दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 36
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 36
©®चैत्राली यमगर लिखीत...
" ते पब मध्ये मी सुद्धा होते... " त्याने तीच बोलणे ऐकून आता गोंधळून तिच्याकडे पाहिले तस आता ती बोलायला लागते... " त्या माझ्याकडेच नशेत आल्या होत्या. " आणि तो काहीच बोलत नाही म्हणून आता ती पुढे सांगायला लागली...पण जास्त काही डीप सांगत नाही बसली... फक्त मुद्या मुद्द्याच आता बोलत होती...
" हम्म.." त्याने यावर फक्त हुंकार दिला...
" अहो.. काय करताय... " पण त्याला आता असं अचानक आपल्या रूममध्ये पाहून ती थोडी बावरून म्हणाली...
" आशी, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे... " पण तो आता तिला इग्नोर करून बोलायला लागला... हात त्याचे खिशात होते पॅन्ट च्या.. आणि तो खूपच गंभीर होऊन बोलत होता..
" हा... " पण तिला यावर काय बोलावे हे कळत नसल्याने तिने फक्त हा म्हटले...
" आशी... आय... आय लव्ह यू... " तो असं बोलून लगेच रूमच्या गॅलरी त तडक गेला...
" काय बोलले हे आता...?? ही लव्हस मी...?? याचा अर्थ काय... " पण ती आता पुरती गोंधळून गेली होती... नक्की काय चालले आहे ह्याच हेचं तिला कळायला मार्ग नव्हता...
" हॊ आशी... मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... अगदी गेल्या वर्षी पासून... " आणि त्याने चं आत येऊन परत कन्फेशन दिले... जे तिच्यासाठी आता ऑकवर्ड ही होते... पण गेल्या वर्षभरापासून हे ऐकून ती आता अलर्ट झाली कारण हेच तर मघाशी नताशा बोलली होती... जे तीच मन मानायला तयारच नव्हते... ती नशेत बोलली असेल असं तिला वाटत असताना आता त्याने स्वतः हून तिला असं सांगणे... हे तिच्यासाठी चांगलाच धक्का होता... आणि तो कसा पचवायचा हेच तिला कळत नसल्याने ती मात्र शांत झाली...
" काय झालं...?? " आणि तिला असं शांत झालेलं पाहून, ह्याच हृदय मात्र हेलावले..त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत हलकेच विचारले..
" तुम्ही... तुम्ही हे काय बोलत आहात... " आणि तिने थोडे चिडूनच आता विचारले...
" सॉरी तुला जर मी हर्ट केल असेल तर... पण.. पण हेच सत्य आहे... " आणि आता तिचा हा कठोर आवाज ऐकून तो नरम होत बोलतो...
" सॉरी पण.. पण हे शक्य नाही... " आणि त्याच बोलणे ऐकून ती आता त्याला रागातच सुनावते... " आपले करार लग्न झाले आहे आणि तुमचं प्रेम, ते तर नताशा वर आहे ना... मग इतके स्वस्त कसे काय झाले...?? " तिने आता त्याला चं दर्डावले...
" नाही.. माझ प्रेम कधीच नताशा वर नव्हते..." पण आता त्याने कसली ही लपवा छपवी नाही करायची असं ठरवून बोलायला लागला...
" म्हणजे... " पण तिला त्याच बोलणे डोक्यावरून जात होते... " अहो आपले करार लग्न होऊन वर्ष नाही झाले... की तुम्ही माझ्या प्रेमात पडायला..आणि त्या अगोदर तुमचं प्रेम.. मिस नताशा असताना... " तिला त्याच काही एक बोलणे समजत नव्हते... सगळे डोक्यावरून जात होते आता तिच्या...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा