Login

विवाह एक अनोखे नाते 24

बाबांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न तर केल पण हा संसार टिकेल का??
डिसेंबर -जानेवारी 2025-2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा..
विवाह एक अनोखे नाते 24
©®चैत्राली यमगर लिखीत..


" तुला साधं भाजीत मीठ किती टाकायचं एवढं सुद्धा कळतं नाही का... " इकडे स्वयंपाक होताच, ती शॅली आणि अर्णव ला बोलावते जेवायला...


अर्णव ने च खरंतर स्वयंपाक केला आहे हे त्याला शॅली ला कळू द्यायचं नव्हते म्हणून तो आधीच आपल्या खोलीत गेला होता... ते ही हसतच... त्याने ते मीठ टाकलेलं जास्तीच तिला मुद्दामच सांगितलेलं नव्हते..


" काय झालं.. " शॅली च बोलणे मात्र तिला कळालेच नाही... तिने आता अर्णव कडे पाहिले... अर्णव खाली मान घालून गालात हसत होता.. त्यात त्याने ती भाजी ही थोडीसुद्धा खाल्ली नव्हती...तिला काहीतरी वेगळे वाटले... कारण त्याला ती भाजी आवडते.. असं तो स्वयंपाक करताना तीन तीन वेळा तिला सांगत होता... ठासून... आणि आता एक ही घास खाल्ला नाही याचच कोडं तिला पडले होते..


" नुसती मठ्ठा सारखी काय उभी आहेस आता... " पण शॅली बेसिन ला जाऊन तोंड धुवून आली तरी ती अशी उभी पाहून, शॅली रागात बोलली... " कुणी एव्हडं मीठ टाकते का...?? तुला वाढायच्या आधी भाजी टेस्ट करून बघता येत नाही का...?? जा आता, काहीतरी गोड खायला आण... " त्या तीच चांगलेच तोंडसूख घेत होत्या...


" गोड...?? " आणि ते ऐकून तिच्या पोटात गोळा आला... कारण त्यांनी दोघांनी काहीच गोड बनवले नव्हते..


" शॅली, सोड तिला... " तो मध्ये पडतो तस तिला आता जरा हायसे वाटतं, की कमीत कमी तो आता आपली बाजू घेईल...
" ज्याला साधं भाजीत मीठ किती टाकावे ते कळत नाही तिला गोड काय बनविता येणार... त्यापेक्षा आपण दोघे बाहेर जाऊन icecream खाऊन येऊ... " तो पुढे मात्र हसतच तिला चांगलाच टोमणा मारतो... जे ऐकून तिला आता राग येतो... स्वयंपाक याने केला सगळा... आणि ओरडणी मात्र तिला बसली...


" हॊ बाबा.. तुझं खरं आहे.. " ज्यावर आता शॅली ही गंभीर होत म्हणते.. " चल, जाऊयात आपण बाहेर " म्हणत ती ताटाला नमस्कार करून उठते सुद्धा... अर्णव सुद्धा हात धुवून येतो आणि मग हे दोघे तिला न विचारता... तसेच निघून ही जातात बाहेर...


" पण मी तर थोडे च मीठ टाकले होते... जस त्याने सांगितलेलं होते... " ते गेले आहे बाहेर हे पाहून, तिने आता काहीतरी आठवत म्हटले...हातात भाजीची वाटी घेऊन तिने ती टेस्ट केली होती.. ज्यामुळे तीच ही तोंड शॅली सारखं खारट झालं होते...


" हॊ, तू मीठ बरोबर च टाकले होते मॅडम..." तोच तिला मागून कुजबुजल्याचा आवाज ऐकू आला... " पण जर त्यात आधीच नेहमीपेक्षा जास्तच टाकले असेल तर... " मागे अर्णव होता, जो तिला हसून बोलत होता...


" अहो पण मग... " ती पुढे काही बोलणार त्या आधीच तो तिला डोळा मारून निघून ही गेला होता...


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all