Login

विवाह एक अनोखे नाते 19

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तिने लग्न केले.. पण कस असेल तीच हे आयुष्य...??
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 19
©®चैत्राली यमगर लिखीत..

" आशू... चल आता मी ही येते... " साइन होताच आता सगळे बाहेर पडतात... आशी आणि दिव्या मागे तर शॅली आंटी आणि अर्णव पुढे असतात... त्यांची कार येताच, दिव्या तिला मिठी मारत बोलते..


" हॊ.. तुला ही ऑफिस आहे... " तस आशी ही तिला हसून बोलते..

" ओके.. काळजी घे... " दिव्या तिला थोडे दूर करत, गळालं हात लावून म्हणते.. " आणि हॊ, जॉब च ही बघ... " हे वाक्य मात्र हळूच तिच्या कानात बोलते..

" हॊ... " आशी ही डोळ्यांनी होकार देत, मान हलविते...


" हा बहिणींचा मिलाप संगम झाला असेल... तर निघायचं का आपण आशी... " तोच आता या दोघींजवळ येत, अर्णव.. थोडे हसून, थोडे तिरसटपणे बोलतो..


" आम... हॊ... निघुयात... " आता तशी आशी, इकडे तिकडे पाहत बोलते. शॅली आंटी आधीच गाडीत जाऊन बसल्या होत्या.. आणि रागात च या दोघींकडे पाहत होत्या.


" बाय " म्हणत मग आशी च गाडीत जाऊन बसते.  तस मागोमाग अर्णव ही... आणि गाडी धुराळा उडवत तिथून निघून ही जाते... दिव्या मात्र त्या दूरवर जाणाऱ्या गाडीकडे पाहत असते कितीतरी वेळ... डोळ्यात पाणी दाटून आले होते... पण अचानक मोबाईल वर ऑफिस चा कॉल येतो तशी ती ही भानावर येते.. आणि डोळ्यातील पाणी पुसत, त्यावर गॉगल चढवत निघून जाते. 



    गाडीत बसल्यापासून घर येईपर्यंत मात्र इकडे आशीला खुप च ऑकवर्ड वाटतं होते. ज्या व्यक्तीने आपल्याला मान भरून पाहावे, आपल्या सौंदर्याची तारीफ करावी असं वाटतं होते.. ती व्यक्ती, म्हणजे च अर्णव बाहेर पाहण्यात बिझी होता ... तर जी एकदम अनोळखी होती तिच्यासाठी ती व्यक्ती, शॅली मात्र, तिच्या कडे नुसतीच टक लावून पाहत होती...आशी मध्येच बसली होती या दोघांच्या... त्यामुळे इकडे, अर्णव च्या खिडकीतून तिला बाहेर पाहता येते नव्हते तर दुसरीकडे शॅली आंटी... अशी विचित्र पाहत होती... आणि ते अजून एक कमी म्हणून की काय... साहेबांनी आपल्या कोणता हिर शोधलाय हे पाहण्यासाठी तो ड्राइवर ही पुढच्या आरशातून तिला पाहत होता...


        किती अवघड परिस्थिती होती ना तिची...?? आणि असा वातावरणात तिला, अजून 6 महिने काढायचे होते..??कस होणार होते तिचे... हे त्या देवाला... आह्ह... अर्णव बाबाला च माहीत आपल्या...


" ह्या घरात तुझ स्वागत आज असं केल आहे... ह्यालाच मेहेरबानी समज... " ते घरात येताच, एक बाई तिच्यावरून फक्त मीठ ओवाळते... आणि त्या दोघांना घरात तर शॅली घेते पण टोमणा मारायला चुकत नाही..." नाहीतर सहा महिन्याच्या पाहुनीला आम्ही घरात एन्ट्री ही देत नाही... " शॅली कुचकट हसत म्हणते... आणि तिथून निघून ही जाते..



क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all