डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 15
©®चैत्राली यमगर लिखीत..
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 15
©®चैत्राली यमगर लिखीत..
" आणि तुझी अट...?? " त्याने थोडे काळजीने च म्हटले... मनात उगीच काहूर माजला होता.. पण तरीही त्याने थरथरत्या आवाजात विचारलं... खुप प्रेम नकळत तो करायला लागला होता तिच्यावर तो... कस कधी कुठे हे प्रश्न आता त्याला पडत नव्हते तर तिची ओढ लावत होते... आणि अशात आईनेच त्याच्या असा बॉम्ब टाकला होता... ज्यामुळे द्विधा मनस्थितीत अडकला होता.. कारण तिला त्रास देणे हे त्याच आता ध्येय नव्हते... तर तिला अजून या 6 महिन्यात प्रेम देण हा उद्दिष्ट होता त्याचा...
" तू अटीच सोड.. " तस त्या आनंदून म्हणतात, आणि ह्याने त्यांच्याकडे भुवया उंचावून पाहीले... मघाशी ची काळजीतील आई.. आता त्याला एक क्रूर व्यक्तिमत्व भासून जे गेलं होते... पण अस काही नाही म्हणून मनाला तो या वेळेत तसल्ली ही देत होता... " अरे म्हणजे.. हीच अट आहे समज अस मला म्हणायचं आहे... तू फक्त मला साथ दे... आणि 6 महिन्या नंतर मी म्हणेल तसेच तू वागशील... " त्यांनी आता पण हात पुढे ठेवला..
" हम्म.. ते 6 महिन्या नंतरच नंतर बघू... पण आता मात्र मी तुला साथ देईल... " त्याने जरा द्विधा मनस्थितीतच हातावर हात ठेवला.. जो आता ही थरथर करत होता...मनात काय करावे, काय नाही करावे अशा ही द्विधा मनस्थितीतच अडकला होता ना... एक मन म्हणत होते की ती स्वतः च आपल्याला सोडून जाणार नाही.. इतके प्रेम देऊ.. तर दुसरे मन सांगत होते, ती तर ऑलरेडी दुसऱ्याची आहे... ती आपल्याकडे परत का येईल...?? आणि या अशाच मनातील वादळामुळे त्याला कळतं नव्हते की तो काय वचन देऊन बसला आहे आपल्या लाडक्या आईला...
" नंतरच नंतर नाही.. आताच सांगते... मी म्हणेल तेच तू करणार आहेस... गॉट it.. " पण त्या काही नमल्या नाहीत.. त्यांनी त्याला थोडं दम भरत च म्हंटले... आणि हसतच निघून गेल्या...
" हे बघा, " इकडे तिच्या करार लग्नाविषयी ऐकून या तिघी ही उचकल्या होत्या... पण ती गेले अर्धा तास त्यांना शांत करत होती.. " मी आता या गोष्टीला सामोरे जायचं ठरवलं आहे... काही ही झालं तरी मला माघार घेता येणार नाही... त्यामुळे तुम्ही कितीही माझ्या वर चिडला असला तरी मला आता काही फरक पडत नाही... " ती अस बोलून तिथून निघून ही जाते.. आतल्या आपल्या बेडरूम मध्ये...
" आता काय करायचं... " संपदा तिला अस जाताना पाहून बोलते..
" आपण काय करणार.. " मेघना ने दोन्ही खांदे उडवत म्हटले..
" हॊ ना.. शेवटी हे तीच आयुष्य आहे.. आणि त्यात तिच्या बाबाची इच्छा होती ते ही शेवटची..." नाराज होत आता दिव्या ही बोलते.. " चला आता आपण ही झोपूयात... उद्या आपल्याला जॉब आहे.. " तिने वर्क उसासा सोडत म्हटले.. आणि तस या तिघी ही मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा