दीर्घ लघुकथा लेखन स्पर्धा, डिसेंबर-जानेवारी 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 8
©®चैत्राली यमगर लिखीत..
©®चैत्राली यमगर लिखीत..
" कुठल्या वेडपटशी लग्न लावत आहात बाबा तुम्ही... " ती आता घरी आली होती... तिचे घर म्हणजे ती पेइन्ग गेस्ट म्हणून या घरात राहत होती.. जे 3bhk फ्लॅट होता आणि त्यात त्या 4 जणी राहत होत्या...एक महिना आधीच ती राहायला आली होती...
. कारण तिचे बाबा हॉस्पीटल मध्ये, कोमात होते... होता तो त्यांचा फ्लॅट विकून तिने आता पर्येंत हॉस्पिटल मधील सर्व बिल चुकते केले होते... पण आता ना घर, ना पैसा अशी तीची अवस्था होती... त्यात तिचे वडील हे तिला कायमच एकटे करून गेले होते...आई तर कधीच तिला सोडून गेली होती... पण आता इतकी वर्ष असणारा तिचा आधार, तिचे बाबा ही आता या जगात नव्हते... अनाथ झाली होती पोर.. पण तरीही तिने आपले हे दुःख कुणाजवळ ही शेअर केले नव्हते. अगदी सुशील शी ही ती या काळात कमी बोलायची...
" बाबा, काय असं कारण होते की तुम्ही सुशील ला नकार दिला आणि या वेडपट राजध्यक्ष शी मला लग्न कर म्हणून प्रॉमिस घेतले हॊ... " ती आता हातातील फ्रेम ला कवटाळून रडतच म्हटली..
" हे आशी... भेटली का तू तुझ्या बॉयफ्रेंड ला... " गेल्या महिनाभरात, तिची दिव्या या नावाच्या मुलीशी चांगली ओळख झाली होती... दिव्या वयाने हिच्यापेक्षा मोठी असल्याने ती तर हीला आपली लहान बहीण च मानत होती... तस ही तीच कुणीच नव्हते या जगात त्यामुळं अनाथ म्हणजे काय हे ही तिला चांगले च उमगत होते...
" हॊ दी... " तिने आपले डोळ्यातील अश्रू पुसले.. आणि किंचित हसून बोलायला लागली, " आणि दी, तो अर्णव ही आला होता आज भेटायला... " तिने पुढे माहिती दिली... सगळ्या गोष्टी तिने शेअर केल्या होत्या... त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तिने तिच्यापासून लपवली नाही.. महिना भराचे हे नाते, पण जणू असं वाटतं होते, ह्या दोघी कुंभमेळ्यात हरवल्या होत्या जे आता एकमेकींना भेटल्या असाव्यात... इतकं प्रेम, काळजी सगळे काही या नात्यात होते.. अगदी निरपेक्ष पणे...
" अर्णव...?? " तिने थोडे दचकत विचारले...
" अगं, अर्णव... तीच ज्याच्याशी माझ लग्न बाबांनी ठरवलं ना तेच... " तिने आता क्लिअर केल पण तिला थोडे आश्चर्य ही वाटले... कारण तिने ही माहिती ही दिली होती दिव्याला..
" अच्छा हा.. " तस ती आता हसून म्हणाली... " अगं माझ्या डोक्यातून च गेलं... आणि त्यात ना त्या नावाचा माझा बॉस पण आहे... जो सध्या माझ्या डोक्यात जात आहे... म्हणून आपले जरा.. " ती आता किंचित रागात बोलते...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा