दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 25
©®चैत्राली यमगर लिखीत..
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 25
©®चैत्राली यमगर लिखीत..
" घे... तुझ्यासाठी special... " ती आपल्या खोलीत जेवण करून आलीच होती की, तिच्यासमोर icecream चा कप धरत तो बोलतो...
" नकोय मला... " पण ती ही आता रागात बोलते... ती त्याच विचारात खरंतर हरवली होती की, तो असा का वागला आपल्याशी...त्याने ते नक्कीच मुद्दाम केल असेल असं तिला वाटतं होते...आणि म्हणूनच आता ती गाल फुगवून होती...
" का नकोय..खारट झालं आहे ना तोंड तुझं ही.... " पण त्याने आता तिच्या शेजारी बसत म्हटले, " तस ही तुला आवडते ना केशर पिस्ता icecream... " त्याने पुढे सहज विचारावं म्हणून विचारले..
" केशर पिस्ता icecream... " आणि ते ऐकून तिचे डोळे चमकले... कारण तिचा हा आवडता फ्लेवर... तिने एकदा त्याच्याकडे तर एकदा त्याच्या हातातील कपाकडे पाहिले...
" तुम्हाला कस माहीत की हे फ्लेवर मला आवडते ते... " तिने त्याच्या हातून जवळ जवळ हिसकावून च घेत म्हटले...
" ते मला आवडते ना... म्हणून.. मला वाटले... " त्याने मात्र खरं उत्तर द्यायचे टाळले...
" तुम्हाला आवडते म्हणून मला का आवडेल... " तस तिने भुवया उंचावत च त्याला एक घास खात खातच विचारले..
" अगं ते माझ्या गर्लफ्रेंड ला आवडत ना.. म्हणून मला वाटले... " त्याने आता सध्या तिचे प्रश्न थांबविण्यासाठी म्हटले...
" ओह्ह... " त्या उत्तरावर ती मात्र आता गोड हसली, " म्हणून तुम्हाला वाटले, सर्वच मुलींना हे आवडतं असावे... नाही का... " तिने हसत हसत म्हटले..
" हम्म.. " म्हणत त्याने मनात एक सुस्कारा सोडला, तीच हसणे पाहून, आणि एक स्कुप तिच्या तोंडात घातला.. अहं, अक्षरशः कोंबला... " आता गप खा.. नाहीतर ते वितळून गेले की तुला नाही आवडत... " त्याने पुढे म्हटले.. आणि जीभ चावली.. कारण आता ही परत पुढे तिला प्रश्नावली सुरु करायला आपली, नकळत का होईना त्याने एक संधी जी दिली होती...
" मी आलोच... " आणि खरंच ती पुढे प्रश्न करणार, तस हयाने परत एक चमचा icecream चा कोंबला आणि बाहेर धूम घेतली..
" ह्यांना हे सुद्धा कस माहीत... " पण ती मात्र त्या विचारात हरवली... " जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे.. " म्हणून ती परत आले लक्ष icecream वर केंद्रित करते...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा