Login

विवाह एक अनोखे नाते 20

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तिने लग्न तर केले पण टिकेल का हे लग्न..
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 20
©®चैत्राली यमगर लिखीत..

    ज्याचा हात धरून आली आत तो तर शॅली च्या आधीच आपल्या खोलीत निघून गेला होता..एकटीच आता त्या हॉल मध्ये ती तशीच उभी होती... हा फ्लॅट होता त्याचा स्वतः चा... बाकी एक मोठे मेन्शन होते राजाध्यक्ष फॅमिली चे जे इथून लांब होते..


       बाकीचे लंडन ला शिफ्ट असल्याने त्याला तिथे राहावंसं वाटत नव्हते म्हणून त्याने च हा एक 2 bhk फ्लॅट घेतला होता वर्षभरा पूर्वीच... जो अर्थात तिच्या नावावर होता.. पण ती स्वतः या पासून अनभिज्ञ होती आता.. त्यामुळे मालकीण असून ही या घराची ती सध्या मात्र त्या अनोळख्या घराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होती...


" आई, शॅली ला का पाठवलं आहे इकडे... " अर्णव रागात आपल्या रूम मध्ये आला होता.. आणि आल्यावर आल्या त्याने लगेच कुसुमावती बाईला कॉल करून रागात बोलला...


" अर्णव... " पण त्याच बोलणे ऐकून आता कुसुमावती तिकडून रागात बोलल्या, " त्या तुझ्या आत्या आहेत... नावाने का हाक मारत आहेस... "

" हम्म... ते मला माहीत आहे... डॅड च्या मावशीं च्या मुलीची जाऊ का कोण आहे त्या.. " त्याने ही इतके दिवस घोकलेलं नाते रागात बोलून दाखवले... " आणि मी लाख म्हणेल गं आंटी तिला... पण तिने ते ऐकवून तर घ्यावे... " त्याने त्रागा करत म्हटले...

" तरी ही तू... " त्या बोलणार पुढे..


" ओके बाई आत्या बोलेल.. " पण हा ही चांगलाच उखडला होता... " आता आपण मुद्द्याचं बोलायचं का " आणि त्याने स्वतःला कंट्रोल करण्यासाठी, कपाळावर रब करत म्हंटले...


" हम्म.. मला तुझ्या डॅड ने इकडे आपल्या मेंशन वर बोलावून घेतले होते... आणि तुझ्यासोबत आपल्या घरातील कुणीतरी असावे.. असं मला वाटले म्हणून हीला पाठवले... " त्यांनी आता एका श्वासात सगळे बोलून टाकले...जणू त्या त्याच्या याच प्रश्नाची अपेक्षा करत होत्या आणि त्यांनी  ते सकाळ पासून पाठ करून ठेवलेले असावे...


" अगं पण तुला ही त्याच भेटल्या का... " ते त्याला ही कळाले होते की त्यांनी पाठ केलेले उत्तर दिले आहे... तस तो अजून रागात बोलला..


" हे बघ मला अजून या गोष्टीवर बेहस नको आहे.. " पण त्या ही आता त्याच ऐकणाऱ्या नव्हत्या... आज त्या त्याच्यावर ही भारी पडत होत्या... " मी आज परत लंडन ला चालली आहे रिटर्न... आणि पुढचे 6 महिने, शॅली आणि नताशा दोघी ही तुझ्या फ्लॅट वर असतील... "


" काय...?? " आणि ते ऐकून तर हा अजून जोरात उडाला... " आत्या ठीक आहे... पण ह्या नताशा च काय मध्येच... " तो अजून रागात बोलला..


" ते तीच काहीतरी काम आहे... असं तीच म्हणत होती... " त्यांनी उडवा उडवीचे कारण दिले.. " बर ऐक, तुझे डॅड हाक मारत आहे... मी ठेवते कॉल... " आणि असं बोलून कुसुमावातींनी तर कॉल कट ही केला त्याच काही न ऐकता..


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all