सेकंदातच आणि तसही तिला ही त्याच्याशी बोलायचं आहे हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते...


" नो, इट्स ओके.. आपण उद्या बोलू... " पण आता त्याला चं बरोबर वाटले नाही...


" ते.. नट्स तिकडे हॉल मध्ये झोपली आहे... " तो निघालाच होता की तिने मोठ्याने मागून म्हटले...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all