दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 28
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 28
©®चैत्राली यमगर लिखीत...
" सॉरी मी ते... " पुढे काय झालं तिला स्वतः लाच कळाले नाही आणि ती डायरेक्ट आता त्याच्या रूम मध्ये शिरत बोलते...
" आशी, तू... " आणि तिला अस अचानक बघून ते दोघे थोडे अस्वस्थ झाले.. पण लगेच सावरत अर्णव च पुढे बोलला..." तू काय करतेय इथे...?? आमचं बोलणे चोरून ऐकत होतीस का...?? " आणि लगेच एक भुवई उंचावत थोडे दटावत च तो बोलला..
" सॉरी... मी खरं तर नव्हते ऐकणार तुमचं बोलणे... आणि नाही अशी आत येणार होते... " आपण खाल्लेली माती तिला एव्हाना कळाली होती.. पण आता वेळ निघून ही गेली होती... त्यामुळे तिने बोलायचं ठरवलं...
" पण तू ते केल आहेस..." आता मात्र त्याने जळजळीत कटाक्ष टाकत म्हटले,एकतर त्यात त्याला हे ही कळत नव्हते की तिने त्यांचं नक्की किती बोलणे ऐकले आहे..." मी तुला या आधी ही सांगितलं आहे की मी हे लग्न माझ्या घरच्यांच्या ख़ुशी साठी केल आहे... त्यांना ते इंडियन बहू, संस्कारी बहू वैगेरे हवे होते म्हणून... आणि नट्स लंडनची आहे म्हणून सगळे... " तो तिला तेच तेच सांगत होता जे त्याने पहिल्याच भेटीत तिला सांगितलेलं होते... तिच्या मनावर त्याला हेच ठासून ठासून भरायचं होते...
" हॊ मला समजत आहे... " पण आता तो अजून काही बोलणार तस तिने डोळे फिरवले आणि बोलायला लागली... पण आवाज मात्र आता तिने कमालीचा शांत ठेवला होता...
" हे बघा नट्स ताई ... मी ही तुम्हाला हेच सांगायला आले आहे... " आणि आता असं बोलून तिने आपला मोर्चा वळवला... हीला बोलताना तर तोच आवाज आता समजूतदारीचा होता.. जणू या तिघांत आता ती एकटीच समजूतदार असावी असं वाटतं होते...
" हे बघा नट्स ताई ... मी ही तुम्हाला हेच सांगायला आले आहे... " आणि आता असं बोलून तिने आपला मोर्चा वळवला... हीला बोलताना तर तोच आवाज आता समजूतदारीचा होता.. जणू या तिघांत आता ती एकटीच समजूतदार असावी असं वाटतं होते...
" नटस ताई... " पण तिचे हे बोलणे ऐकून आता अर्णव ला हसू आवरले नाही.. कारण नट्स ला तो लहानपणापासून चांगलाच ओळखत होता... आणि तिला असल बोललेलं आवडत नव्हते... आपली आशी ही तशी बोलली ही नसती पण समोरची व्यक्ती आपल्या पेक्षा मोठी आहे तर दादा दीदी म्हणणे हे तिच्या संस्काराचा भाग असल्याने ती चुकून बोलून गेली होती..
" एक मिनिट... " नटस ने रागात आता हसणाऱ्या अर्णव ला पाहिले तस तो एकदम शांत झाला... कारण तिची मदत जी हवी होती त्याला, त्यामुळे माघार घेणे आता त्याने पसंत केल होते..." हे बघ, एकतर मी तुझी ताई बाई नाही... आणि हॊ, तुझं बोलणे ऐकण्या इतपत आपल्यात काही फ्रेंडशिप ही नाही... सो... " आणि पुढे तिला रागवत नट्स बोलते..
" हॊ, आय नो, माझ चुकले.. मला तुम्हाला ताई म्हणायचं नव्हते.. पण.. " ती आता एका दमात सगळे बोलून टाकायचा प्रयत्न करत होती.. " मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्यात आणि ह्यांच्यात काहीच रेलशनशिप नाही.. आणि कधीच नसेल... तुम्ही निर्धास्त राहा..." एव्हडं बोलून ती आल्या पावली निघून ही गेली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा