Login

विवाह एक अनोखे नाते 42

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने लग्न केल पण टिकेल का हा विवाह...??
विवाह एक अनोखे नाते  42
©®चैत्राली यमगर लिखीत...


" नाही, तिच्या क्स चा असता कॉल तर ती इतकी खुश नसती.. " आणि परत स्वतःला समजावत तोच आता आपले आवरून ऑफिस ला जाण्याची तयारी करतो...


" किती झाले पैसे... " इकडे, आशी सुद्धा एका रिक्षावाल्याला बोलते.. ज्या रिक्षातून ती उतरली होती... समोर एक आलिशान बिल्डिंग होती... ज्यावर A R constrution असा मोठा बोर्ड लावला होता... रिक्षावाल्याचे पैसे देऊन आता तिने समोरच्या त्या बिल्डिंग कडे पाहिले... आणि एक मोठा उसासा सोडला..


" आधी जाताना कधीच आशी तुला, आशी भीती वाटली नाही... " तिने उसासा सोडतच आपल्या हातातील फाईल घट्ट छातीशी कवटाळत म्हटले... " बाबाला डब्बा द्यायला आपण रोजच महिनाभरा पूर्वी येत होतो.. पण असं कधीच हुरहूरी मनाला दाटून आली नव्हती.. पण आता जे आपण ठरवलं आहे ते आपल्याला करावेच लागेल... शिवाय बाबाने हे लग्न करायला का भाग पाडले याच ही कारण इथेच समजेल... " तिने मनात विचार केला.. आणि स्वतः ला कंट्रोल केल...व तडक ती ऑफिस मध्ये शिरली...


" मी आशी... " तिने हसून आता आत येताच reception ला म्हटले...


" काय तू आशी.. माझी चं मस्करी करते का..?? " पण ती receptionist तिला चं आता हसून म्हणते.. बाबाच्या ओळखीने तिला हा जॉब मिळाला होता.. तिला A R construction मधले सगळे त्यामुळे ओळखत होते...


कंपनी च्या पॉलिसी प्रमाणे तिला त्यांच्या जागेवर जॉब देण्यात येत आहे असा चं सकाळी कॉल आला होता.. आणि म्हणूनच ती खुप खुश होती... निदान 6 महिने तरी ती या कंपनीत काम करू शकणार होती त्यामुळे पैशाचे तिचे प्रॉब्लेम्स सुटणार होते...


" तुझी फाईल दे... मी मॅनेजर ला देऊन येते... " तीच receptionist आता तिच्या हातातील फाईल घेऊन बोलते... आणि लगेच आत त्यांच्या मॅनेजर कडे ही जाते...पुढच्या दहा मिनिटात तिला मॅनेजर आत बोलून घेतात...


. पण या दहा मिनिटात मात्र ती पूर्ण कंपनी चा एरिया पाहत होती... सर्व भूतकाळ तिला आठवत होता.. बाबांना डब्बा द्यायला आलेली असताना, तिथला स्टाफ तिच्याशी किती प्रेमाने बोलायचा ते ही आठवत होत.. महिना तर सरला होता फक्त.. पण या महिनाभरात तिला खूप बदल झालेला कळतं होता तिच्या डोळयांना... शिवाय आता तेचं सर्व लोकं जरी होते तरी तिला ते परके वाटत होते.. कारण ते फक्त तिला एकटक बघत होते.. मोस्टली तिच्या मंगळसूत्राकडे त्यांचं लक्ष आहे असं का सारखं तिला वाटत होते... त्यांचे चेहरे ही तिला पडलेले वाटत होते... तिने एका खुर्ची कडे पाहिले.. जिथे तिचे एक लाडके काका बसायचे, देशमाने काका म्हणून.. ते अजून आले नव्हते, त्यामुळे ती खुर्ची रिकामी होती. ती आता उगाच आपल्या त्या मंगळसूत्राशी खेळतच होती की receptionist ने तिला आत जायला सांगितले...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all