Login

विवाह एक अनोखे नाते 5

बाबांची इच्छा म्हणून केलेलं तिने हे लग्न... पण ती हे नाते निभाऊ शकेल का...??
विवाह एक अनोखे नाते...5

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-2026

" बट आर यू शुअर...?? की तू तुझ्या ह्याच नावाने सेव्ह केला आहेस नंबर...?? " पण तो ही आता पुढे तिला टशन देत बोलतो...

" आता हे काय भलतेच... " पण तिला त्याच्या अशा बोलण्याची जाम चीड येते... " हे बघा मला माझ नाव चांगलेच माहीत आहे.. आणि हे पाहा... " म्हणत चं ती त्याच्या हातून त्यांचा मोबाईल हिसकावून पुढे ते कॉन्टॅक्ट लीस्ट ओपन करतच बोलायला लागते, " आणि माझ्या नावाचं स्पेलिंग ही मला... " ती पुढे वाक्य पूर्ण करणार तस तिच्या लक्षात आपली चूक येते.


" हाय रे दैय्या... " आणि तिने ते नाव वाचून, मोबाईल घेतलेला तो हात, आपल्या कपाळावर मारत, जीभ अर्धवट काढत म्हणते.. ज्यात ती खूपच लोभस वाटतं होती... कुणी ही तिच्या प्रेमात पडावे इतकी गोड होती ती तशी ही...

" कळाले आता मी काय नक्की म्हणत होतो... " तो तिच्या अशा एक्स्प्रेशन वर भुळला नसेल असं थोडी होणार होते.. पण तरी ही तो मनावर कंट्रोल करून हसत बोलतो, " नाही म्हणजे हे असं " करार बायको " तुला म्हणायला मला काहीच प्रॉब्लेम नाही.. " तस ती आता त्याच्याकडे रागात, बारीक डोळे करून पाहते...


" नाही... " तो नकारात्मक मान हलवत म्हणतो, " हॊ, ते असं चार चौघात कस म्हणणार नाही का... ये कराराची बायको... जरा ऑकवर्ड चं वाटेल नाही का... " तो आता तिची मस्करी घेत होता... आणि ती फक्त याला डोळे फाडून पाहत होती... तो असाच सगळ्या मुलींशी फ्लर्ट करतो.. की फक्त आपल्यासमोर चं शायनिंग मारत आहे हेच तिला कळतं नव्हते...


" अर्णव रायजादा... तुमचे pj झाले असतील... तर मी निघू का... " ती बॉक्स टाईप हसत त्याला विचारते.

" ओय हा आता अर्णव रायजादा कोण...?? " पण तो परत तिच्या तोंडी आपले हेच नाव ऐकून, थोडे रागात म्हणतो...
" तुला बॉयफ्रेंड आहे का... या नावाचा... " आणि त्याचा हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावरील गोंधळता निर्माण करते..

" बॉयफ्रेंड... " असं उच्चारून च...

काय देईल ती या प्रश्नाचे उत्तर...?? ती सांगेल का तिच्या आणि सुशील च्या नात्याबद्दल...?? आणि ती त्याला रायजादा का म्हणाली जाणून घेऊयात पुढच्या भागात...भाग कसा वाटला समीक्षा देऊन नक्की सांगा..


क्रमशः

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all