डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 22
©®चैत्राली यमगर लिखीत..
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 22
©®चैत्राली यमगर लिखीत..
" तुम्ही या आधी किचन मधील काम केलेले दिसत नाही वाटतं... मालकीणबाई... " ती सोना बाई, समोरची परिस्थिती पाहून थोडी हसतच बोलते...
" नाही ओ... तशी वेळच नाही आली... " तिने ही खजिल होऊन उलट्या हाताने आपले केस, जे सारखे पुढे येत होते ते मागे करत बोलते..ज्यामुळे कपाळाला पिठ लागले होते...किचन कट्ट्यावर सगळीकडे पीठ सांडले होते.. परातीत जे पीठ घेतले होते कणिक मळायला, त्याच्यात पाणी जास्त पडल्याने हात ही दोन्ही खराब झाले होते... आणि चेहऱ्यावर त्यामुळे ना पसंतीची रेघ उमटली होती, ती तर स्पष्ट दिसत होती.. मनातील भावनांचा कल्लोळ...जो सर्व किचन कट्ट्यावर व्यवस्थित दिसत होता...
" तुम्ही मला मदत कराल....?? " तिने च मग आपले दोन्ही हात पाहत, त्या सोनाबाई ला अदबीने विचारलं...
" ना बाबा... " पण त्या बाईने लगेच शेजारी असलेली काकडी घेत, तिचा तुकडा तोडत दुसया side ला कट्ट्यावर बसत बोलली... " मला मोठ्या मालकीण बाईने काडीची ही मदत नाही करायची असं स्पष्ट सांगितलं आहे... " तशी ही ती मुलखाची आळशी होतीच आणि त्यात आता असं तिच्या मोठ्या मालकीणीबाईने च खुद्द सांगितल्याने ती फक्त हिची मज्जा पाहत होती...
" ओके... " तिने तिच्याकडे पहिले... ती सोना, मस्त काकडी खात एन्जॉय करत होती, जिथे ती या घरची कूक होती... आणि इथे आपण... 6 महिन्यांचे का असेना, अर्णव ची पत्नी आहोत तिथे आपल्याला हे असली कामे करावी लागत होती... तिला मनातून चीड येत होती, राग येते होता... खुद्द तिचा, तिच्या परिस्थिती चा... एक काळ असा होता की त्या सोनाबाई सारखी ती काकडी, गाजर खात बसायची... आणि तिचे डॅड त्यांच्या दोघांसाठी जेवण बनवायचे...
" ओ... नजर कावून लावताय मला... " पण तीच असं एकटक पाहणे, सोनाबाईला राग आणून देते.. आणि तशी ती तिला ठसक्यात ओरडते... " काम करा, काम... बया... अजून 2 भाज्या, कोशिंबीर, वरण भात... सर्वच बनवायचं हाय... आण ही कणिक.... " ती बाई आता थोडे मोठ्याने बोलत, पराती तील ते पाणी कम पीठ एका बोटावर घेऊन विचित्र नजरेने पाहत बोलते...
" एवढं सगळे...?? " आणि तीच बोलणे ऐकून तर हीला अजून घाम फुटला...तिचे डॅड घरी एक भाजी, भात चपाती.. सलाड एव्हडच करायचे... जास्त वेळ नसायचा ना त्यांना... त्यामुळे ते जितक्या लवकर जे होईल ते बनवायचे... पण इथे एवढं सर्व पदार्थ ऐकून हिचे धाबे चांगलेच दणाणले.
काय वाटतय या किचन पॉलिटिक्स मध्ये ती जिंकेल?? की शॅली?? जाणून घेऊयात पुढील भागात..
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा