डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 23
©®चैत्राली यमगर लिखीत..
" हॊ, एवढं च रोज लागते. आणि आता छोट्या मालकीणबाई... आपले हात पटापट चालवा... कारण आता अर्धा तास च हाय तुमच्याकडे स्वयंपाक बनवायला...वेळ होत आली आहे जेवणाची... "सोनाबाई टूनकन उडी घेते, आणि आपले बोलणे थांबविते...
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 23
©®चैत्राली यमगर लिखीत..
" हॊ, एवढं च रोज लागते. आणि आता छोट्या मालकीणबाई... आपले हात पटापट चालवा... कारण आता अर्धा तास च हाय तुमच्याकडे स्वयंपाक बनवायला...वेळ होत आली आहे जेवणाची... "सोनाबाई टूनकन उडी घेते, आणि आपले बोलणे थांबविते...
" साहेब... तुम्ही आणि इथे... " म्हणतच.. काकडीचा तशीच तोंडात पकडून होती ती... तिच्या अशा बोलण्याने आशी च ही लक्ष जाते मागे... ती ही पाहायला लागते... तर मागे अर्णव उभा असतो... पांढरा टी शर्ट आणि त्यावर काळा बर्मुडा... घरातच आता थांबला असल्याने त्याने घरचे नॉर्मल कपडे घातले होते...केस जरा मेसी होते, दाढी ही थोडी वाढलेली होती... चेहऱ्यावर आता प्रचंड राग होता... पण तरी ही तो त्या ही परिस्थितीत क्युट भासत होता.. आपल्या आशीचे तर त्याला असं पाहून डोळेच दिपले होते...
" आशी, चाकू दे... " तोच त्याचा धारधार आवाज आला आणि ती भानावर आली... तिने त्याच्याकडे पाहिले तर आता त्याने आपल्या शर्ट च्या बाह्या मस्त फोल्ड केल्या होत्या... ज्यामुळे तो अजून च मस्त दिसत होता...
" हॅलो... " तो तिच्यासमोर टिचकी वाजवत बोलतो, कारण ती परत कुठे तरी हरवली होती...
" अं... " पण त्याने तड केल्यावर भानावर येते.
" चाकू... " तो तिला बोलतो... त्याचा आताचा चेहरा निर्वीकार होता... पण मनात मात्र ती आपल्यालाच पाहतेय हे पाहून तो सुखावला ही होता..
" हॊ.." म्हणते ती खरी पण गडबडून सगळीकडे शोधायला लागते, तस तो नकारत्मक मान हलवितो... आणि तिच्या दुसऱ्या हाताला असलेल्या चाकूला घेतो... हा क्षण असतो फक्त 10-15 सेकंडचा... पण दोघांसाठी स्तब्ध होऊन जातो... कारण असं करताना तो तिच्या खूप जवळ आला होता... इतका की श्वासामध्ये श्वास एकमेकांच्या गुंफला गेला होता... त्याने जस्ट वॉश घेतला असल्याने त्याच्या बॉडी चा तो सुवास तिला हरवून टाकत होता...
" आशी... काय करतेय... " पण तोच आशीच दुसरे मन तिला ओरडते... आणि तशी ती भानावर येते.. पटकन ती मागे सरकते... पण तिच्या हालचालीमुळे तो ही भानावर आला होता.. आणि तो ही मागेच सरकत होता... त्यामुळे आता या पुढच्या सेकंदात च त्याचे ओठ तिच्या त्या गोर्या मानेवर टच होतात... तस परत दोघे स्तब्ध...
" अहं अहं... " तोच बाहेर कुणाचा तरी खोकल्या चा आवाज ऐकू आला आणि ते दोघे वेगळे झाले..
" तू थांब... " ती आता त्या परातीतल्या पातळ पिठा कडे नुसती पाहत होती, की त्यानेच हसून म्हटले.. आणि लगेच अजून थोडे पीठ टाकून दिले परातीत व तिला आता मळ म्हणून खुणावले.. तस ती ही मग कणिक मळू लागली..तो ही मग आता भाज्यांची तयारी तिला करून देऊ लागला... सगळे इतके बारीक चिरत होता जणू तिला तो एक कुशील शेफ वाटत होता आता... आणि सोबत तिला मदतीसाठी धावून आलेला देवदूत च...
" झालंय सर्व... फक्त मीठ टाक... " तो हात धुवून तिला म्हटला.. त्याने त्याच्या कणिक मळून चपात्या होईपर्यंत 2 भाज्या, भात... कोशिंबीर, वरण असं सगळे करून दिले होते... भाजीत एका फक्त मीठ टाकायचं राहिले असल्याने त्याने तेवढं कर तिला सांगितलेलं..
" हम्म.. " तिने ही हुंकार भरला आणि चपात्या चा गॅस बंद करून, मीठ टाकायला घेतले...
" अगं.. अगं... एवढं मीठ... " आणि तिने टाकलेलं मीठ पाहून त्याने तर कपाळावर हात मारला... त्याला कळून आता चुकले होते की काय होणार या 6 महिन्याच्या संसारात आता त्याच्या...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा