विवाह एक अनोखे नाते...2
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025-2026
" आशी, मी तुला शेवटच विचारत आहे... " शेवटी तो ही मग हताश होऊन विचारतो..
" आणि सुशील मी ही तुला शेवटचचं सांगत आहे... " पण ती ही पक्का निर्धार करत बोलते.. " मी या आधी ही तुला कधी तसा इशारा दिला आहे का... की तू त्याला प्रेम समजावे...?? " पण आता ती त्याला चं पुढे प्रश्न करते..
" अम्म... " आणि तिचा प्रश्न ऐकून तो मात्र भांबवून जातो. डोक्याला ताण ही देतो.. " नाही.. म्हणजे हॊ, मला मान्य आहे की तू असं काही तुझ्या अँगल ने सिग्नल दिला नाहीस.. पण.. "
" पण बिन काही नाही..." पण ती त्याला मध्येच काटत म्हणते..." हे बघ आता तू सुद्धा क्लिअर केल आहेस की, मी तुला सिग्नल दिला नाही तसा... याचा अर्थ असा आहे की माझ्याकडून प्रेम कधीच नव्हते... सो प्लीज... " ती आता हात जोडून बोलते..
" शब्दाचा खेळ तू छान खेळतेस... " आणि तीच असे बोलणे ऐकून तो टाळ्या वाजवत म्हणतो... " ठीक आहे... मी तुझ्या आयुष्यातून कायमच जातो... आयुष्यातून चं काय.. मी तर... " तो पुढे काही बोलणार तशी ती पटकन, घाबरून त्याच्या ओठांवर हात ठेवते.. आणि मानेनेच नाही म्हणते..
" हाहा.. " तो थोडा उपहासात्मक हसतो, तस ती आपला हात पटकन काढते.. कारण त्यामुळे तिच्या हाताला त्याच्या ओठांचा नकळत स्पर्श होत होता.." नाही गं वेडे, इतका पण मी दुबळा नाही की... मी आत्महत्या करावी... " तो तसंच स्माईल करत बोलतो...
" हम्म... " पण यावर ती काय बोलणार म्हणून फक्त हुंकार भरते..
" हा पण एक सांगतो.. मित्र म्हणून सल्ला घे नाहीतर आणखी काही... " तो पण पुढे बोलायला लागतो, चेहऱ्यावर आता ही तिच्यासाठी काळजी, प्रेम दिसत होते... " उद्या जर तो तुझ्या , म्हणजे तुझा होणारा नवरा जर प्रेमात पडला ना , तर त्याला ही असच काही बोलून दूर लोटू नकोस... " एवढं बोलून तो निघून जातो... एकदा ही मागे न पाहता..
" सॉरी सुशील... सॉरी... " आणि ती मात्र त्या जाणाऱ्या सुशील कडे पाहत तशीच गुडघ्यावर बसते रडतच... " माझ ही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे... अजूनही... पण.. पण काय करू मी...?? इकडे बाबाच स्वप्न... तर दुसरीकडे तू... या कात्रीत मी सापडले आहे... " ती तशीच रडत बोलत होती...
. प्रेम तर तीच ही होते पण तरी ही ती नाकारत आहे... का ? बाबाच स्वप्न...?? असं काय असेल ज्यामुळे तिला आपल्या प्रियकराला... असं इच्छा नसून ही अर्ध्या रस्त्यावर सोडावं लागत असेल... जाणून घेऊयात पुढच्या भागात..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा