दीर्घ लघुकथा लेखन स्पर्धा,
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 9
©®चैत्राली यमगर लिखीत..
©®चैत्राली यमगर लिखीत..
" हम्म " तिने त्यावर जास्त रिऍक्ट नाही केल कारण हे तर ती गेले महिनाभर ऐकत होती..
" बर जा.. हात पाय धुवून घे.. आणि मग आपण जेवायला बाहेर जाऊ. " दिव्या तिला हसत म्हणते...
" म्हणजे तू अजून जेवण नाही केल... " ती आता हातातल्या घड्याळात पाहत बोलते.. ज्यात साडे आठ वाजले होते..
" अगं म्हणजे मला भूक नव्हती.. म्हणून मग म्हटले तुझी वाट पाहावी.. आणि तू आलीस की जावे तुझ्या सोबत... " तिने हसून म्हटले...
" भूक नव्हती... सिरिअसली दी... " तिने डोळे मोठे केले... कारण या महिनाभरात तिला चांगलेच सगळयांचे स्वभाव कळाले होते.
" अगं हीला त्या सुशीलाबाईची काळजी वाटतं होती... म्हणून भूक असूनही आमच्या बरोबर नाही आली... " तोच अजून दोघी जणी आत आल्या आणि त्यातली संपदा नावाची मुलगी म्हणाली..
" कोण सुशीलाबाई...?? दी, ऑफिस मध्ये कुणी नवीन आले आहे का तुझ्या... " तस ती आता थोडी घाबरतच बोलली..दिव्या नाहीत मान हलवत काही बोलणारच की...
" घ्या आता... " तस दुसरी अजून एक मुलगी, मेघना आता हसत म्हणत.." हिचा तो बॉयफ्रेंड असून हिलाच तो... दी ग्रेट, सुशीलाबाई माहीत नाहीये... " ती हसून अगदी हातवारे करत च बोलते...
" माझा बॉयफ्रेंड, सुशीलाबाई... " तिने ते ऐकून आता डोळेच वर केले... " ओह्ह. सुशील बद्दल बोलत आहात तुम्ही... " तशी तिला ट्यूब पेटली..
" बॉयफ्रेंड म्हणता बरी लवकर पेटली गं तुझी ट्यूब... " तस आता दिव्या हसत तिला बोलते.. हॊ पण सोबत मोठी दी आहे याचा एक दाखला देऊनच.. म्हणजे अहो तिचा एक कान धरूनच...
" तसंच असं काही नाही. " पण तिच्या या बोलण्याने तिला आता त्याची आठवण नकळत येऊ लागली.. आपण चुकीचं वागलो ना त्याच्याशी... निदान आज लास्ट डे होता तर कमीत कमी त्याचा व्यवस्थित बोलून तरी निरोप घ्यायला हवा होता.. काय माहीत परत भेट आपली या आयुष्यात होईल की नाही...
" ओह मॅडम... " तोच तिच्या खांद्यावर टपली मारत दिव्या बोलते, " त्या खयाली पुलावातून बाहेर या.. आणि चला बाहेर जाऊन खरा पुलाव खाऊन येऊयात... नाहीतर आज तो पण नाही भेटायचा... " ती या दोघीकडे हसत पाहत म्हणते... आणि आशी ला आपली चूक लक्षात येते.
" सॉरी सॉरी दी... माझ्यामुळे तुला.. " तिला बोलताना एकदम गहिवरून येते.. " तुम्हा सगळ्यांची उद्या पासून खूप आठवण येईल... " ती आता इमोशनल होत म्हणते... आणि दिव्याच्या गळ्यात पडते...
" का उद्यापासून आठवण येईल...?? तू काय आम्हाला सोडून जाणार आहेस का दूर कुठे?? " पण तिला असं भावुक होऊन या तिघी गोंधळून जातात.. कारण तिचा आणि अर्णव चा निर्णय हिने अजून कुठे यांना सांगितला होता... सांगेन का ही ह्या तिघींना या करार लग्नाबद्दल की लपवून ठेवेल हे नाते जगापासून...??
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा