दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 37
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 37
©®चैत्राली यमगर लिखीत...
" एक मिनिट, मला जरा बोलू देशील का...?? " तोच आता तिला अडवत अर्णव बोलू लागला... तिने फक्त आता कटाक्ष टाकला... " पहिली गोष्ट, नट्स ही माझी gf नाही... ती फक्त माझी बालमैत्रीण आहे... माझं मात्र प्रेम फक्त नि फक्त तुझ्यावर चं आहे.." तो तिला कस समजावून देऊ याचा विचार करत करत पटवून द्यायचं ही काम करत होता...
" खोट साफ खोटे... " पण तिला काही ते पटत नव्हते... " मग तस जर होत तर तुम्ही आधी माझ्या शी करार लग्नाचा प्रस्ताव का मांडला...?? का तुम्हाला gf आहे हे सांगितलं...?? " तिने आता त्याला प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली...
" कारण मी... मी ऐकले होते तुला, कुणालातरी आय लव्ह यू बोलताना... " त्याने आता स्पष्ट केले..
" मी आय लव्ह यू म्हणताना?? " आणि ते ऐकून तिचे डोळे चक्रवाले चं... पण मग तिला सुशील भेटलेला दिवस आठवला आणि लागोपाठ हा सुद्धा... तस आता तिला कुठे जाऊन स्ट्राईक झालं की तो काय बोलत आहे...
" ओह्ह.. आणि म्हणून तुम्ही मला करार लग्नाविषयी विचारलं तर... " आता तिला सगळेच क्लिअर झाले..
" हम्म.. " यावर त्याने नुसता हुंकार भरला...
" तरीच म्हटले की बाबाने तर मला लग्नाविषयी सांगितलेलं असताना आणि ह्यांनी चं मागणी घातलेली असताना हे करार लग्न मध्ये चं कुठून आले... " तिने हित्व स्वतःला चं प्रश्न केला...
" हम्म.. मला ते राग आला होता.. मला असं वाटतं होते की, गरीब मुली ह्या फक्त श्रीमंत मुलांना... " तो आता बोलता बोलता थांबला... कारण तिचे चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन आता खूप काही बोलून जात होते..." यू नो बेटर.. मला काय म्हणायचं आहे ते... " आणि त्याने एक आवांढा गिळत म्हटले... कारण चेहरा तर लाल झालाच होता, शिवाय बारीक डोळे आणि कमरेवर एक हात ठेवून ती ऐकायचं काम करत होती...
" नो आय डोन्ट नो... " पण यावर परत तिने कमरेवरचा हात काढत म्हटले, " प्लीज टेल मी... नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला... श्रीमंत मुलांना आम्ही गरीब मुली... पुढे काय... " ती आता एक भुवई उंचावत बोलते...
" हे बघ मी ते जनरल स्टेटमेंट देत होतो..." पण तिच्या या बॉडी स्ट्रक्चर मुळे तो थोडा शांत होऊन बोलतो...
" सिरिसली, एक जनरल स्टेटमेंट होते ते... " तो आता सावरा सावर करत बोलतो..." वाटल्यास मी यासाठी तुझी माफी मागायला ही तयार आहे... की मी तुला तशा मुलींमध्ये मोजले म्हणून..." असं म्हणत तो हात ही जोडतो...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा