Login

विवाह एक अनोखे नाते 16

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करायला ती तयार तर झाली पण निभावू शकेल का हे करार नाते..
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 16
©®चैत्राली यमगर लिखीत..


       दुसऱ्याच दिवशी, आशी सकाळी लवकर उठली... 11 वाजता तिला कोर्टात जे जायचं होते... तीच ती भरभर आवरत होती खरं.. पण का माहीत नाही, दिव्याला ही ते काही पटत नव्हते... तिला अस एकटे जाऊन द्यायला... शेवटी ती ही तिच्या बरोबर जाण्याचा रात्रीच निर्णय घेऊन झोपली तेव्हा तिला शांत झोप लागली होती...


" आशी, जाऊ नकोस एकटीच... मी ही येत आहे..." तिला अस आरशात सजताना पाहून, खरंतर खूप छान वाटतं होत दिव्याला. पण आज वेळ ती नव्हती, तीच कौतुक करायची म्हणून तस न करता, फक्त तिने एवढेच बोलली..


" अगं, पण मी जाऊ शकते दी एकटी... " ती ओठाला लिपस्टिक लावत बोलते...


" सोड ते.. मी करते... " पण त्यावर दिव्या ने वाद न घालता... फक्त तिच्या हातून लिपस्टिक घेत म्हटले... राग ही होता ना की तिने असा, एकाकी निर्णय जो घेतला..


" आशू, मला माहीत नाही तुझ्यावर माझा हक्क आहे की नाही... " ती आता तिच्या कानातले झुमके घालून देत बोलत होती... लिपस्टिक लावून झाली होती..


" अगं दी अस का म्हणतेस.. " ते ऐकून मात्र आशी ला वाईट वाटतं... गेल्या महिनाभरात इतकी छान त्यांची बॉण्ड झाली होती की, दोघी खरंच बहिणी असाव्यात...


" आशू प्लीज आधी मला माझ्या बोलणे पूर्ण करू दे... " पण तिने तिला पुढे बोलूच दिले नाही, उलट दटावत म्हणते, "काल तू बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो... सो आज मी बोलेल तू फक्त ऐकणार आहेस..." तिने म्हटले...


" बर ठीक आहे... ऐकते मी... तू बोल... " तस तिने शरणागती स्वीकारली...


" हे करार लग्न वैगेरे ठीक आहे... " तिने आता मनातील बोलायला सुरुवात केली, " पण तू तुझा पुढच्या भविष्याचा विचार केला आहेस का...?? 6 महिने तर असच फुर्रर्रर्र निघून जातील... " ती आता काळजीने बोलत होती..


" हम्म... विचार करत आहे की जॉब शोधावा... " तिने तस आपल्या मनात इतके दिवस घोळवत असलेला विचार दिव्यासमोर मांडला..


" हम्म... मी ही तेच बोलणार होते... निदान तुला एव्हडं तरी समजत... गुड decision... " ती आता हसून तिला छान दिसते आशी बोटाने च खून करते... " बर ऐक, आमच्या कपंनी त फ्रेशर साठी interview घेत आहेत... तसा मी तुझा resume hr ला दिला आहे... तर ते कधीही तुला बोलावू शकतात... सो बी रेडी... "



" हॊ... " आणि ते ऐकून तिला गहिवरून च आले... " थँक यू सो मच दी... " म्हणत ती रडतच तिच्या कुशीत शिरते... आपली किती काळजी आहे तिला हे पाहून गहिवरून आले होते तिला..


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all