Login

विवाह एक अनोखे नाते 13

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने केला आहे विवाह.. पण हं टिकेल का करार लग्न..
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..

विवाह एक अनोखे नाते 13
©®चैत्राली यमगर लिखीत..

    

.      खरेतर तिच्या बाबाला ही अट बिलकुल च पसंत नव्हती... केली बंद तर केली.. मी माझी मुलगी तुम्हा श्रीमंत लोकांमध्ये नाही देणार असा रुबाब त्यांनी दाखवला...पण त्यामुळे गेल्या वर्षभरात खूपच लॉस ला गेली कंपनी...आणि त्याला जबाबदार कुसुमावतीनी आदित्य कदम आहे असं पूर्ण कंपनी तील मजुरांना सांगितलेलं... त्यांच्या विरुद्ध भडकावून दिले... जे त्यांना ही पटत नव्हते... पण मुलाच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली होती...


       पण आज जेव्हा त्याच मुलाने आपण हरलो अशी भावना व्यक्त केली तेव्हा त्यांना हायसे वाटले.. तस ही आशी किती ही सुंदर असली दिसायला तरी त्यांच्या स्टेटस ला मॅच कुठेच होत नव्हती... शिवाय त्यांना आपल्या मैत्रिणीची मुलगी नताशा ला आपली सुनबाई करायच होते... त्यामुळे त्यांना आशी नकोच वाटायची... नताशा ही बोल्ड होती, फक्त कपडे च नाही तर अगदी तिची विचारसरणी सुद्धा... जी लंडन मध्ये परफेक्ट मॅच होत होती...


" हॊ पण मी निर्णय घेतला आहे... " त्या आपल्याच विचारात असताना अचानक, अर्णव बोलला.. त्याच्या डोळ्यात ठामपणा दिसत होता..


" निर्णय..?? आणि तो आणि कसला... " पण त्याच बोलणे ऐकून मात्र आता कुसुमावतीचा घसा कोरडा पडला...


" मी ठरवल आहे, मी तिच्या शी ६ महिने करार लग्न करेल... आणि ६ महिन्यांनी तिला खुद्द तिच्या प्रियकराकडे नेऊन सोडेल.. " तो आपल्याच नादात बोलत होता..


" तिचा प्रियकर...?? ६ महिने करार लग्न..??" कुसुमावतींना काहीच कळत नव्हत त्याच अस असंबद्ध बडबडण... " तू काय बोलतोय.. होश मध्ये तरी आहेस काय... " त्या त्याला हलवून बोलतात..


" नव्हतो ईतके दिवस... " आता तो बोलायला लागला.. " तू आई किती समजावयचा मला प्रयत्न करत होती. ह्या मुली गरिब घरच्या फक्त पैसा पाहून धाव घेतात... स्वतःला विकतात ही... पण मला कायम वाटायचे, कि नाही आपली आशू अशी नाही.... ती तर अजून लहान आहे.. शिवाय इतकी इनोसंट आहे तर नक्कीच ती मला, आपल्याला संभाळून घेईल... अशीच मी कल्पना करत होतो गं.. पण आई... आई तू च बरोबर होती ग... या गरीब घरच्या सगळ्या एकाच लाईन मध्ये बसतात... श्रीमंत पार्टी दिसली कि हे स्वत लाही विकायला मागे पुढे पाहत नाही... " तो सर्व तिच्या वरचा राग सगळ्याच गरिबांवर काढत होता जे त्याचे त्यालाच कळत नव्हते..

तो असा का विचार करत आहे...?? अस काय त्याने पाहीले आहे... आशी आणि सुशील ला एकत्र पाहीले आहे का त्याने...?? आता त्याची आई कुसुमावती काय बोलेल जाणून घेऊयात पुढील भागात..

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all