Login

विवाह एक अनोखे नाते 21

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी तर तीच लग्न झालं पण हे नातं कुठपर्यंत टिकेल...
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 21
©®चैत्राली यमगर लिखीत..

" आई, आय डोन्ट नो," तो मोबाईल कडे आता पाहत बोलला, " तू नक्की काय करणार आहेस... पण तिला त्रास झालेला मी मात्र खपवून घेणार नाही... " त्याने ही मनाशी पक्क करत म्हटले..." हॊ, पण का कुणास ठाऊक... यात मज्जा येणार आहे... " आणि लगेच ह्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू ही आले...नक्की याच्या मनात काय चालले होते हे खुद्द अर्णव बेबी ला च माहीत होते...


" हुश्श... किती ही उत्तर पाठ करून ठेव कुसुम... " इकडे फोन कट करताच, कुसुमावती एक मोठा उसासा सोडत बोलतात, " या पोराशी बोलायचं म्हणजे दमछाक होते... कसा आहे हा नक्की, हे मी जन्मदात्री असूनही मला उमगला नाही इतक्या वर्षात... तर नटस बिचारी... कस सांभाळेल याला... " त्या आता भविष्याची चिंता करत बोलतात... तोच त्यांना अर्णव चे डॅड हाक मारल्याचा आवाज ऐकू येतो आणि त्या तशाच मोबाईल गादी वर फेकून पळत जातात...


" काय महाराणी... आता काय नुसतं घर पाहत राहणार आहात.. की जेवायचं पण बघणार आहात... " गेले तास भर ही नुसतीच हॉल मध्ये बसून होती... शॅली खाली आली तरी तीच लक्ष नव्हते.. कुठल्या विचारात हरवली आहे हे तिला ही समजत नव्हते... बस, एका ठिकाणी पाहत शून्यात हरविल्या होत्या मॅडम..


" अं... करते ना... " आणि शॅली चा आवाज ऐकून, ती पटकन उठून उभी राहिली...


" सोना मॅडम... ओ सोना मॅडम... " पण शॅली आता तिच्या जवळ न जाता, किचन च्या दारात एकटक पाहत असलेल्या बाईला पाहत म्हणते... आणि त्या बाईच्या समोर जाऊन उभी राहते... " अहो तुमचं पाहून आमचं पोट नाही भरणार... जा, आमच्या थोरल्या सुनबाईना घेऊन जा आत... आणि सगळा स्वयंपाक कसा करायचा ते सांगा... " आणि पुढे तिच्या खांद्यावर टॅप करत आपले बोलणे कंटिन्यू करतात.. ती बाई सुद्धा ओशाळली, आणि खाली मान घालून हॊ म्हणाली..


" ओ, 6 महिन्याच्या पाहुणीबाई... " आणि आता शॅली सरकली, आपल्या आशी कडे... जी अजून ही नक्की घरात काय चाललंय गोंधळ तो समजून घेत, तशीच अडखळत उभी होती.. पण शॅली चा आवाज ऐकून आता चांगलीच गडबडली ही..." आता तुम्ही कशाला अजून आमचा वेळ खात आहात... जा त्या सोना बाई जेवण या घरच शिकवतील तस करा... पण लक्षात ठेवा... प्रत्येक पदार्थ हा तुम्ही स्वतः बनवला असला पाहिजे... " शॅली ने तिला चांगला दम भरत म्हटले..


ही शॅली आता आपल्या नजूक आशीचा जीव खाणार असं दिसत होते... कारण आपल्या नायिकाने कधीच किचन मध्ये पाय ठेवला नव्हता इतकी वर्ष.. जिथे शॅली तिला 10 माणसाचा स्वयंपाक करायला सांगत होती.. कस होणार पुढे आपल्या आशी च देव जाणे... बघू आता पुढच्या भागापासून..


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all