विवाह एक अनोखे नाते...3
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025-2026
" हे बघा.. " तो जाताच एक तिशीतला मुलगा तिच्या समोर होता आणि एक लांब लचक पॉझ घेऊन आता तो बोलायला लागतो, " हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध होत आहे.." तो बोलतो पुढे आणि ती आपल्या डोळ्यातील अश्रू त्याच्या ही नकळत पुसत पाहते.... तिच्यासाठी हा धक्का असतो.. कारण तिच्या बाबांनी तिला मरताना हेच सांगितलं होते की, तिकडच्यानी तिला मागणी घातली होती... मग हे असं कस...??
" पण तुम्ही तर मला... " ती पुढे काही बोलणार तोच,
" हे बघा आधी मला बोलू दया... " पण तिला तो बोलूनच देत नव्हता... " खरंतर माझ एका मुलीवर प्रेम आहे... अर्थात तीच ही माझ्यावर आहे. आम्ही लग्न ही करणार होतो... पण... " तो बोलता बोलता सिरिअस झाला होता..त्याने आपला चष्मा ( जो फ्रेमलेस होता ) तो वर करतो...
" पण...?? " आणि त्या पण ने तिचा जीव घाबरा झाला... असं का हे तिला कळतं नव्हते... फक्त कुणीतरी आपल्याला या खाईत खेचत आहे... दैव आपली निष्ठुर परीक्षा घेत असावा असं तिला मनाला वाटून गेलं...
" हे बघा, माझी गर्लफ्रेंड ही लंडन ची आहे आणि म्हणूनच... " त्याने एक सुस्कारा सोडत म्हटले.. " आय होप मला काय म्हणायचं आहे ते लक्षात आले असेल... "
" हम्म.. आणि म्हणूनच तुम्ही हे करार लग्न... ते ही 6 महिन्यासाठी करायचं म्हणत आहात... राईट...??" ती थोडी रागात होती, गोंधळली ही होती... त्यामुळे या अनोळख्या मुलाशी कस बोलावे हा ही तिला प्रश्न पडला होता...
" हॊ... कारण या लग्नाला तस काही अर्थ चं उरत नाही ना... " तो किंचित हसत बोलतो...
" हम्म... ठीक आहे.. मी तयार आहे... तस ही या शिवाय माझ्या कडे अजून कोणता ऑप्शन आहे म्हणा... " ती किंचित हसत, पण खेद व्यक्त करत म्हणते..
" हॊ... मग उद्या चं... " त्याने आता थोडे भीत भीत विचारले...
" हॊ चालेल मला... " यावर ती आता ठामपणे बोलते, " फक्त उद्या मला किती वाजता कोर्टात यायचा आहे ते कळवा... " तिने मोबाईल कडे पाहत म्हटलं..." मग मी जाते आता... " आणि पुढे लगेच आपली पर्स नीट खांद्यावर घेत बोलते...
" हॊ पण तुम्हाला बोलवायचं तर मोबाईल नंबर... " आता ही तो थोडा बिचकतच बोलत होता...
" अं.. हॊ... " तिने मग त्याचा मोबाईल हातात घेतला आणि नंबर आपला टाईप केला... " कोणत्या नावाने सेव करू... " आणि कॉन्टॅक्ट saved च्या ऑप्शन ला पाहतच तिने विचारले..
" म्हणजे... " पण त्याला तिचा प्रश्न चं समजला नाही... कारण तो तर तिलाच पाहण्यात गुंतून गेला होता... क्षणभर या मुलाखतीत ही.. खूप कॉन्फिडन्ट, खुप स्ट्रॉंग वाटत होती त्याला ती... कारण तिचे बाबा जाऊन अवघे 10-12 दिवसच झाले होते... आणि तिचा ह्याच्याशी लग्नासाठी होकार अचानक आला होता...
काय असेल यांची कहाणी...?? कोण आहे नक्की तो...?? जाणून घेऊयात पुढील भागात...
क्रमशः
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा