Login

विवाह एक अनोखे नाते 39

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने विवाह केला होता पण टिकू शकेल का हे लग्न
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते  39
©®चैत्राली यमगर लिखीत...

" ओके... " ती तस बोलते, तस हा एक नैराश्यजनक उसासा सोडतो... " मी ही तुझ्या फीलिंगस चा रिस्पेक्ट चं करतो... आणि मला माहीत आहे की तू का मला नाही म्हणत आहे... " तो असं बोलतो आणि ते ऐकून हिच्या भुवया जुळवल्या जातात...

" तुझं एका मुलावर प्रेम आहे हे तर मला कळाले आहे हे आता चं मी सांगितलं... " आता तोच पुढे बोलू लागतो.. आणि तिच्या लक्षात येते की तो मघाशीच त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलला होता.. ते ऐकून तिचे ते जुळलेल्या भुवया आता लोप पावतात... " चल मी हे ही मानलं की हे करार लग्न आहे.. कारण मीच सांगितलं होते... पण आता पुढे काय करणार..?? आपले करार संपल्यावर...?? परत त्या मुलाकडे परत जाणार आहे... ज्याला तुझ्यासाठी फीलिंग्स चं नाहीये.. " तो आता तिचा दंड घट्ट धरत विचारतो..


ज्यामुळे तिला थोडे पेन होत होते...पण सध्या शारीरिक पेन पेक्षा तो जे बोलला त्याचा तिला त्रास होत होता... हे खरं होते की सुशील ला तिच्यासाठी फीलिंग्स नव्हत्या...पण का ती त्याला हवी होती, जिद होती म्हणून की अजून काही हे फक्त त्याचे त्यालाच माहीत होते...हा प्रश्न आशी च्या ही डोक्यात घुमत होता जेव्हा पासून तिने सुशील आणि स्नेहा ला एकत्र पाहिले होते... स्नेहा तशी चं मुलगी होती.. तिला ड्रेस बदलतो तस bf बदलायची सवय होती... पण तिचा हा दुर्गुण आपल्या पर्यंत कधी येणारचं नाही तर कशाला काळजी करायची या भ्रमात ती मात्र होती...



आणि जेव्हा हे तिच्या समोर आले तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला की पुढचा मागचा विचार न करता तिने, सरळ अर्णव ला होकार दिला... त्याच्या बद्दल काही माहीत नसतानाही...पण आता तेच एका अनोळख्या मुलाकडून ही ती तेच ऐकत होती जे तिच्या बुद्धीला माहीत होते.. पण अजून ही मनाला पटत नव्हते... त्याला जाब तिने विचारला नव्हता ना एका शब्दाने तू असं माझ्या भावनांशी का खेळलास असं विचारलं होते... त्यामुळे तिच्या मनाला अजून ते पटत नव्हते...


" तू गेल्या नंतर त्या दोघांचं मी बोलणे ऐकले आहे... " पण तिला असं शांत पाहून आता थोडे बळ घेऊन चं अर्णव बोलायला लागला.. आणि ते ऐकून आश्चर्याने तिने पाहिले त्याच्याकडे... कारण तिने संपूर्ण पब पाहिले होते अर्णव ला पण अर्णव तिला दिसला नव्हता.. तो तिथे नसावा असं तिला वाटत असताना चं आता त्याने हा बॉम्ब टाकला होता.. ज्यामुळे तिने त्याच्या कडे अविश्वसनीय नजरेने पाहिले...


" तू जिथे नाही पाहिले तिथेच मी बसलो होतो... " आणि तिची नजर आता त्याला लगेच ते सांगून गेली तस तो बोलायला लागला.. " मी तुमच्या शेजारीच बसलो होतो... त्याच एरियामध्ये जिथे तू तुझ्या मैत्रिणी ला ती जे वागली ते तुला कळाले आहे असं सांगितलं... " तो बोलला आणि तिला आठवले की तिथे एक हुडी घातलेला एक मुलगा बसलेला होता ज्याची ह्यांना पाठ होती... आणि स्नेहा शी बोलताना ती अधून मधून त्याला ही न्याहाळत होती... त्याला ऐकायला ऐऊ नये याची दखल घेत होती.. तो अपरिचित होता आणि या दोघींची भांडणे तिला अपरिचित माणसाला कळू द्यायची नव्हती बस एवढाच तिचा यामागे मानस होता...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही


0

🎭 Series Post

View all