Login

विवाह एक अनोखे नाते 4

बाबांची शेवटची इच्छा म्हणून तिने तर केल हे लग्न.. पण ते ती निभाऊ शकेल का... जाणून घेऊयात या कथेमध्ये
विवाह एक अनोखे नाते...4

दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025-2026

" म्हणजे... " पण त्याला तिचा प्रश्न चं समजला नाही... कारण तो तर तिलाच पाहण्यात गुंतून गेला होता... क्षणभर या मुलाखतीत ही.. खूप कॉन्फिडन्ट, खुप स्ट्रॉंग वाटत होती त्याला ती... कारण तिचे बाबा जाऊन अवघे 10-12 दिवसच झाले होते... आणि तिचा ह्याच्याशी लग्नासाठी होकार अचानक आला होता...

" नाव...?? कोणत्या नावाने सेव्ह करू... " ती आता त्याला थोडी रागातच बोलते... आणि मोबाईल कडे ही निर्देश करते... राग या गोष्टीचा... एकीकडे हा म्हणत आहे की माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून करार लग्न करूयात आणि दुसरीकडे हा तिला मात्र असा, वेगळ्याच नजरेने पाहात होता...
" टिपिकल पुरुष जात... " आणि ती हळूच पुटपुटली...

" आम.. काही म्हणालीस का... " पण त्याच्या कानापर्येंत आवाज जात नाही...


" नाही... मी केलाय सेव्ह.. " ती असं बोलून त्याचा मोबाईल त्याच्या हातात देत बोलते...


" अरे हे कसले नाव ठेवले आहे... " आणि तिने तो दिलेला मोबाईल हातात घेऊन... सेव्ह झालेला नंबर पाहात, आश्चर्य व्यक्त करत म्हटला...


" का काय झालं आवडल नाही का... " पण त्याला असं पाहून ती फणकाऱ्यात बोलते..


" नाही तस नाही... पण जरा वेगळे वाटले ना... " तो आता हसत बोलतो..." म्हणजे उद्या जाऊन मोबाईल मध्ये तुझा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे हे पाहीले तर हसतील चं ना... "


" असं काय मी वेगळे नावाने सेव्ह केल आहे... " पण त्याला असं हसताना पाहून ती आता विचित्र नजरेने पाहत बोलते, " हे बघा मिस्टर अर्णव रायजादा... ते माझ नाव आहे.. खूप छान आहे... आशी आणि त्याच नावाने मी सेव्ह केल आहे... हा आता तुम्हाला जर आवडलं नसेल माझ नाव तर... " ती मात्र वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये बोलली आता.

" नाही... मला तुझ्या नावाचा काहीच issue नाही... रादर मला हे नाव खूप आवडते... " तो आता खूप गंभीर होत बोलतो... ज्यामुळे तिच्या कपाळावर नापसंती चे जाळे उमटले... " बट आर यू शुअर...?? की तू तुझ्या ह्याच नावाने सेव्ह केला आहेस नंबर...?? " पण तो ही आता पुढे तिला टशन देत बोलतो...


. कोणत्या नावाने बरं तिने त्याच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह केला असेल...?? ज्याने हा एवढा हसत असेल...?? कळेल कळेल, पुढल्या भागात नक्कीच बऱ्याच प्रश्नांची ही उत्तरे मिळतील...पण आता मी ओळख करून देते आपल्या नायकाची... हॊ, नाव त्याच अर्णव चं आहे... पण रायजादा नाही तर,अर्णव राजाध्यक्ष आहे... आता ती तस का म्हणाली हे पण कळेल चं पुढच्या भागात... तुम्हाला मात्र ह्यांची vibe कशी वाटते... समीक्षा देऊन नक्की सांगा...


क्रमशः

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all