विवाह एक अनोखे नाते 6
दीर्घकथा लेखन स्पर्धा, डिसेंबर-जानेवारी 2025-2026
" का..?? काय झालं...?? " पण तिचा असा चेहरा गोंधळलेला पाहून तो मात्र आता कमालीचा शांत झाला होता..
" न.. नाही... काही... " आता ती थोडी अडखळली..
" आणि नाही आहे कुणी मला बॉयफ्रेंड.. हॊ पण एक खास मित्र मात्र होता... " तिने थोडे अर्ध सत्य सांगितलं...
" आणि नाही आहे कुणी मला बॉयफ्रेंड.. हॊ पण एक खास मित्र मात्र होता... " तिने थोडे अर्ध सत्य सांगितलं...
" खास मित्र...?? " हे ऐकून त्याने मात्र भुवया उंचावल्या...
" हॊ खास मित्र... " तिने मात्र आता स्वतःला आधी धीट केल, " का तुम्हाला ही आहे की खास मैत्रीण.... " तिने नंतर लगेच त्यालाच टोलावले...
" खास मैत्रीण नाही, ती माझी गर्लफ्रेंड आहे..." त्याने आता स्पष्ट केल.. आणि ते ही अगदी हसत.. " बाकी मला तुमच्या खाजगी आयुष्यात नाही पडायचं... तस ही आपले हे नाते 6 महिन्यांच्या कराराने तर बांधले गेले आहे... "
" हम्म... हॊ.. " ती थोडी शांत होत बोलते, " आणि मला ही तुमच्या... " ती एवढंच बोलून थांबते....
" काय माझ्या...,?? " तो लगेच सवाल करतो...
" अहो म्हणजे मला ही तुमच्या पर्सनल मध्ये नाही पडायचं... " तिने आता स्पष्ट केल... पण खरंच दोघे नव्हते पडणार का...?? हे तर पुढे च कळणार होते...
" बर मग मी निघू... " आता पुढे काय बोलायचं असा प्रश्न मनात आल्याने शेवटी, एक दोन मिनिटाचा पॉझ घेत ती विचारते...
" तुम्हाला माझी गर्लफ्रेंड आहे हे ऐकून राग नाही आला..." तो समोर दिसणाऱ्या मावळत्या सूर्याला पाहत तिला म्हणतो, " तरीही तुमच्या शी मी विवाह करत आहे याचा... "
" अं.. " पण यावर ती काय बोलणार?? तिच्या तोंडून फक्त हुंकार आला.. त्याने तिच्याकडे पाहीले, तर त्याला उगाच ती कुठेतरी हरवली आहे असं वाटले...
" तुम्ही येऊ शकता... उद्या कॉल करेन मी..." तस आता तो तिच्याकडे पाहत हसून बोलला, " कराराची बायको " आणि आता डोळा ही मारत पुढे तिला चिडवले...
" सॉरी ते माझ्याकडून... " ती आता ओशाळली, " तुम्ही त्या जागी माझ नाव टाकाल का, आशी.. आशी कदम म्हणून "
" इट्स ओके... " त्यावर तो गोड हसला, " डोन्ट बी पॅनिक, माझा मोबाईल कुणी घेत नाही... " त्याने च पुढे कूल अंदाजात म्हटले...
" हॊ पण तरी..." तिने जरा ऑकवर्ड होऊन म्हटले...
" मी म्हटले ना. इट्स ओके... " त्याने आता थोडे दाबतच म्हटले, " बर उशीर होईल तुम्हाला... तुमचं घर विरार ला आहे तर..." पुढे तोच कॅझ्युअल बोलाव तसे बोलला..
" अरे हॊ... " तीच ही मग घड्याळात लक्ष गेले, साडे सहा च्या आसपास टाइम तसा झाला होता... इतका ही उशीर नव्हता झाला तिला.. पण तरी ही ती हॊ म्हणाली... " येते मी, भेटू उद्या... " ती आता हसून बोलली..
" हॊ.. पण येताना आपले सामान ही आणा... " त्याने आठवण करून दिली.. असं वाटत होते, जणू त्याला ही त्यांची भेट संपूच नये...पण गर्लफ्रेंड असूनही हा तिच्या प्रेमात पडत होता का?? आता याच उत्तर तर पुढेच कळेल.. तुम्हाला हा भाग कसा वाटला.. समीक्षा देऊन नक्की सांगा..
क्रमशः
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा