दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 38
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 38
©®चैत्राली यमगर लिखीत...
" यू शुड बी... " ती आता जरा कठोर आवाजातच बोलते..
" बट आता एकदम कसा काय चेंज...?? आय मीन अशी उपरती झालीस कशी काय तुम्हाला... " तिने आता थोडे डोळे बारीक करत म्हटले..
" बट आता एकदम कसा काय चेंज...?? आय मीन अशी उपरती झालीस कशी काय तुम्हाला... " तिने आता थोडे डोळे बारीक करत म्हटले..
" काय.. कसले उपरणे...?? " पण तो शब्द ऐकून ह्याल उगीच धडकी भरली... तो जास्त लंडन ल शिकला असल्यामुळे इंग्लिश आणि हिंदी चं जास्त कळतं होते... मराठी इतके डीप त्याला येत नव्हते...
" उपरणे नाही ओ... उपरती... म्हणजे जाण... " तिची चांगली मराठी असल्याने ती आता त्याची गुरु झाली होती..
" जान म्हणजे प्रिय व्यक्ती " पण तो पुरता गोंधळून म्हणाला..
" ते जान वेगळे... हे जाण... " एक न बदल्याने किती फरक पडत होता हे आता तिला कळतं होते... आणि ती तेच त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत होती, " सोडा ते...आणि मुद्द्यावर या तुम्ही... " पण नंतर तिलाच कळाले की आपला विषय भरकटत आहे म्हणून तस ती म्हणाली...
" हम्म.. मेन मुद्दा... " त्याने ही हा शुद्ध मराठी समजून घेण्याचा नाद सोडला... कारण ते आपल्या 'बस की बात नही हैं ' हे एव्हाना त्याला ही कळाले होते.. " मेन मुद्दा हाच आहे की माझं आज अचानक उफाळून आलेलं हे प्रेम नाही.. ना वर वर चं... मी गेले वर्षभर तुला पाहतोय, तू आमच्या कंपनी त तुझ्या बाबाला टिफिन देण्यासाठी आली होती त्या दिवसापासून चं... " आता त्याने क्लिअर केल...
" ओह... " पण ते ऐकून तिला ना ख़ुशी झाली ना दुःख..
" पण प्रश्न परत तिथेच उरतो.. ठीक आहे, तुम्हाला फक्त तेवढंच बोलायचं होते का...?? जर तस असेल तर तुम्ही जाऊ शकता आता... " पण तिने त्या विषयाला आता जास्त फाटे फोडायचे नाही असा विचार करूनच त्याला पुढे बोलली... चक्क तिने त्याला निघून जा असा मोलाचा सल्ला दिला.. जिथे घर त्याच चं होते...
" व्हॉट द हेल... " पण ते ऐकून हा मात्र आता चिडला... पण तरी राग शांत करत म्हटले त्याने..." मी इथे तुला माझ्या मनातील बोललॊ... आणि तू असं मला जायला सांगत आहे... "
" मग मी काय कराव अशी अपेक्षा आहे आपल्याला... " ती आता त्याला चं विचारत होती आणि तो सिरिअसली चं एक्सप्रेशन देतो यावेळी... " हे बघा, तुमचं प्रेम आहे, तर ओके.. मला आदर आहे.. पण माझ्या मनात तुमच्याबद्दल तस काहीच नाहीये... आणि पुढे तर काही नसण्याचेच जास्त चान्स आहे...आपले हे करार लग्न आहे हे मी कधीच विसरू शकत नाही... " आज ते दोघे पहिल्यांदा चं इतका वेळ बोलत होते पण ते ही भांडण चालू होते...तिला खरंतर हेच विचारायचं होते जे नट्स ने थोड्यावेळापूर्वी म्हटले होते... पण त्याआधीच त्याने आपले प्रेम असल्याचे सांगितलेलं होते..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा