दीर्घ लघुकथा लेखन स्पर्धा, डिसेंबर-जानेवारी 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 7
©®चैत्राली यमगर लिखीत..
©®चैत्राली यमगर लिखीत..
" हॊ.. पण येताना आपले सामान ही आणा... " त्याने आठवण करून दिली.. असं वाटत होते, जणू त्याला ही त्यांची भेट संपूच नये...पण गर्लफ्रेंड असूनही हा तिच्या प्रेमात पडत होता का?? तिने यावर फक्त त्याला पाहीले..
" अहो, करार जरी लग्न करत असलो तरी त्या लग्नानंतर तुम्ही माझ्या घरी येणार आहात ना राहायला... " त्याने तिची नजर ओळखत म्हटले..
" अरे हॊ... सॉरी हा, माझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली... " ती आता स्वतः ला टपली मारत म्हणते, " बर आणते मी... पण आता जाऊ का... " तिने थोडे उपरोधात्मक हसून म्हटले...
" हा जावा ना... " तो पुढे बोलला... " मी कोण ना तुम्हाला अडवणारा... " आणि पुढचं वाक्य त्याने थोडे हळूच पुटपुटले...
" काय... काय म्हणालात तुम्ही... " आणि तिने ते ऐकून ही परत त्याला विचारले...
" काही नाही... " त्याने थोडे पुढे कूल अंदाजात म्हटले... " आणि बाय द वे, माझ नाव अर्णव रायजादा नाही.. माझ अर्णव राजध्यक्ष आहे... नाही मोबाईल मध्ये त्याच नावाने सेव्ह करसाल, आणि मग कुणी पाहीले तर... " तो आता हसत म्हणाला...
" हॊ मला माहीत आहे, तुमचं नाव अर्णव... राजध्यक्ष आहे... " ती ही आता ठसक्यात उत्तरली... " आणि मी तुमचा नंबर त्याच नावाने सेव्ह केला आहे... शिवाय माझा ही मोबाईल कुणी चेक करत नाही... " त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देत होती..
" ओहके... ओहके.. कूल... " तो थोडा उदास हॊत म्हणतो, कारण आता काहीच कारण नव्हते ज्यामुळे ती अजून थांबेल..." तुम्ही येऊ शकता आता... की मी सोडू तुम्हाला... मी बाईक आणली आहे... " पण पुढे परत डोळे मिचकावत म्हणतो...
" नाही.. नको... मी जाईल... नाहीतरी घरी जाऊन मी तरी काय करणार आहे... " ती ही आता उदास झाली होती, " तस ही तुमच्या बाईक वर मला बसलेलं पाहून तुमची गर्लफ्रेंड नाराज होईल... " ती पण नंतर सावरत, किंचित हसत बोलते...
" असं काही नाही ओ... " तो शांत होऊन बोलतो, तस तिचा चेहरा परत गोंधळतो... तिला कळतच नव्हते की हा असा का वागत आहे.. " म्हणजे ती लंडन ला असते ना... तर तिला कस कळणार नाही का...? आणि ती नॅरो माईंड नाही आहे... घेईन मला समजून... " तो आता थोडे स्माईल करतो..
" हम्म, चांगले आहे..." ती आता शांत होते, जणू त्याने केलेली ही तारीफ तिला आवडली नसावी " नाही म्हणजे मला जरा ऑकवर्ड वाटत होते बोलताना... वाटतं होते उगाच की ती आता येईल आणि... " ती हसून बोलत होती..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा