डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 14
©®चैत्राली यमगर लिखीत..
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 14
©®चैत्राली यमगर लिखीत..
" पण मग करार लग्न...?? ते तू का करत आहेस...?? आणि तिला प्रियकर आहे अस म्हणत आहेस तर..?? " त्या आता त्याला शांत करत बोलतात...
" हॊ करार लग्न या साठी की मी तिच्या वडिलांची इच्छा नसताना ही तिच्याशी च लग्न करायचा हट्ट धरून बसलो होतो... आणि त्यामुळे मी आता तिच्याशी लग्न न करणे उचित वाटणार नाही म्हणून... म्हणून हे करार लग्न... "
" आणि तिच्या प्रियकराचा काय म्हणत होतास...? " त्यांनी पुढे उत्सुकतेने विचारलं..उत्सुकता ही की चला कमीत कमी ब्याद 6 महिन्यासाठी च आहे... जे अशे भुरकन निघून जातील आणि मग आपल्याला हव्या त्या मुलीशी त्याच लग्न लावता येईल असे अनेक विचार डोक्यात चालू झाले होते त्यांच्या...
" आम... म्हणजे मला नक्की नाही सांगता येणार... " ते आता तो शांत होऊ बोलला... " पण हॊ ती गुडघ्यावर बसून रडत होती... कुणाला तरी म्हणत होती की मी ही तुझ्यावर खूप प्रेम करते... " तो आता ते आठवून बोलतो... त्याने सुशील ला नव्हते पाहीले.. तिला त्याच्यासाठी रडताना पाहीले होते...
" ठीक आहे... " आता कुसुमावतीच्या मनात विचारांचे घोडे पळायला लागले होते, " तुला तिच्या बाबाला दिलेला शब्द पाळायचा आहे म्हणून हे लग्न, करार लग्न आय मीन तू करत आहेस तर ठीक आहे... माझी ना नाही... पण एका अटीवर... बोल मान्य आहे का तुला... " त्या आता त्याच्या पुढे एक अट ठेवत बोलतात...त्याच्या समोर हात करून..
" हॊ मान्य आहे... " तो ही मग आता त्यांच्या हातावर हात ठेऊन बोलतो, " आणि तसही मी फक्त तिच्या बाबाला च नाही तर आपल्या घरच्यांना, खासकरून तुला ही खुप त्रास दिला आहे या लग्नासाठी... अगदी तुला हे अस दुसऱ्याला कात्री त धरायला आवडत नव्हते पण... " तो आता अपराधी पणा ने बोलत होता, मान खाली झुकली होती त्याची आता, त्यांच्या समोर... " पण फक्त मला त्रास नको म्हणून... "
" तुला त्रास होऊ नये म्हणून फक्त... नाहीतर कात्रीत धरायला समोरच्याला... माझा त्र लहानपणापासून चा आवडता खेळ... " त्या मनात स्वतः शी थोडे खुनशी हसून बोलल्या... " ते सर्व आता सोड... आणि सगळे माझ्यावर सोपव... इथून पुढे मी जे काही म्हणेल त्याला तुझा होकार द्यायचा..." त्यांनी त्याला बजावून सांगितले..
" अगं पण आपण फक्त करार लग्न च करत आहोत.. त्या पुढे मला तिला काही त्रास द्यायचा नाही... माझ आज ही तिच्यावर तितकेच प्रेम आहे... " तो मात्र आईच हे बजावणे ऐकून थोडा बुचकळ्यात पडला...
" हे बघ आता माघार तू घेणार असशील.. तर हे करार लग्न ही मी खपवून घेणार नाही... " पण त्याही हट्टी, " आणि मी काही तिचा सासुरवास नाही करणार... " त्या थोडे हसून त्याचे ते सिल्की केस विस्कटत बोलतात, " हा फक्त तुम्ही दोघे लांब कसे राहाल याचा मी कडक बंदोबस्त करेल.. " आणि मनात असा कपटी निर्णय ही घेतात... ते ही क्रूर हसू आणत... आता त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.. कारण त्यांना हवे ते आता करता येणार होते... काय वाटतय, आशी ला हे सकरव समजेल...?? अर्णव च पहिले प्रेम, असच अधुरे राहील?? की कुसुमावती विलन म्हणून या सारीपाटा च्या संसारात आपली बाजी मारतील..??
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा